कृष्णाबाई मंदिर महाबळेश्वर मधील एक अपरिचित ठिकाण || Krishnabai Temple Mahabaleshwar information in Marathi

20231007_083411.jpg

कृष्णाबाई मंदिर महाबळेश्वर मधील एक अपरिचित ठिकाण || Krishnabai Temple Mahabaleshwar information in Marathi

महाबळेश्वर मधील थंड हवेचे ठिकाण म्हणून अनेकांना माहिती आहेत परंतु त्यासोबतच जवळपास 1000 हुन अधिक वर्षांपूर्वीच एक कृष्णाबाई मंदिर देखील महाबळेश्वर मध्ये आहे. आज आपण या मंदिराविषयीच्या लेखाच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत. मंदिराचा इतिहास, मंदिरापर्यंत पोहोचण्याची वाट आणि तिथे आसपास काय आहे ते देखील जाणून घेऊया.

कृष्णाबाई मंदिर विषयी माहिती – Information About Krishnabai Temple In marathi

महाबळेश्वर आणि पाचगणी यासारखे ठिकाण वरती आपण फक्त थंड हवेचा आनंद घेण्यासाठी जात असतो. आपल्याला येथील श्री महाबळेश्वराचे मंदिर त्यासोबतच श्री पंचगंगा मंदिर देखील माहीत असेल परंतु या व्यतिरिक्त देखील अनेक वर्ष जुने असलेलं ऐतिहासिक वारसा असलेलं कृष्णाबाई हे एक सुंदर आणि पवित्र आहे.

कृष्णाबाई मंदिर परिसरात आपल्या भावनांना अगदी पंख फुटल्यासारखा वाटतं कारण इथलं वातावरण शांत आहे. स्वताच्या आतून तुम्हाला इथे सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली नक्कीच जाणवेल.

कृष्णाबाई मंदिराच्या परिसरातून आपल्याला सुंदर अशा कृष्णामाईच दर्शन नक्कीच घेता येतो. त्याचसोबत ग्रामीण भागातील जीवनाचा आनंद देखील तुम्हाला येथे नक्की मिळेल.

कृष्णाबाई मंदिरापर्यंत नक्की कसे पोहोचाल? How to Reach Krishnabai Temple in Mahabaleshwar?

कृष्णाबाई मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग अगदी सोपा आहे. महाराष्ट्र राज्यातील पुणे मुंबई यासारख्या ठिकाणावरून कृष्णाबाई मंदिराला सहज पोहोचता येतात.

मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी देखील रस्ता योग्य प्रकारे आहे. त्यामुळे कुठल्याही वर्गातील म्हणजेच कुठल्याही वयाची लोक मंदिरात दर्शनासाठी येऊ शकतो. तुम्हाला महाबळेश्वर मधून देखील कृष्णाबाई मंदिराकडे येण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीची सुविधा नक्की मिळेल.

पुणे विमानतळ वरून जर तुम्ही येत असाल तर कृष्णाबाई मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी अंतर हे 128 किलो मिटर इतके आहे. महाबळेश्वर पर्यंत जर तुम्ही बस ने प्रवास करून येणार असाल तर तिथून तुम्हाला महाबळेश्वर बस स्थानक ते कृष्णाबाई मंदिर अंतर फक्त 6 किलोमिटर आहे. इथे तुम्हाला खाजगी वाहने मिळतील ज्यांनी तुम्ही कृष्णाबाई मंदिराला भेट देऊ शकतात. 

कृष्णाबाई मंदिरात नक्की काय आहे? What is inside the Krishnabai Temple of Mahabaleshwar?

आता कृष्णाबाई म्हटलं की आपल्याला नक्की वाटतं की देवीचे मंदिर असेल. मात्र महाबळेश्वर मधील कृष्णाबाई मंदिर हे भगवान शंकराला समर्पित आहे. मंदिराच्या आत मध्ये तुम्हाला श्रीकृष्णाची एक मूर्ती बघायला मिळेल. 

