धार्मिक स्थळ हरिद्वार विषयी माहिती || Haridwar Information in Marathi

20231019_092405.jpg

हरिद्वार म्हणजे “हरीचे द्वार”. हे भारतातील प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे. हरीद्वार सर्वात प्राचीन शहरांपैकी एक असून हे एक अति पवित्र स्थान मानले जाते हिंदूंसाठी हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. उत्तराखंड राज्यमध्ये हरिद्वार जिल्हा स्थित आहे. हरिद्वार मध्ये ब्रह्म घाट मनसादेवी मंदिर चंडी देवी मंदिर असे अनेक स्थळे आहेत जिथे अनेक भाविक दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी येतात आजच्या लेखात आपण हरिद्वार विषयी माहिती बघूया.

ब्रह्म घाट किंवा हर की पौरी (Bramha Ghat or Har ki pauri)

ब्रह्म घाट किंवा हर की पौरी हे हरिद्वार चे मुख्य ठिकाण आहे. हरिद्वार हे अत्यंत प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. हर की पोरी हे स्थान रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. हर की पौरी हे हरिद्वारचा प्रसिद्ध असा घाट आहे आणि हा सर्वात पवित्र घाट मानला जातो. याच हरकी पौरी ठिकाणी कुंभमेळ्यात लाखो श्रद्धाळू उपस्थित असतात आणि तिथे पवित्र स्नान करतात.
समुद्रमंथनानंतर घागरी घेऊन जाताना धन्वंतरीच्या घागरीतून चार अमृताचे थेंब पडले त्यातील एक थेंब हरिद्वार येथे पडला. तसेच येथे भगवान विष्णू पृथ्वीवर आले होते असे म्हटले जाते म्हणून यास हर की पौरी दर चार वर्षांनी या चार ठिकाणांपैकी आळीपाळीने एका ठिकाणी कुंभमेळा भरतो. म्हणजेच प्रत्येक बारा वर्षानंतर हरिद्वार येथे महाकुंभ मेळा भरतो.
ज्या ठिकाणी अमृताचा थेंब पडल्यात त्यास ब्रह्मकुंड किंवा हर की पौडी असे म्हणतात. येथे अनेक भाविक पवित्र स्नान करण्यासाठी येतात. येथे स्नान केल्याने मोक्ष प्राप्ती होते असे म्हणतात.

हरिद्वार विषयी संपूर्ण माहिती (Information about Haridwar in Marathi)

हरिद्वार हे एवढे प्राचीन आहे की याचा उल्लेख पुराणात देखील केला गेला आहे. महाभारतात हरिद्वाराला गंगाद्वार म्हणून तर पौराणिक साहित्यात मायाक्षेत्र, कपिला इत्यादी नावांनी संबोधले गेले आहे. हरिद्वार नाव प्रथम पद्मपुराणात वापरले.
गंगा पृथ्वीवर ज्या ठिकाणी आले ते हरिद्वार होय त्यामुळे यास गंगाधर म्हणतात आणि याच कारणामुळे हे देवतांसाठी देखील हे पवित्र तीर्थक्षेत्र बनले. मोक्ष प्राप्ती होते म्हणून या स्वर्गाचे द्वार देखील म्हटले जाते.

भारताच्या हिंदू संस्कृतीचे हरिद्वार येथे आत्म दर्शन होते. हरिद्वार हे चार धाम यात्रेचे प्रवेशद्वार आहे. रोज लाखोंनी श्रद्धाळू येथे भेट देतात.
हरिद्वार हे अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आहे. हर की पौडी पासून मनसदेवी मंदिराकडे आपल्याला गंगेचा सुंदर प्रवाह दिसतो.

