प्रयागराज मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Prayagraj in Marathi (Part 1)

20230710_191050.jpg

प्रयागराज मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Prayagraj in Marathi (Part 1)

प्रयागराज जाण्याचा विचार करत असाल, तर आपल्याला हा संपूर्ण लेख तुमच्या प्रयागराज ट्रीपला अत्यंत आनंददायी आणि सुखमय बनवण्यासाठी खुप मदत करेल. प्रयागराज मध्ये आपल्याला त्रिवेणी संगम तसेच लहान (मिनी) कुंभमेळा, सोबत आणखी काय काय वेग वेगळे ठिकाणे बघायला मिळणार आहेत, हे आपण आज जाणून घेणार आहोत या लेखामध्ये.

आज आपण या लेखाच्या माध्यमातून प्रयागराज मधील प्रमुख ठिकाणे पाहणार आहोत. जवळपास सर्व पर्यटन ठिकाणांन विषयी माहिती घेणार आहोत. यामध्ये तुम्ही जर प्रयागराज मध्ये असाल तेव्हा तुम्ही भेट द्याव्या अशा सर्व ठिकाणांची आम्ही यादी केली आहे. अशा सर्व ठिकाण बद्दल या लेखांमध्ये माहिती पण आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणाची थोडक्यात माहिती देणार आहोत त्यांची प्रवेश टिकते किती आहेत तसेच आणि भेट देण्याची सर्वात उत्तम वेळ काय, असेन अशी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

प्रयागराज जिथे त्रिवेणी संगम होतो त्याचा अर्थ यमुना, गंगा आणि सरस्वती याचा संगम होतो, अशा जागेला प्रयागराज म्हणून ओळखले जाते.

प्रयागराजला कसे पोहोचाल? How to reach Prayagraj

बस: जर तुम्ही उत्तर भारतातून प्रवास सुरू केल्यास, उत्तर भारतातील प्रत्येक शहरातून प्रयागराज ला जाण्यासाठी बसेस आहेत. वाराणसी ते पर्याग राज हे अंतर 121 किलोमीटर आहे.

रेल्वे: प्रयागराज हे मोठे शहर असल्याने येथे तुम्हाला संपूर्ण भारतातून सरळ प्रयागराज साठी रेल्वे गाडी मिळेल.

जर तुम्ही प्रवास उत्तर भारतातून सुरू केला, असेल तर उत्तर भारतातील प्रत्येक शहरातून प्रयागराज ला जाण्यासाठी बसेस आहेत. दिल्ली ते प्रयागराज हे अंतर 720 किलोमीटर आहे तसेच उत्तर प्रदेश ते प्रयागराज मधील अंतर 357 किलोमीटर आहे आणि लग्न होते, प्रयागराज मधील अंतर 201 किलोमीटर आहे. आणि याचे भाडे वेळेनुसार आणि अंतर नुसार बदलत असते.

विमान: प्रयागराज हे शहर मोठे आहे या ठिकाणी विमानतळ आहे प्रयागराज हे शहर पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते, त्यामुळे येथे पर्यटकांचे येणे जाणे चालू असते. विमानतळ पासून प्रयागराज हे 14 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे, येथून तुम्ही टॅक्सी किंवा रिक्षा घेऊन, आपल्या आवडत्या पर्यटन स्थळांना जाऊ शकतात.

स्वतःची गाडी: प्रयागराज मध्ये भरपूर वेळा ट्रॅफिक दिसून येते, कारण हे पर्यटन स्थळ असूनही धार्मिक स्थळ देखील आहे. जर तुम्हाला प्रयागराज मध्ये ट्रॅफिक मध्ये अडकायचे नसेल, तर लवकर सकाळी पहाटे आपला प्रवास चालू करा ज्यामुळे ट्रॅफिक मध्ये अडकण्याची शक्यता कमी होईल.

प्रयागराज मध्ये राहण्याची व्यवस्था कोठे होईल? Where to Stay in Prayagraj

प्रयागराज हे शहर पर्यटन आणि धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते या ठिकाणी हॉटेल्स धर्मशाळा हॉस्टेल्स सगळे राहण्यासाठी सुविधा उपलब्ध आहेत. येथे फॅमिलीसाठी मोठे रूम देखील उपलब्ध आहेत, आपल्या सोयीनुसार रूम्स आपण घेऊ शकतात.