मंदिराची निर्मिती ही 1888 मध्ये झाली असावी असे सांगितले जाते. मात्र हे मंदिर पूर्णपणे हेमाडपंथी शैलीतील असून त्याचा निर्मिती काळ हा 1 हजार हुन अधिक वर्षांपूर्वीचा असावा असे वाटते. मंदिराची बांधकाम शैली तर इतकी प्राचीन आहे की कदाचित मंदिर पाच हजार वर्षांपूर्वी बनविले गेले असावे असे देखील अनेकांना जाणवते. मंदिराच्या गाभाऱ्यात आणि बाहेर देखील तुम्हाला दगडात कोरलेले छत आणि त्याचसोबत स्तंभ बघायला मिळतात. आपल्याला हे स्तंभ त्याकाळातील स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना देऊन जातात. 

मंदिराच्या अगदी समोरच तुम्हाला एक गोमुख बघायला मिळेल. गोमुख म्हणजे गायीचं मुख. यातून तुम्हाला समोरच असणाऱ्या कुंडात पाणी पडताना बघायला मिळेल. कुंडातून हेच पाणी पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळते. 

कृष्णाबाई नावाचा इतिहास – history behind name of Krishnabai Temple

आता मंदिर जरी भगवान शंकराला समर्पित असले आत मध्ये श्रीकृष्णाची मूर्ती असले तरी मंदिराच्या नावाचा इतिहास जरासा वेगळा आहे. आपण प्रत्येक जण पंचगंगा मंदिरामध्ये जाऊन नक्कीच दर्शन घेतात. पंचगंगा मंदिरामध्ये आपल्याला पाच नद्यांचा एकत्रित संगम झालेला दिसतो. त्या पाच नद्या म्हणजे कोयना कृष्णा वेण्णा सावित्री आणि गायत्री होय. 

या पाच नद्यांपैकीच एक नदीमध्ये कृष्णा नदी. गोमुखातून जे पाणी बाहेर पडतं ते ठिकाण म्हणजे कृष्णा नदीचे उगम स्थान. कृष्णा नदी या मंदिरातून उगम पावते म्हणून या मंदिराला कृष्णाबाई मंदिर असं म्हटलं जातं. 

कृष्णाबाई मंदिराचा नक्की पत्ता – Exact Location of Krishnabai Temple Mahabaleshwar

कृष्णाबाई मंदिराचा अगदी निश्चित पत्ता हा खालील प्रमाणे आहे –

कृष्णाबाई मंदिर, छोटा पुल, गांगापुरी रस्ता, दानेबाजर, गणपती आळी, वाई, महाबळेश्वर, महाराष्ट्र – ४१२८०३

भारत

तुम्हाला जर कृष्णाबाई मंदिराचे लोकेशन हवे असेल तर त्यासाठी इथे क्लिक करा.

कृष्णाबाई मंदिर दर्शन वेळ – Krishnabai temple Timings

कृष्णाबाई हे मंदिर आठवड्याच्या प्रत्येक दिवशी सकाळी सहा वाजता सुरू होते ते आपण आठ वाजेपर्यंत येथे दर्शन घेऊ शकता. मंदिरात प्रवेश करण्यासाठी कुठल्याही प्रकारे प्रवेश शुल्क आकारले जात नाही. 

कृष्णाबाई मंदिराला भेट देण्याची योग्य वेळ – Best time to visit Krishnabai temple of Mahabaleshwar

महाबळेश्वर मध्ये अपरिचित असलेल्या कृष्णाबाई मंदिराला भेट देण्यासाठी योग्य कालावधी असतो तो म्हणजे पावसाळा आणि हिवाळा. जुलैपासून ते ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत तुम्ही जर या ठिकाणी भेट दिली तर तुम्हाला एक वेगळाच सुखद असा आनंद अनुभवायला मिळेल. 

महाबळेश्वर मधील कृष्णाबाई मंदिराला भेट दिल्यानंतर अनेकांना असं वाटतं की त्यांच्या आयुष्यातील ही एक अविस्मरणीय अशी जागा आहे. 

आज आपण महाबळेश्वर मधील कृष्णा बाई मंदिराची माहिती बघितली. महाबळेश्वर मध्ये असे अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यामुळेच महाबळेश्वरला नवीन महाबळेश्वर आणि जुना महाबळेश्वर या दोन भागात विभागले गेले. तर या जुन्या महाबळेश्वर मध्ये आपल्याला अनेक अपरिचित अशी मंदिरे बघायला मिळतील. आपण या ब्लॉगच्या माध्यमातून पुढे देखील महाबळेश्वर मधील इतरही काही अपरिचित मंदिरांविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top