गंगा आरती | Ganga Aarti :

हर की पौरी येथे गंगा नदीच्या किनाऱ्यावर गंगा आरती होते. ही आरती खूप मोठी असते आणि लाखोंच्या संख्येत भाविक हजर असतात. या आरतीचे दृश्य नयनदीप असते. गंगा आरती ही दिवसातून दोन वेळेस होते, एकदा सकाळी सहा वाजता आणि एकदा सायंकाळी सहा वाजता. तुमच्या वेळेनुसार तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही आरती करू शकता. साठी लाखोंनी भाविक येतात यामुळे गंगाधर दृश्य दिसणे शक्य होत नाही म्हणून गंगा आरती करण्यासाठी तुम्ही एक दोन तास अगोदर जाऊ शकता कारण अनेक भाविक संबंध दृश्य दिसावे म्हणून अगोदरच उपस्थित असतात. त्यामुळे स्पष्ट दृश्य दिसण्यासाठी अगोदर उपस्थित राहिले तर तुम्हाला गंगा आरती समोरून स्पष्ट बघायला मिळते.

हरिद्वार मनसा देवी मंदिर (Mansa Devi Temple Haridwar)

शिवालिक पर्वतरांगाच्या शिखरावर हे मंदिर स्थित आहे. मनसादेवी मंदिरात दोन मुर्त्या आहे एक आठ हातांची मूर्ती तर एक तीन हाते आणि एक सोंड असलेली मूर्ती आहे. मनसादेवी मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारे देवी आहे असे म्हणतात.
मनसादेवी दर्शनासाठी तुम्ही 30 ते 40 मिनिटांचा प्रवास करत चालत जाऊ शकता. रस्त्यापासून 189 पायऱ्या चढून गेल्यानंतर एक किलोमीटरचा रस्ता चालत जावे लागते.
प्रवास हा जास्त सुंदर आहे कारण जाताना हर चे पाऊल, गंगेचा प्रवाह, नीलधारा दर्शन होते.
जाण्यासाठी रुपयेचा मार्ग देखील उपलब्ध आहे त्यासाठी जाऊन येऊन 144 रुपये फी असते.

चंडीदेवी मंदिर (Chandadevi Temple information in Marathi)

चंडी देवीचे मंदिर हे नील पर्वताच्या शिखरावर आहे. चंड मुंडा या दैत्याचा वध चंडी देवीने येथे केला. आठव्या शतकात आधी शंकराचार्यांनी मुख्य मूर्तीची स्थापना केली. मंदिरा शेजारी संतोषी माता चे मंदिर आणि हनुमान जी आणि त्यांची माता अंजना देवीचे मंदिर आहे. चंडी घाटापासून तीन किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. चढण्या उतरण्याच्या मार्गावर अनेक मंदिरे आहेत हे मार्ग हा अवघड आहेत.
येथेही रोपवेचा मार्ग उपलब्ध आहेत त्यासाठी 191 रुपये खर्च येतो.

मनसादेवी आणि चंडी माता दोन्हींसाठी एकत्र तिकीट काढले तर 214 रुपये लागतात. हे तिकीट जाण्या येण्यासाठी मिळून असते.

पावन धाम (Pavan Dham information in Marathi)

मंदिर दर्शनानंतर तुम्ही पाहून धाम येथे जाऊ शकता. पावन धाम मध्ये काचेच्या आणि आरशाच्या सुंदर सुंदर आकृत्या आणि पुतळे बनवले आहे.

शांतीकुंज (Shantikunj Haridwar information marathi)

शांती कुंज हे एक धार्मिक स्थळ आहे येथे अनेक आध्यात्मिक कोर्स आणि उपक्रम घेतले जातात जसे की योगा कोर्स किंवा संगीत कोर्स. इथे कोर्स केल्यास राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था मोफत मिळते.

