शिमला मधील पर्यटन स्थळे || Tourist Places to visit in Shimla – Marathi (Part 1)
अनेक पर्यटकांच्या आवडीचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे शिमला. भारतील इतर सर्व पर्यटन स्थळांच्या तुलनेत थंड हवेच्या ठिकाणामध्ये शिमला ला भेट देणारे पर्यटक हे मोठ्या प्रमाणात असतात. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण शिमला कधी गेले पाहिजे, शिमला मधील पर्यटकांसाठी पर्यटन स्थळे, शिमला या ठिकाणी कसे पोहोचलं पाहिजे, हॉटेल्स कुठे योग्य मिळतील, शिमला मध्ये फिरण्यासाठी किती खर्च येईल अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.
शिमला या ठिकाणी कसे पोहोचाल? (How to reach Shimla in Marathi?)
शिमला पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत त्यातील आपण एक एक करून जाणून घेऊयात.
बस – चंदीगड वरून तुम्हाला हिमाचल प्रदेश वाहतूक मंडळाच्या बस मिळतील. त्यांचे दर साधारणतः 250 रुपये आहेत. चंदीगड मधून देखील व्होल्व्हो बस मिळतील. दिल्ली वरून देखील शिमला साठी गाड्या आहेत. त्यांचे दर साधारणतः 600 ते 1000 रुपये असतात.
स्वताच्या गाडीने जर येत असाल तर तुम्ही शिमला हायवे ने गाडी चालवत प्रावसाचा आनंद घेत येऊ शकतात. चंदीगड ते शिमला हे अंतर 120 किलोमिटर आहे. 3 ते 5 तासात तुम्ही इथे येऊ शकता.
टोय ट्रेन – या ट्रेनने तुम्ही शिमला येऊ शकतात. टोय ट्रेनने फिरण्यमध्ये तुम्हाला सर्वात जास्त मजा येईल. तुम्ही कलका ते शिमला या टोय ट्रेन ने 65 रुपयांमध्ये शिमला जाऊ शकतात. 350 पासून पुढे तुम्हाला फर्स्ट क्लास तिकीट मिळतील. दिल्ली ते कलका हे अंतर देखील तुम्ही ट्रेन ने येऊ शकतात. तिथून मग तुम्हाला वेगवेगळ्या वेळेला एकूण 6 ट्रेन शिमला जाण्यासाठी आहेत.
विमान – शिमला मध्ये विमानतळ आहे. इथे सरळ फ्लाईट कमी आहेत त्यामुळे बाहेरून येणार असाल तर चंदीगड यावे लागेल. मग तिथून पुढे तुम्हाला शिमला फ्लाईट मिळेल.
शिमला मध्ये राहण्याची व्यवस्था – Where to Stay in Shimla?
तुम्ही जर बस किंवा ट्रेन ने आला असाल तर तुम्हाला मॉल रोडला हॉटेल्स मिळतील. तिथे तुम्ही थांबू शकतात. 800 रुपये पासून पुढे तुम्हाला इथे रूम्स मिळतील. मात्र सिझन आणि विकेंड नुसार हे दर वाढतात. रूम मधून तुम्हाला जर चांगला व्ह्यू मिळत असेल तर त्याचे दर अधिक जास्त असतात.
आमचा सल्ला हाच असेल की फोटो बघून शिमला पोहचन्याआधी हॉटेल्स बुक करून घ्या. तुम्ही स्वताच्या गाडीने येत असाल तर शिमला हायवे वर तुम्हाला हॉटेल्स मिळतील. शिमला सिटी मध्ये देखील हॉटेल्स आहेत मात्र तिथे पार्किंग प्रॉब्लेम आणि कांजेस्तेड जागा आहे. त्यामुळे हायवे हॉटेल्स तुमच्यासाठी योग्य असतील.
आता आपण शिमला मधील पर्यटन स्थळांची माहिती घेऊयात जिथे तुम्ही शिमला आल्यानंतर नक्कीच भेट द्यायला हवी. त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जर शिमला येथे येणार असाल तर शिमला मध्ये 3 ते 4 दिवसांचा स्टे करणे लक्षात ठेवा. जेणेकरून तुमचे सर्व ठिकाण योग्य प्रकारे बघून होतील. तुम्हाला जर इथे काम करायचे असेल तर तुम्ही 1 महिना देखील इथे थांबून काम करू शकतात.
- कुफ्री (Kufri)
तुम्हाला पहिल्या दिवशी बघण्यासाठी कूफ्री हे थंड हवेचे ठिकाण आहे. 1500 ते 2000 रुपये देऊन तुम्हाला इथे टॅक्सी मिळेल. टॅक्सी ने तुम्ही कुफ्रि मध्ये फिरू शकतात. तुम्ही जर हिवाळ्यात जात असाल तर तुम्हाला कुफ्री या ठिकाणी नक्की जायला हवें इथे तुम्हाला बर्फशी संबंधित साहसी खेळ खेळायला मिळतात.
