केदारनाथ ट्रीप गाईड | Kedarnath Tour Guide in Marathi
केदारनाथ जाण्यासाठी अनेक लोक सध्या प्लॅन करत असतील मात्र तुमचा प्लॅन बनण्यासाठी हा लेख नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला केदारनाथ मधील अनेक विषयांची माहिती आत्ताच समजेल. जसे की तुम्ही केदारनाथला कसे पोहोचाल, किती वेळ केदारनाथ पोहोचण्यासाठी लागतो, किती खर्च साधारणतः येईल आणि त्यासोबतच केदारनाथ जाण्याची योग्य वेळ काय आहे?
केदारनाथला कसे पोहोचाल? – How to reach Kedarnath?
तुम्ही भारतात कुठे ही असाल आणि तुम्हाला जर केदारनाथला जायचे असेल तर तुम्हाला हरिद्वार, ऋषिकेश किंवा डेहराडून इथे यावे लागेल. तुम्हाला जर या 3 ठिकाणी जायचे असेल तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे दिल्ली येणे आणि मग तिथून तुम्हाला अनेक बस उपलब्ध आहेत.
हरिद्वारला जर आला तर तिथून तुम्हाला 350 ते 400 रुपयांमध्ये तुम्ही 8 तासांचा प्रवास करून सोनप्रयाग इथे येऊ शकतात. सोनप्रयाग येथे पोहोचून तुम्ही एक रात्र आराम करू शकतात.
सोनप्रयाग पासून तुम्हाला स्वतःची गाडी असेल ते ती पुढे नेता येत नाही. त्यामुळे तुम्हाला ती गाडी पार्किंग मध्ये लावून मग उपलब्ध वाहनांनी पुढे जावे लागेल. तुम्हाला 5 किलोमिटर प्रवास करून गौरिकुंड येथे पोहोचता येते. गौरीकुंड पासून तुमचा प्रवास सुरू होतो. हा ट्रेक साधारणतः 17 किलोमिटर अंतराचा असून यामध्ये तुम्हाला 8 तासांचा कालावधी लागतो.
तुम्हाला रस्त्यात पाणी भेटेल. ट्रेक करत असताना तुमच्या पायात बुट असणे गरजेचे आहे. जाताना वाटेत तुम्हाला खाण्यासाठी गोष्टी उपलब्ध आहेत. वाटेत पाऊस तुम्हाला लागेल आणि त्यामुळे तुमच्याकडे रेनकोट असणे गरजेचे आहे.
केदारनाथ ट्रेक न करणाऱ्यांसाठी पर्याय – Other ways to Kedarnath skipping Trek Route
तुम्हाला जर ट्रेक करता येत नसेल तर तुमच्यासाठी घोडेस्वारी सुविधा आहेत. एका बाजूने जाण्यासाठी तुम्हाला 2500 रुपयांच्या आसपास खर्च येतो. गौरिकुडं मध्ये तुम्हाला हे घोडे मिळतील.
तुम्हाला इथे पालखी मिळते. जास्तच वृध्द कोणी असेल तर त्यांच्यासाठी पालखी घेऊ शकतात. पालखी चा खर्च हा एका बाजूने म्हणजे जाण्यासाठी जवळपास 5000 ते 6000 रुपये इतका आहे.
केदारनाथ हेलिकॉप्टर मार्ग – How to reach Kedarnath with Helicopter?
सोनप्रयाग च्या आधी तुम्हाला केदारनाथ जाण्यासाठी एक फाटा ठिकाण लागेल. इथून तुम्हाला केदारनाथ जाण्यासाठी हेलिकॉप्टर मिळतात. हेलिकॉप्टर ऑनलाईन बुक होते. फाटा पासून केदारनाथ तुम्ही फक्त 8 मिनिटात पोहोचू शकता. हेलिकॉप्टर साठी एका बाजूने शुल्क हे 5 हजार ते 10 हजार लागते.
तिथे गेल्यानंतर तुम्ही साधारणतः 2 ते 3 तास वातावरण अनुभवू शकतात. दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी तुम्हाला आरतीचा आनंद घेता येतो. रात्री तुम्हाला मंदिराच्या परिसरात राहण्याची व्यवस्था असलेल्या हॉटेल मध्ये होऊ शकते. तुम्हाला मोठे हॉल देखील मिळतील. तुम्ही या ठिकाणी राहण्यासाठी ऑनलाईन बुकींग करू शकतात. आलेल्या दिवशी पुन्हा परतणे जरा कठीण असते.
दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पुन्हा दर्शन घेऊन गौरिकूंड कडे मार्गस्थ होऊ शकतात.
केदारनाथ ट्रेकसाठी राहण्याची व्यवस्था – Where to Stay in Kedarnath Trek?
