फुल टाईम भटकंती कशी करू शकता? || How can you Travel Full Time in Marathi? 

20231017_090939.jpg

अनेकांना भटकंतीचा छंद असतो मात्र फुल टाईम भटकंती कशी करता येईल याची योग्य दिशा मात्र प्रत्येकाकडे नसते. तर सर्वात आधी हे लक्षात घेऊयात की फुल टाईम म्हणजेच पूर्णवेळ भटकंती करणे हे शक्य असते का? 

तर याच उत्तर आताच तुम्हाला देऊन टाकतो की हो, आपण भटकंती ही जॉब सारखी अर्निंग सोर्स म्हणून करू शकतो. 

तुम्हाला आज मी अशा काही गोष्टी आणि बाजू सांगणार आहे जेणेकरून तुमचे ट्रॅव्हल हे पॅशन तुम्ही पैसे कमविण्याची एक उत्तम मार्ग म्हणून बनवू शकता. जेणेकरून याकडे तुम्हाला पूर्णवेळ भटकंती प्रोफेशन म्हणून बघता येईल.

फुल टाईम भटकंती साठी तुमच्याकडे काय हवे?

तुमच्याकडे फुल टाईम ट्रॅव्हलिंग म्हणजेच पूर्णवेळ भटकंती करण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत,

  • आवड
  • कामाविषयी निष्ठा
  • काहीतरी सोडण्याची हिंमत 
  • कष्ट करण्याची जिद्द

सुरुवातीच्या काळात कदाचित ही सफर थोडीशी अवघड असेल मात्र पुढील काळात तुम्हाला यामधून कुठलाही त्रास होणार नाही. 

आज आम्ही तुम्हाला जे काही सांगणार आहोत ते तुम्हाला कदाचित इतरही ठिकाणी बघायला मिळेल. मात्र आज आमचे हे शब्द अनुभवातून आले असल्याने कदाचित तुम्हाला मदत करतील.

सुरुवातीच्या काळात तुम्ही जर एखादा जॉब करत असाल तर तो करत असताना देखील तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. विकेंड मध्ये तुम्हाला ट्रॅव्हल करण्यासाठी वेळ भेटू शकतो. मात्र पुढील काळात तुम्हाला पूर्णवेळ तुमच्या आवडीच्या गोष्टी साठी नक्की देता येईल.

  1. हळुवारपणे पुढे जात रहा

तुम्हाला जर फुल टाईम ट्रॅव्हल करायचं असेल तर तुम्हाला पहिले पाऊल घ्यावं लागेल. त्यासाठी एक ट्रीप नक्की आयोजित करा. सुरुवात करण्याचे कारण हेच आहे की तुम्हाला समजायला हवे की तुम्ही तुमच्या सिमांच्या पलीकडे जाऊन राहू शकता का? 

अनेक व्यक्ती असे असतात की ज्यांना फोटो बघून वाटते की हे सोपं आहे मात्र पुढे जाऊन त्यांना त्याच्यातील गांभीर्य कळायला लागते. त्यामुळे तुम्ही जर सुरुवात करत असल तर हळुवारपणे पुढे जा. तुम्ही कमीत कमी 10 ट्रीप करा आणि मग ठरवा की खरंच ही गोष्ट तुमच्यासाठी बनलेली आहे की नाही.

  1. कमी खर्चात ट्रॅव्हल करा

तुम्हाला कमी खर्चात ट्रॅव्हल करता यायला हवं. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे कारण पुढील काळात कदाचित तुमच्याकडे सुरुवातीला तितकी सेव्हींग नसेल. जेणेकरून मग तुमच्या ट्रीप बंद पडू शकतात म्हणून सुरुवातीच्या काळापासून कमी खर्चात ट्रॅव्हल करण्याची सवय लावून घ्या. 

जॉब मधून सेव्हिंग करून मग तुम्ही ट्रीप करू शकतात. पैसे वाचविण्यासाठी तुम्ही काऊच सर्फिंग करू शकता,सरकारी प्रवास वाहने यांचा वापर करू शकतात. तुम्ही जर आधी पासून कमी खर्चात ट्रॅव्हल करत असल तर तुम्ही कंटेंट बनवायला सुरुवात करा. जेणेकरून तुम्हाला अनेक ठिकाणी डिस्काउंट आणि सुविधा मिळतील.

