कोकणातील मान्सून मध्ये भेट द्यावी अशी 3 मंदिरे || 3 Temples from Kokan you must visit in Monsoon

20231008_113336.jpg

महाराष्ट्र आणि मान्सून … एक अप्रतिम कॉम्बिनेशन म्हणा की! महाराष्ट्रात कोकण प्रांत म्हणजे निसर्ग सौंदर्याच. मान्सून मध्ये तर कोकणात तुम्हाला सर्वात हिरवळ बघायला मिळते. अनेक ठिकाणी नद्या वाहतात आणि त्या नद्यांवर कोसळणारे धबधबे तर सौंदर्यात आणखीच भर घालतात. 

कोकणात आपल्याला अनेक मंदिरे बघायला मिळतात. ही मंदिरे मान्सून मध्ये अधिकच सुंदर दिसतात. आजच्या लेखातून आपण कोकणातील काही प्रमुख मंदिरे बघणार आहोत जी आपण पावसाळ्यात नक्कीच बघायला हवीत.

तुम्हाला लेखातून मंदिरांची नवे, मंदिरापर्यंत कसे पोहोचता येते, तुम्हाला इथे काय काय बघायला मिळेल याविषयी सविस्तर माहिती मिळणार आहे. 

मार्लेश्वर देवस्थान मारळ – Marleshwar Temple Maral information in Marathi

मार्लेश्वर हे मारळ येथील शंकराचे मंदिर आहे. रत्नागिरी पासून जवळपास 60 किलोमिटर अंतरावर हे मंदिर स्थित्त आहे. रत्नागिरी पासून या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला बस ची सुविधा उपलब्ध आहेत. याठिकाणी तुम्हाला दुचाकी किंवा चारचाकी वाहने देखील भाडे तत्वावर मिळतील. 

मार्लेश्वर हे मंदिर एका डोंगरावर स्थित असल्याने त्याला आपण मान्सून मध्ये भेट नक्की द्यायला हवी. मंदिरापर्यंत पोहोचत असताना तुम्हाला एक डोंगर चढावा लागतो आणि वर जाताना तुम्हाला पायऱ्या आहेत. वाटेत तुम्हाला अनेक धबधबे बघायला मिळतात. जाताना तुमच्या बाजूनेच एक नदी वाहत असते. 

मंदिरात गेल्यानंतर मंदिराच्या मागेच तुम्हाला एक धबधबा बघायला मिळतो. मंदिर परिसरातून हा धबधबा आपल्याला बघता येतो. पाण्याचा प्रवाह जर कमी असेल तर मंदिराच्या पाठीमागे उतरून तुम्ही या धबधब्याच्या अगदी जवळ जाऊ शकतो. धबधब्याच्या पर्यंत पोहोचणे देखील या मंदिर भेटीत असलेला आणखी साहसी अनुभव आहे. 

पोखरबाव गणपती मंदिर -Pokharbav Ganpati Temple information in marathi

देवगड या ठिकाणी हे मंदिर स्थित आहे. देवगड बीच किंवा देवगड बस स्थानक इथ पर्यंत तुम्ही आला असाल तर तिथून 12 किलोमिटर अंतरावर हे मंदिर आहे. देवगड पासून इथपर्यंत प्रवास हा बसणे किंवा रिक्षा ने देखील करता येतो. देवगड मध्ये तुम्हाला दुचाकी आणि चारचाकी वाहने भाडे तत्वावर मिळतात. 

हे मंदिर तुम्ही मान्सून मध्येच बघायला हवे कारण इथे या काळात तुम्हाला एक अनोखी गोष्ट बघायला मिळते. इथे तुम्हाला एक स्वयंभू शिवलिंग बघायला मिळेल. हे मंदिर तसे गणपतीचे आहे मात्र समोर तुम्हाला एक शिवलिंग बघायला मिळते.

गणपती मंदिराच्या खाली 3 मजले उतरले की तिथे तुम्हाला एक पांडवकालीन विहीर बघायला मिळेल. पावसाळ्यात ही विहीर तुडुंब भरून यातून पानी वाहत असते आणि हे दृश्य बघायला खूप सुंदर वाटते. 

शिवलिंगाला येते श्री ओम करेश्र्वर शिवपिंड म्हणून ओळखले जाते. अनेक वर्षे ही शिवपिंडी पाण्यात होती. येथील पुजारी असलेले श्रीधर राऊत दाभोळे यांना स्वप्नात दृष्टांत होतो आणि सांगितले जाते की गणपतीच्या पायथ्याशी एक विहीर आहे आणि या विहिरीतून एक व्यक्ती शिवपिंड वर घेऊन येतो. 

पुढे अनेक वर्षे पिंडीचा शोध सुरू होता मात्र एकदा गणपतीच्या पायथ्याचे काम सुरू असताना जेव्हा पाण्यात दगड फोडले जात होते तेव्हा त्यांना एक स्वयंभू गोलाकार दगड पंचमुखी सापडला. त्यालाच पुढे शिवलिंग म्हणले जाते आहे. 

हिरण्यकेशी मंदिर आंबोली – Hiranyakeshi Temple Amboli Information In Marathi

हे मंदिर प्रत्येकाने मान्सून मध्ये नक्कीच बघायला हवे. आजकाल याचे रिल्स instagram सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हिरण्यकेशी मंदिर हे पार्वती मातेचे एक मंदिर आहे. आंबोली घाटात सावंतवाडी पासून हे मंदिर 30 किलोमिटर अंतरावर आहे. तुम्हाला इथे बसणे येता येते. सावंतवाडी वरून तुम्हाला रिक्षा देखील मिळतात. 

मंदिरात तुम्हाला एका नदीचे उगमस्थान बघायला मिळते. हिरण्यकेशी या नावाची नदी या मंदिरातून उगम पावते. मंदिराच्या गाभाऱ्यात नदी उगम पावते तर समोर तुम्हाला एका तळ्यात नेहमी स्वच्छ पाणी बघायला मिळते. 

मंदिराचे ठिकाण आणि वातावरण इतके जास्त सुंदर असते की तुम्हाला इथे एकदा नक्कीच भेट द्यावी वाटेल

कोकणात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांना तुम्ही मान्सून मध्ये भेट देऊ शकतात मात्र त्यातील हे 3 मंदिरे खूप महत्वाची आहेत. तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात या मंदिरांमध्ये स्वर्गसुख जणू अनुभवायला मिळेल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top