तुम्हाला केदारनाथ ट्रेक मध्ये जाताना सोणप्रयाग येथे पहिला मुक्काम करावा लागेल. नंतर ट्रेकला गेल्यानंतर मंदिर परिसरात एक मुक्काम होईल आणि पुन्हा आल्यावर सोनप्रायाग किंवा सरळ हरिद्वार येथे तुम्ही मुक्काम करू शकतात. म्हणजे तुमचे 3 किंवा 4 मुक्काम नक्की होतील.
केदारनाथला भेट देण्याची योग्य वेळ – Best time to visit Kedarnath
केदारनाथ येथे दरबार जेव्हा सुरू असेल तेव्हा तुम्ही कधीही जाऊ शकतात. जवळपास 12 हजार फूट उंचीवर केदारनाथ धाम असल्याने तुम्हाला जर तिथे जायचे असेल तर 6 महिने हे बंद असते.
एप्रिल ते नोव्हेंबर काळात आपण केदारनाथ ट्रेक करू शकतात. जुलै ऑगस्ट मध्ये पाऊस खूप जास्त असल्याने लोक तिथे जात नाहीत. मात्र ज्यांना ट्रेक करण्याचा आनंद पावसात घ्यायचा आहे तिथे तुम्ही जाऊ शकतात.
मे आणि जून मध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते तर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात ऑफ सिझन असल्याने तुमचा खर्च वाचेल.
केदारनाथ भेटीसाठी लागणार खर्च – Costing for Kedarnath Trip
जर तुम्ही ट्रेक करत गेला तर तुमच्यासाठी ऋषिकेश पासून खर्च हा 8 ते 9 हजार रुपये इतका येईल. तुम्हाला इथे वाहतूक खर्च हा 1 हजार रुपये च्या आसपास येईल. तुम्ही जर 3 रात्री हॉटेल्स वर थांबला तर तुम्हाला तो खर्च एका व्यक्तीसाठी 5 हजार रुपयांच्या आसपास येईल. एका तुमचा खर्च हा 3 हजार रुपयांच्या आसपास असतो.
जेवणाचा खर्च हा साधारणतः 2 हजारांच्या आसपास येतो. म्हणजे एका वेळी 500 रुपये खर्च येतो. तुम्ही जर केदारनाथ धामला वरच थांबणार असाल ते तिथला खर्च साधारणतः एका व्यक्तीसाठी 1 हजार रुपये येतो. म्हणजे साधारणतः तुमचा एकूण खर्च हा 6 हजार 500 ते 8 हजार येतो. यामध्ये सिझन नुसार काही बडल देखील होऊ शकतात त्यामुळे तुम्ही 8 ते 10 हजार रुपये बजेट पकडुन मग केदारनाथ ट्रीप करायला हवी.
बाकी तुम्हाला ज्या सुविधा जास्त हव्या आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला अधिक खर्च द्यावा लागेल.
केदारनाथ ट्रेक सोबत इतर पर्यटन स्थळे – Other Tourist Places to Visit in Kedarnath Trip
भैरव मंदिर – Bhairav Mandir Kedarnath
केदारनाथ धाम पासून 500 मीटर अंतरावर हे मंदिर आहे. तुम्ही इथे देखील भेट देऊ शकतात.
वासुकी ताल – Vasuki Tal
तुम्हाला ग्लेशियर तलावाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही वासुकी ताल म्हणजेच या तलावाला भेट देऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला 5 ते 6 तास ट्रेक करावी लागेल. म्हणजे तुम्हाला 1 दिवस आणखी केदारनाथ येथे थांबावे लागेल.
गांधी सरोवर – Gandhi Sarovar
हे देखील एक सुंदर ठिकाण आहे.
केदारनाथ ट्रीप साठी मुख्य टिप्स – Tips for Kedarnath Trip
केदारनाथ ट्रीपला जात असताना खालील टिप्स नक्की फॉलो करा,
- केदारनाथ ट्रीपला जात असताना तुमच्या सोबत तुमच्या आरोग्याच्या अनुसार औषधे घेऊन जा.
- शक्य असेल तर ट्रेकिंग शूज वापर करा.
- ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांनी सुरुवात सकाळी करा आणि हळू हळू थांबत ट्रेक पूर्ण करा.
- जाताना प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत जा. फोटो आणि व्हिडिओ काढत ते क्षण सोबत घेत जा.
- सोबत रेनकोट घेऊन जा. थंडी साठी कामी येईल असे जर काही कपडे असतील तर ते आवश्यक वापर करा कारण उन्हाळयात सुद्धा इथे तापमान अचानक बदलू शकते.
- सोबत गरजेच्या वास्तूचं घेऊन जा.
- तुम्हाला कमी खर्च करायचा असेल तर आश्रम सारख्या ठिकाणी राहू शकतात.
- गौरी कुंड मध्ये हॉटेल्स कमी आहेत मात्र जर तुम्हाला तिथे जागा मिळाली तर योग्यच आहे.
- गुप्तकाशी सारख्या ठिकाणी देखील तुम्ही राहू शकतात. मात्र हे सोंनप्रयाग आधी मिळेल.