एकदा तुम्ही या फुल टाईम ट्रॅव्हल मध्ये पूर्णपणे सुरू झाला तर मग पुढे जाऊन पैसे येतील आणि मग तुम्हाला लक्सरी गोष्टी देखील अनुभवता येतात.

  1. पैसे कमविण्याची मार्ग

तुम्ही जर जॉब सोडत असाल तर मग फुल टाईम ट्रॅव्हल करत असताना नवनवीन गोष्टी शिकायला सुरुवात करा. जेणेकरून तुम्ही पुढे जाऊन लोकांना कमीत कमी त्या गोष्टी शिकवून तरी पैसे कमवू शकता. 

तुम्ही ट्रॅव्हल करत असताना मग आर्टिकल लिहू शकता किंवा व्हिडिओ एडिटिंग सारखी कामे करू शकतात. फ्रीलांस प्लॅटफॉर्म वर जाऊन तुम्ही काम मिळवू शकतात. फोटो आणि व्हिडिओ ग्राफी सारख्या स्किल्स मधून तुम्ही फ्रीलांसिंग करू शकतात.

  1. एक वेबसाईट असू द्या

तुमचा एक ब्लॉग सदृश्य वेबसाईट नक्की असू द्या. यावर तुम्ही ब्लॉगिंग करू शकतात. इथे तुम्हाला अफिलियेट मार्केटिंग देखील करता येईल. अनेकदा तुम्हाला वेगवेगळे काम या ब्लॉग वरून मिळतात किंवा तुमच्यासोबत अनेक ट्रॅव्हल कंपनी देखील संपर्क करू शकतात. 

यामध्ये तुम्हाला SEO सारख्या नवीन गोष्टी देखील शिकायला मिळतील. इथे तुम्हाला अनेक व्यक्तींसोबत स्पर्धा करायची आहे. त्यामुळे कशा पद्धतीने तुमचा ब्लॉग वर येईल याकडे लक्ष द्यावे लागेल. 

  1. स्वतःचे एक ऑनलाईन विश्व तयार करा

तुम्ही स्वतःची एक कम्युनिटी बनवा. तुम्हाला इथून अनेक पद्धतीने इन्कम सुरू होऊ शकते. जसे की instagram वर तुमचे फोलोवर्स जास्त असतील तर तुम्हाला ब्रँड प्रमोशन देखील करता येईल. 

  1. कंटेंट क्रिएशन

तुम्ही इथे ब्रँड्स साठी इंस्टाग्राम, युट्यूब आणि ब्लॉग्ज साठी कंटेंट बनवू शकतात. तुम्ही या ब्रँड कंटेंट मधून पैसे कमवू शकता. यासाठी तुम्हाला फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी जमायला हवी. फोटोग्राफी व्हिडिओग्रफी हे काही अवघड नाहीये. तुम्हाला यातील खूप बेसिक गोष्टी जमायला हव्यात. तुम्हाला व्हिडिओ बनवत असताना एक स्टोरी सांगायला जमायला हवे.

तुम्ही मोबाईल वरून सुरू करू शकतात. व्हिडिओ बनवत असताना तुम्हाला त्यात आवाज योग्य येतो आहे आणि व्हिडिओ शेक करत नाहीये या दोनच गोष्टींकडे लक्ष द्यायचे असते. 

  1. तुमच्याशी एकनिष्ठ रहा

हे सांगण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे तुम्ही जसे आहात तसेच तुमच्या कंटेंट मधून लोकांसमोर येऊ द्या. तुम्हाला जस जमत असते तसे समोर या. तुमची भाषा बदलण्यास सुरुवात करू नका. 

तर या सर्व गोष्टी तुम्ही एक फुल टाईम ट्रॅव्हल करत असताना केल्या तर तुमच्यासाठी हा एक पैसे कमविण्याची मार्ग तर बनेलच मात्र तुम्हाला त्यात तुमची आवड जपल्याचा आनंद देखील मिळेल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top