ऋषिकेश मधील धार्मिक आणि पर्यटन स्थळे || Devotional & Tourist Places to Visit in Rishikesh in Marathi

20230702_202749.jpg

ऋषिकेश मधील धार्मिक आणि पर्यटन स्थळे || Devotional & Tourist Places to Visit in Rishikesh in Marathi

तुम्ही देखील ऋषिकेश जाण्याचा विचार करत आहात का? तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऋषिकेश मध्ये फक्त रिव्हर राफ्टिंग नाही तर याशिवाय अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही नक्की भेट देऊ शकतात. 

आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ऋषिकेश मधील अनेक पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे याविषयी माहिती सांगणार आहोत. याशिवाय लेखातून तुम्हाला कोणत्या जागेला कधी भेट देणे योग्य असेल हे देखील समजेल. मुख्यतः तुम्ही जर आठवडी सुट्ट्यांच्या काळात म्हणजेच विकेंड ला जाणार असाल तर तुमच्यासाठी काही खास टिप्स देखील आहेत, त्यामुळे लेख पूर्ण वाचायला विसरू नका.

  1. निरगढ धबधबा (Neer Garh Waterfall)

टीप: जर तुम्ही स्वताच्या वाहनाने ऋषिकेश साठी येत असाल तर इथे येऊन तुमची गाडी पार्क करा आणि इथे मिळणाऱ्या स्कूटी च्या मदतीने ऋषिकेश फिरण्यास सुरुवात करा.

तपोवन पासून निरगढ धबधबा हा 5 किलोमिटर अंतरावर आहे. तपोवन हे ठिकाणी ऋषिकेश मधील मध्य स्थान आहे. जवळपास 2 किलोमिटर पर्यंत रस्ता हा मुख्य रस्त्याला लागून आहे. नंतर तुम्हाला एका वळणावर दुसरा रोड लागेल त्याने तुम्ही वरच्या बाजूला जाऊ शकतात. 

मुख्य धबधबा पाहण्यासाठी तुम्हाला स्कूटी पार्क करून मग काही अंतर पायी ट्रेक करत तुम्हाला पोहोचायचे आहे. तुम्हाला सर्वात आधी एक जागा दिसेल जिथे तुम्ही मनसोक्त डबण्याचा आनंद घेऊ शकतात. तुम्ही जसे जसे वर ट्रेक कट्टा जाल तुम्हाला असे छोटे छोटे धबधबे आणि त्यांच्या खाली काही जागा दिसेल. पहिला धबधबा हा तुमच्या स्कूटी लावलेल्या ठिकाणापासून 900 मीटर अंतरावर आहे. इथे तुम्हाला तुमचा 2 ते 3 तास वेळ सहज घालविता येईल. सर्वात उंचावर असलेला धबधबा हा मोकळ्या जागेत असून तिथे तुम्हाला धबधबा पाहण्यासाठी एक पुल देखील बांधून दिलेला आहे. 

आमचा तुम्हाला एक सल्ला असेल की तुम्ही सकाळी लवकर इथे पोहोचाल तर खूप कमी गर्दी असेल. गर्दी कमी असल्याने तुम्हाला इथे आनंद देखील मनसोक्त घेता येईल.

अनेक लोक हा ट्रेक खूप मोठा आणि सरळ असल्याने शेवटच्या ठिकाणापर्यंत जात नाहीत. तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला वेळ जास्त लागेल थकवा देखील जाणवेल मात्र आनंद वेगळा असेल. जाताना तुम्हाला अनेक खाण्याची ठिकाणे आणि स्टॉल दिसतील. यात तुम्ही खाण्यासाठी काहीतरी विकत घेऊ शकतात आणि धबधब्याच्या काठी बसून त्याचा आनंद घेऊ शकतात. 

  1. त्रिवेणी घाट (Triveni Ghat)

ऋषिकेश मध्ये येऊन जर तुम्ही त्रिवेणी घाट बघितला नाही तर तुम्ही काहीच अनुभवले नाही. तुम्ही इथे भेट दिली म्हणजे तुमचा दिवसच बनून जातो. 

त्रिवेणी घाटावर देखील इतर घाटां प्रमाणे आरती होते. सायंकाळी 4 च्या दरम्यान इथे पोहोचाल तर तुम्हाला एक योग्य ठिकाण मिळेल जिथून तुम्हाला आरती योग्य प्रकारे दिसेल. त्यानंतर 6 वाजेच्या आसपास आरती सुरू होते. फक्त भारतातून नव्हे तर संपूर्ण जगभरातून अनेक लोक आरती साठी इथे येतात. आरती संपल्यानंतर तिथे खूप आनंददायी वातावरण तयार होते आणि सर्व लोक आनंदात नाच्ण्यास सुरुवात करतात. 