हरिद्वार राहण्याची व्यवस्था (Hostels in Haridwar for Stay)

हरिद्वार मध्ये राहण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत ते आपण बघूया.
आश्रम किंवा धर्मशाळा : हरिद्वार मध्ये राहण्यासाठी आश्रम किंवा धर्मशाळा अनेक आहेत. जर तुम्हाला कमी खर्चात प्रवास करायचा असेल तर तुम्ही या पर्यायचा विचार करू शकता आश्रम किंवा धर्म शाळेत राहण्यासाठी 24 तासांचे 200 ते 300 रुपये खर्च होऊ शकतो.
हरिद्वार पासून अर्धा किलोमीटर अंतरावर शिवपुरा हे ठिकाण आहे या ठिकाणी तुम्हाला धर्मशाळा मिळतील आणि हर की पौरी या ठिकाणी देखील तुम्हाला आश्रम आणि धर्मशाळा मिळतात.

खाजगी हॉटेल : दुसरा पर्याय म्हणजे खाजगी हॉटेल. हॉटेलमध्ये तुम्ही रूम घेऊन राहू शकता या रूम 500 रुपये ते आठशे रुपये पासून उपलब्ध आहेत.

खाण्याची व्यवस्था (Food in Haridwar)

हरिद्वार मध्ये खाण्यासाठी तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हर की पोरी परिसरात खूप सारे रेस्टॉरंट आणि भोजनालय आहेत. रेस्टॉरंट आणि भोजनालयात थाळीने किंवा स्पेशल डिश अशा सर्व प्रकारचे जेवण मिळते. जेवणाची थाळी 40 रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. तुमच्या आवडीनुसार आणि बजेट नुसार तुम्ही कुठेही जेवण करू शकता.

हरिद्वार जाण्याचा मार्ग (How can you visit Haridwar?)

हरिद्वार जाण्यासाठी तुम्ही तीन मार्गांचा उपयोग करू शकता. तुम्ही रेल्वे मार्गाने जाऊ शकता, विमान मार्गाने जाऊ शकता किंवा तुम्ही जर जवळपास असाल तर बसने देखील जाऊ शकता आपण प्रत्येक मार्गाने कसे जायचे याची माहिती बघूया.
रेल्वे मार्ग: हरिद्वार मध्ये रेल्वे स्थानक आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या शहरातून किंवा तुमच्या जवळच्या कोणत्याही मुख्य शहरातील रेल्वे स्थानक मध्ये रेल्वे तिकीट बुक करून हरिद्वार पर्यंत रेल्वेने प्रवास करू शकता. तुमच्या रेल्वे स्थानकापासून हरिद्वार पर्यंत थेट रेल्वे नसेल तर तुम्ही तुमच्या शहरापासून दिल्ली रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वेने येऊ शकता आणि तिथून रेल्वेने हरिद्वार पर्यंत पोहोचू शकता.
विमान मार्ग : जाण्यासाठी दुसरा मार्ग म्हणजे विमान मार्ग तुम्ही तुमच्या जवळच्या मुख्य शहरातून विमान मार्गाने देहराडून विमा स्थळापर्यंत येऊ शकता तिथून हरिद्वार हे 40 किलोमीटरच्या अंतरावर आहे हा प्रवास तुम्ही बस किंवा टॅक्सी अशा कोणत्याही उपलब्ध वाहनाने करू शकता.
रस्ता मार्ग : तुम्ही हरिद्वारला रस्त्याने देखील जाऊ शकतात त्यासाठी तुम्ही कार किंवा बस अशा कोणत्याही वाहनाचा उपयोग करू शकता. हा मार्ग जर तुम्ही हरिद्वारच्या जवळ राहत असाल तर जास्त उपयुक्त आहे.

पार्किंग व्यवस्था (Parking Stations in Haridwar)

हरिद्वार मध्ये तुमच्या खाजगी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था आहे. चंदी घाट आणि त्यासारख्या अनेक घाटावर आहे. कारसाठी पार्किंग फीही 75 रुपये तर मोटरसायकल साठी 35 रुपये आहे.

निष्कर्ष (Conclusion)

आपण आजच्या लेखात बघितले की हरिद्वार हे प्रसिद्ध ठिकाण असून त्या ठिकाणी आपण पर्यटनासाठी नक्कीच जाऊ शकतो आणि दर्शनासाठी देखील जाऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top