आमचे मत असे आहे की रेल्वे स्थानक जवळच रूम घ्या, म्हणजे स्टेशन पासून तुम्ही वाटेल त्या ठिकाणी जाऊ शकतात.

प्रयागराज मध्ये भेट देण्यासाठी ठिकाणे – Places to Visit in Prayagraj

  1. त्रिवेणी संगम

आपण प्रयाग्रज मध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले ठिकाण त्रिवेणी संगम येथे जाऊ शकता. त्रिवेणी घाट गेल्यावर आपण बोट घेऊन गंगा आणि यमुना जिथे मिळतात तेथे जाऊ शकतात तेथे जाण्यासाठी बोटचे तिकीट 120 प्रति हेड रुपये असे आहे. बोटचे तिकीट हे महा कुंभमेळा असल्यावर ती जास्त असतात. हे महाग वाटते पण ते बोट चालवणाऱ्या कामगारांसाठी कमीच आहे

त्रिवेणी संगम फिरण्याचे सर्वात चांगला काळ म्हणजे ऑक्टोबर पासून फेब्रुवारी पर्यंत, या त्रिवेणी संगम वरती सगळ्यात मोठा मेळा लागतो ज्याला कुंभचा वेळा असं म्हणतात, या ठिकाणाचे कोणतेही तिकीट नाही आणि हे 24 तास चालू असत.

त्रिवेणी संगम चे भारतातील सर्वात मोठ्या धार्मिक स्थळ येत आहे. कारण येथे तीन नद्या एकामेकांना मिळतात गंगा यमुना आणि सरस्वती पण आता यमुना नदी विलुप्त होत आहे, कारण तिचे पाणी कमी होत आहे. असे म्हणतात की या तीन नद्यांच्या संगम मध्ये अंघोळ/ स्नान केल्यावरती सगळे पाप नष्ट होतात.

केवळ भारतातूनच नाही तर संपूर्ण जगातून येथे लोक स्नान करायला येतात. येथे संध्याकाळीची आरती पहाणे हे सगळ्यात चांगले आहे. असे देखील म्हणतात की जर आपण मेलेल्या माणसांची राख टाकू तर त्यांना मोक्ष भेटेल.

  1. कुंभ मेळा

असे म्हणतात की भगवान विष्णु जेव्हा अमृत घेऊन जात होते. तेव्हा त्यांच्या भांड्यातून अमृत चे चार थेंब चार ठिकाणी पडले होते त्यामध्ये प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक आहेत.

त्यामुळे मानतात की प्रयागराज ची जागा ही सर्वात पवित्र आहे, प्रयागराज या शहरांमध्ये सगळ्यात मोठे मेळे लागतात त्यामध्ये महा कुंभमेळा, अर्ध कुंभमेळा आणि माघ मेळा असे आहे.

माघ मेळा दरवर्षी लागतो. माघ मेळा असल्यावर आपण त्या ठिकाणी आपली गाडी घेऊन जाऊ शकत नाही कारण तेथे खूप जास्त गर्दी असते, तर आपल्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी इलेक्ट्रिकल गाडी वापरू शकतो, यामध्ये आपल्या फॅमिली मधील चार व्यक्ती जाऊ शकतात.

अर्ध कुंभमेळा हा मेळा दर 6 वर्षामध्ये एकदा लागतो आणि मग त्यावेळेस 2019 मध्ये लागला होता.

सगळ्यात मोठा मेळा म्हणजे महा कुंभमेळा हा मेळा बारा वर्षांमध्ये एकदा लागतो, मागच्या वेळेस हा मेळा 2013 मध्ये लागला होता आणि त्यावेळेस बारा कोटी लोक त्या मेळ्यामध्ये समाविष्ट झाले होते. आणि पुढचा येणारा महा कुंभ मेळा हा 2025 मध्ये लागणार आहे.

पुढील लेखात आपण आणखी काही प्रयागराज मधील पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे दुसरा भाग वाचायला विसरू नका.

प्रयागराज मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Prayagraj in Marathi (Part 2)

0 Replies to “प्रयागराज मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Prayagraj in Marathi (Part 1)”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top