इथे तुम्हाला स्किंइंग, हॉर्स रायडिंग, याक रायडिंग करता येईल. मुख्य रस्त्याला लागूनच एक जागा आहे जिथे तुम्हाला अनेक पर्यटक उभे राहिलेले दिसतील. इथून तुम्हाला ग्रीन व्हॅली दिसेल. तुम्ही तिथल्या एखाद्या नागरिकाला विचारून देखील इथे येऊ शकतात. हे पूर्णपणे घनदाट जंगल असून इथे शक्यतो कोणी जात नाही.
कुफ्री मध्ये एक प्राणी संग्रहालय आणि एक अमतुझमेंट पार्क देखील आहे. तुम्हाला या दोन्ही ठिकाणी भेट देता येईल.
- द रिदज (The Ridge)
हे ठिकाण मुख्यतः एक रस्ता आहे. सायंकाळी तुम्ही इथे भेट देण्यासाठी जाऊ शकतात. इथे तुम्हाला कोणतेही वाहन दिसणार नाही. सुंदर रस्त्यासोबत तुम्हाला इथे जवळपास डोंगर आणि निसर्गाचे विहंगम दृश्य देखील दिसेल. जसं जसा अंधार होत जाईल त्यानुसार तुम्हाला हा रस्ता अधिकच सुंदर दिसायला लागेल. इथे केलेली विद्युत रोषणाई अद्भुत आहे.
- जाखु मंदिर (Jakhu Temple)
सकाळी तुम्ही मॉल रोडला नाश्ता वैगरे करून जाखू मंदिरासाठी जाऊ शकतात. हे मंदिर शिमला मधील सर्वात जास्त प्रसिद्ध मंदिर आहे. मॉल रोड पासून याचे अंतर साधारणतः 2 किलोमिटर आहे. तुम्हाला इथे जाताना चढत जावे लागेल. तुम्ही इथे पायी देखील पोहोचू शकतात. साधारणतः तुम्हाला यासाठी 15 ते 20 मिनिट कालावधी लागेल.
तुम्हाला रोप व या मार्गाने देखील जाखु मंदिराला जाता येते. तुम्हाला यासाठी 250 रुपये प्रति व्यक्ती इतका दर द्यावा लागेल. सर्वात महत्वाचे म्हणजे रोपवे ने जात असताना तुम्हाला सुंदर निसर्ग बघायला देखील मिळेल.
टॅक्सी ने देखील तुम्ही इथे पोहोचू शकतात. त्यासाठी तुम्हाला 400 ते 600 रुपये भाडे द्यावे लागेल. जाखु हील वर हे मंदिर वसलेले असून इथे तुम्हाला महाबली हनुमान यांची मोठी मूर्ती दिसेल. तुम्हाला इथून खूप चांगल्या प्रकारे निसर्ग दृश्य बघायला मिळेल. हनुमान जिंची इथे 108 फूट उंचीची मूर्ती देखील आहे. त्यामुळे या सर्वांचा आनंद घेण्यासाठी शिमला येत असलं तर इथे नक्कीच यायला हवे.
- मॉल रोड
शिमला मध्ये मुख्य 3 बाजार आहेत. तुम्हाला त्यातील पहिला म्हणजे मॉल रोडला खूप सारे मोठे दुकान आणि रेस्टॉरंट बघायला मिळतील. तुम्ही इथे खाऊ देखील शकता आणि त्यासोबतच शॉपिंग सुद्धा करू शकतात.
मॉल रोड शिवाय इथे अजून 2 बाजार आहेत ते म्हणजे लोवर बाजार आणि लक्कड बाजार. शिमला मधील जी लोकं स्थानिक आहेत ते सर्व लॉवर बाजार येथेच खरेदी करतात. तुम्हाला लककड बाजारात अनेक सुंदर आणि आकर्षक गोष्टी बघायला मिळतील ज्या तुम्ही तुमच्या प्रियजनांसठी घेऊन जाऊ शकतात. लोवार बाजार पेक्षाही लक्कडं बाजार हा स्वस्त आहे.
- क्राईस्त चर्च (Christ Church Shimla)
सायंकाळच्या वेळी तुम्ही शिमला मधील सर्वात जास्त प्रसिद्ध असलेल्या क्राइस्त चर्च येथे जाऊ शकतात. द रिज मध्येचे हे ठिकाण आहे. मॉल रोडपासून तुम्हाला या ठिकाणी चालत देखील जाता येईल.
उत्तर भारतातील हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जुने चर्च आहे. बाहेरून हे ठिकाण जितके जास्त सुंदर दिसते त्याहून अधिक आतून सुंदरता आहे.
त्यानंतर तुम्ही मॉल रोडवर एखाद्या रेस्टॉरंट किंवा हॉटेल मध्ये रात्रीचे जेवण करू शकतात.
आता आपण पुढील ठिकाणांची माहिती पुढील भागात जाणून घेऊयात.
शिमला मधील पर्यटन स्थळे || Tourist Places to visit in Shimla – Marathi (Part 2)
0 Replies to “शिमला मधील पर्यटन स्थळे || Tourist Places to visit in Shimla – Marathi (Part 1)”