ऋषिकेश मधील धार्मिक आणि पर्यटन स्थळे || Devotional & Tourist Places to Visit in Rishikesh in Marathi (Part 2)

20230702_202803.jpg

ऋषिकेश मधील धार्मिक आणि पर्यटन स्थळे || Devotional & Tourist Places to Visit in Rishikesh in Marathi (Part 2)

आपण मागील भागात ऋषिकेश विषयी एक सुरुवातीची गरजेची माहिती बघितली. आपण त्या लेखात जवळपास मुख्य 4 ठिकाणांची माहिती आणि ऋषिकेश मध्ये कसे रहाल, खाण्याची आणि राहण्याची सोय सोबतच राम झुला , लक्ष्मण झुला, निरगढ धबधबा, द सिक्रेट वॉटर फॉल, त्रिवेणी घाट आणि त्यांना भेट देण्याची योग्य वेळ बघितली. आज आपण इतर काही मुख्य ठिकाणे आणि त्याविषयी जाणून घेणार आहोत. 

ऋषिकेश मधील धार्मिक आणि पर्यटन स्थळे || Devotional & Tourist Places to Visit in Rishikesh in Marathi

ऋषिकेश हे उत्तराखण्ड राज्यातील एक महत्वाचे धार्मिक स्थळ असून यामध्ये अनेक धार्मिक स्थळे तर आहेत मात्र यासोबतच अनेक पर्यटन स्थेल असल्याने इथे असंख्य पर्यटक येतात. पर्यटकांची गर्दी ही सुट्ट्यांच्या काळात जास्त असते आणि त्यामुळे जर तुम्हाला अशा ठिकाणी जर मनसोक्त आनंद लुटायचा असेल आणि कमी गर्दी हवी असेल तर कामांच्या दिवसात म्हणजेच सुट्ट्यांचे दिवस सोडून तुम्ही ऋषिकेश ला आणि उत्तराखण्ड मधील कोणत्याही जागेला कधीही भेट देऊ शकतात. 

5. रिव्हर राफ्टिंग (River Rafting)

उत्तराखंड मध्ये येऊन जर रिव्हर राफ्टिंग केले नाही तर तुम्हाला त्या राज्याची मजाच अनुभवता आली नाही असे म्हणता येईल. ऋषिकेश मध्ये तुम्हाला राफ्टिंग मध्ये देखील वेगवेगळे प्रकार अनुभवायला मिळतील. यात 9 किलोमिटर, 16 किलोमिटर आणि 26 किलोमिटर असे प्रकार आहेत. तुम्ही जर राफ्टिंग साठी जात असाल तर स्वतःसोबत काही अन्य कपडे देखील घेऊन जा. त्यांना सोबत ना ठेवता कोणाकडे तरी देऊन ठेवा. 

राफ्टिंग साठी सरासरी दर हे 9 किलोमिटर साठी 500 रुपये प्रति व्यक्ती, 16 किलोमिटर साठी 1000 रुपये प्रति व्यक्ती तर 26 किलोमिटर साठी 1500 रुपये प्रति व्यक्ती इतकी असते. 

इथे कोणत्याही प्रकारे फिक्स दर नाहीत. विक डे आणि विकेंड नुसार हे दर बदलतात. सिझन नुसार देखील यामध्ये बदल असतात. राफ्टिंग करत असताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. याविषयी सर्व सूचना तुम्हाला राफ्टिंग सुरू करण्याआधी मिळतील. 

6. द बीटल्स आश्रम ( The Beatles Ashram)

हा आश्रम खूप जुना असून खूप काळ बंद राहिल्यानंतर आता त्याला पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. तुम्हाला इथे फोटो आणि व्हिडिओ साठी अनेक जागा मिळतील. या ठिकाणचा एक इतिहास देखील आहे. इथले प्रत्येक ठिकाण हे अद्भुत असून इंस्टाग्राम साठी तुम्हाला अनेक पोस्ट नक्की मिळतील. 

तपोवन वरून याचे अंतर जास्त नाही मात्र त्यासाठी तुम्हाला स्कूटी वापरावी लागेल. तुम्हाला जर स्वताच्या गाडीने जायचे असेल तर मग तुम्हाला गंगा नदी ओलांडण्यासाठी खूप अंतर पार करावे लागेल. 

बीटल्स आश्रमाची वेळ ही सकाळी 10 ते सायंकाळी 4 इतकी आहे. 