तपोवन पासून याचे अंतर 5 किलोमिटर असून या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. त्यामुळे प्रयत्न करा की इथे येत असताना स्कूटी वरच या. त्रिवेणी घाटाच्या बाहेर तुम्हाला अनेक दुकाने दिसतील जिथे तुम्ही झुमके किंवा महिलांसाठी काही दागिने घेऊ शकतात. त्रिवेणी घाटावर अनेक दुकाने असतात तिथे तुम्ही काहीतरी छोट्यामोठ्या गोष्टी खाऊ शकतात. 

  1. द सिक्रेट वॉटर फॉल ( The Secret Waterfall)

नावात जरी सिक्रेट असेल तरी देखील आता हे ठिकाण काही सिक्रेट राहिलेले नाही. तपोवन पासून याचे अंतर 2 किलोमिटर असून स्कूटी वापरून तुम्ही इथे पोहोचू शकतात. काही लोक गाड्यांनी तुम्हाला जाताना दिसतील मात्र जागा इतकी छोटी आहे की गाड्या घेऊन जाणे शक्य नाही. 

तुम्हाला मुख्य धबधब्याच्या जवळ जाण्यासाठी स्कूटी पार्क करून 100 मीटर पायी चालत जावे लागेल. 

धबधबा हा छोटा आहे आणि त्यामुळे कदाचित तुम्हाला या पेक्षा निरगढ धबधबा जास्त आवडेल. इथे खूप सारे लोक शांत असतात आणि पाण्यात दुंबण्याचा आनंद देखील घेत होते. इथे पाणी खूप गार असते आणि पाण्यात तुम्हाला लहान मासे देखील बघायला मिळतात. इथे तुम्हाला एक मंदिर देखील दिसेल. सोबतच हिरवळ मोठ्या प्रमाणात असून तुम्ही कुठेही बसून शांतता अनुभवू शकता. एक छोटा तलाव पर्यटकांना आकर्षित करतो कारण इथे पाणी खूप शुद्ध दिसते. 

  1. राम झुला आणि लक्ष्मण झुला ( Ram Jhula and Laxman Jhula)

हे दोन्ही पुल एक सारखेच बनलेले असून त्यांची उंची ही 60 फूट आहे तर लांबी 450 फूट इतकी आहे. तुम्हाला यावर फक्त पायी जाता येते. तुमच्याकडे स्कूटी असेल तर तुम्ही स्कूटी ने देखील एका बाजूने दुसरीकडे जाऊ शकतात. तुम्ही ज्यावेळी या पुलावरून जाल तेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारे कंपन अनुभवायला मिळेल. 

रात्रीच्या वेळी इथे तुम्हाला विलोभनीय दृश्य बघायला मिळतील. राम झुला हेच ठिकाण रिव्हर राफ्टिंग चे शेवटचे ठिकाण आहे. इथे येऊनच तुमची रिव्हर राफ्टिंग संपते. 

पुढील ठिकाणांची माहिती आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत. त्याआधी जाता जाता आपण ऋषिकेश मध्ये थांबणार कसे याविषयी माहिती जाणून घेऊयात. 

ऋषिकेश मध्ये राहण्याची व्यवस्था – Where to Stay in Rishikesh?

तुम्हाला हरिद्वार ते ऋषिकेश मार्गावर अनेक हॉटेल्स मिळतील मात्र राहण्यासाठी सर्वात योग्य जागा ही तपोवन आहे. कारण हे ऋषिकेश मधील मध्य स्थान असून इथून सर्व जागा जवळच अंतरावर आहेत. 

जर तुम्ही आठवड्याच्या कामांच्या दिवसात आला तर तुम्हाला 800 रूपये पासून हॉटेल्स मध्ये रूम मिळतील. आठवडी सुट्ट्यांच्या काळात मुख्य रस्त्यावर तुम्हाला 3000 रुपये इतक्या दरात रूम्स मिळतील तर थोडे आत गेल्यास तुम्हाला 2000 रुपये पासून सुरू होणाऱ्या दरात रूम्स मिळतील. 

ऋषिकेश पोहोचल्यानंतर लगेच हॉटेल बुक करा कारण रात्र होताना गर्दी देखील वाढते आणि त्यामुळे पैसे देखील जास्त द्यावे लागतात. 

ऋषिकेश मधील धार्मिक आणि पर्यटन स्थळे || Devotional & Tourist Places to Visit in Rishikesh in Marathi (Part 2)

0 Replies to “ऋषिकेश मधील धार्मिक आणि पर्यटन स्थळे || Devotional & Tourist Places to Visit in Rishikesh in Marathi”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top