7. वशिष्ठ गुफा (Vashishta Gufa)

असे सांगितले जाते की या ठिकाणी 7 ऋषि पैकी एक असलेले वशिष्ठ ऋषी ध्यान साधनेसाठी बसले होते. त्यामुळेच या जागेला नाव हे वशिष्ठ गुफा असेल ठेवलेले आहे.

तपोवन पासून हे ठिकाण 18 किलोमिटर अंतरावर आहे. जवळपास अर्ध्या तासात तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकतात. इथे तुम्ही स्वताच्या गाडीने देखील जाऊ शकता कारण या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या होत नाही. 

8. बंजि जंपिंग (Bungee Jumping)

ऋषिकेश मध्ये तुम्ही बंजी जम्पींग देखील करू शकतात. इथे तुम्हाला प्रत्येक व्यक्तीसाठी 3500 रुपये इतका खर्च असेल. ऋषिकेश मध्ये 2 ठिकाणी तुम्हाला बंजि जंपिंग साठी पर्याय उपलब्ध आहे. 

बंजि जंपिंग करण्यासाठी काही अटी घालण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये तुमचे वय हे 12 ते 45 दरम्यान असायला हवे. तुमचे वजन हे 40 किलो पेक्षा जास्त असायला हवे. बंजि जंपिंग साठी वेळ ही सकाळी 9 वाजून 30 मिनिटे ते दुपारी 3 वाजून 30 मिनिटे इतकी आहे. बंजि जंपिंग या आठवड्यातून एक दिवस म्हणजेच मंगळवारी बंद असतात. तपोवन पासून जवळपास 17 किलोमिटर अंतरावर असलेले मोहांचात्ती येथे ही सुविधा उपलब्ध आहे आणि यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग देखील करता येते.

9. राजाजी नॅशनल पार्क (Rajaji National Park)

राजाजी नॅशनल पार्क हा व्याघ्र संवर्धन प्रकल्प असून याठिकाणी देखील तुम्हाला जंगल सफारी चा आनंद घेता येतो. ऋषिकेश पासून हरिद्वारला जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. त्यातील एक म्हणजे मुख्य रस्ता आणि दुसरा म्हणजे जंगलातून जाणारा रस्ता. या जंगलातून जाणाऱ्या रस्त्याने तुम्ही इथे पोहोचू शकतात. या रस्त्याला चिलाडाम रोड असे नाव आहे. 

ऋषिकेश कसे पोहोचाल? (How to Reach Rishikesh?)

आता आपण जाणून घेऊयात की आपण ऋषिकेश मध्ये नक्की कसे पोहोचू शकतात. 

दिल्ली पासून ऋषिकेश हे अंतर जवळपास 270 किलोमिटर इतके आहे. स्वताच्या गाडीने 5 ते 5:30 तासात तुम्ही ऋषिकेश येऊ शकतात. विकेंड असेल तर तुम्हाला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. मात्र जर तुम्ही सकाळी लवकर निघाला तर तुम्हाला नक्की यातून सुटका मिळू शकते. 

ऋषिकेश मध्ये स्कूटी किंवा बाईक चे भाडे – Rent of Scooty & Bike in Rishikesh

स्कूटी घेऊन फिरणे हा ऋषिकेश मधील सरवता उत्तम पर्याय आहे. इथे तुम्हाला स्कूटी साठी 600 रुपये प्रति दिवस भाडे द्यावे लागेल. तुम्हाला जर भाड्याने बाईक घ्यायची असेल तर तुम्हाला त्यासाठी 1200 रुपये पासून दर द्यावे लागतील. तुम्हाला या ठिकाणी एक तुमचे ओळखपत्र द्यावे लागेल. ते त्यांच्याकडे राहील. याशिवाय तुम्हाला 1000 ते 1500 रुपये सुरक्षा निधी देखील त्यांच्याकडे द्यावा लागेल. 

ऋषिकेश मध्ये तुम्हाला जर कॅम्पिंग करायची असेल तर त्यासाठी कँपिंगचे पर्याय उपलब्ध आहेत. ऑनलाईन तुम्ही शोधले तर तुम्हाला हे पर्याय देखील मिळतील. शिवपुरी येथे काही कॅम्पिंग स्पॉट आहेत आणि सिक्रेट वॉटर फॉल असलेल्या मार्गावर देखील कॅम्पिंग पर्याय उपलब्ध आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top