जगन्नाथ रथ यात्रा एक अदभुत कथा || Hidden Secrets of Jagannath Puri Rath Yatra in Marathi (Part 1)

WhatsApp-Image-2023-08-10-at-08.30.07-1.jpg

भारतातील ओडिसा राज्यात असलेल्या पुरी या ठिकाणी एक अदभुत अशी गोष्ट आहे जिच्यावर आजही विज्ञान काही प्रतिक्रिया देऊ शकलेले नाही. विज्ञानाचे सर्वच सिद्धांत इथे फोल ठरतात असे म्हणाला काही हरकत नाही.

हिंदू संस्कृती मध्ये एकूण 4 धाम आहेत. बद्रिनाथ धाम, द्वारकाधीश धाम, रामेश्वरम् आणि शेवट म्हणजे जगन्नाथ पुरी! अजा आपण आज श्रीकृष्ण जिथे आजही वास्तव करतात असे म्हणले जाते अशा जगन्नाथ पुरी विषयी काही महत्वपूर्ण बाबी जाणून घेणार आहोत. मंदिरात अशा अनेक अदभुत गोष्टी आहेत ज्या ऐकून अनेक लोक अचंबित होतात. 

पाश्चात्य गोष्टींचे अनुकरण करत करत आपण आज अशा ठिकाणी आहोत की अनेक लोक आता देव आहेत की नाही यावर चर्चा करत आहेत. मात्र कदाचित तुमच्या या वादाला एक वेगळी दिशा हा लेख देऊन जाईल.

लाकडांच्या मूर्ती असलेले एकमेव जगन्नाथ पुरी मंदिर

आपल्याकडे मंदिरात असलेल्या देवांच्या मूर्ती या एकतर दगड किंवा धातू पासून बनविलेल्या असतात मात्र जगन्नाथ पुरी येथील मंदिरातील मूर्ती या लाकडापासून बनविलेल्या आहेत. यामागे इतिहास दडलेला आहे.

जगन्नाथ पुरी मंदिरातील लाकडी मूर्त्यांच्या पाठीमागे असलेली कथा 

इ.स.पूर्व 3102 मध्ये जारा नावाच्या एका शिकाऱ्याने शिकार करत असताना चुकून एक बान श्रीकृष्ण भगवान यांच्या पायावर मारला. यामध्ये श्रीकृष्ण यांचा मृत्यू झाला. जारा याने श्रीकृष्ण यांचा अंतिम संस्कार केला. त्यांची चीता जेव्हा शांत झाली तेव्हा जारा याला धातूचा एक तुकडा दिसला जो अजूनही चमकत होता. जारा ला ही गोष्ट नक्की काय आहे हे समजले नव्हते. 

त्यामुळे त्याने ती गोष्ट घेऊन बाजारात विक्रीला घेऊन गेला. ती गोष्ट विकत तर कोणी घेतलीच नाही मात्र यावर त्याला कोणी हात सुद्धा लावला नाही. नंतर जारा ने कंटाळून ती गोष्ट एका लाकडावर ठेऊन तिला पाण्यात सोडून दिले. 

गुप्त साम्राज्य काळात अवंती येथील राजा इंद्रद्युम जे भगवान विष्णू यांचे निस्सीम भक्त होते त्यांना एक दिवस स्वप्नात विष्णू भगवान येऊन सांगतात की एका नदीत उडी घेऊन एका लाकडाच्या खोडात मी तुला मिळेल असे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राजाने नदीत डुबकी मारली. 

थोड्याच वेळात राजाला एक खोड मिळाले. कुठल्याही प्रकारे विलंब न करता राजा त्या लाकडा जवळ गेले आणि त्यांनी ते लाकूड महालात आणले. राजाने अनेक सुंदर कारागिरी असलेल्या सुतार लोकांना बोलविले मात्र त्यापैकी कोणीही त्यापासून मूर्ती बनवू शकाल नाही. 

अनेक दिवस काळ गेल्यानंतर एक सुतार राज्याकडे आला आणि त्याने ही मूर्ती आपण बनविणार असे सांगितले. मात्र त्याने अट घातली की ही मूर्ती बनविण्यासाठी मला 21 दिवस लागतील आणि या काळात माझ्याशी कोणी बोलणार नाही किंवा माझ्या कामात काही अडथळा येणार नाही. राजाने ही अट मान्य केली.

मूर्ती बनविण्याचे काम सुरू झाले. हळू हळू हे काम सुरू झालेले होते तर आवाज येत होते मात्र नंतर नंतर आवाज बंद होत गेले. अवंती येथील राणीला वाटले की जेवण न मिळाल्याने सुतार कदाचित मृत पावला असावं म्हणून त्यांनी दरवाजा खोलण्यासाठी आग्रह धरला. राजाला देखील त्यांचे हे म्हणणे ऐकावे लागले. जसा दरवाजा खोलला गेला तेव्हा त्यांना समजले की इथे कोणीही सुतार नव्हता. त्यांना तिथे 3 मूर्ती बघायला मिळाल्या. 

या तीन मूर्ती होत्या भगवान जगन्नाथ, त्यांचे बंधू बालभद्रा आणि त्यांची बहीण सुभद्रा! त्याच जगन्नाथ मूर्ती मध्ये ती धातूची गोष्ट ठेवलेली होती. ही धातूची गोष्ट इतर काही नव्हती तर ते होते भगवान श्रीकृष्णाचे हृदय!

हे हृदय काय सामान्य मनुष्याचे हृदय नाहीये तर ते प्राचीन काळातील प्रगत असलेल्या तंत्रज्ञानाचे प्रतीक आहे. हे हृदय ऊर्जा देत असते. आपलयाला हे माहिती आहे की दगड आणि धातू हे ऊर्जेचे वाहक होऊ शकतात. मात्र लाकूड हे ऊर्जेचे वाहक नसते. त्यामुळेच जगन्नाथ पुरी मंदिरातील मूर्ती या लाकडापासून बनलेल्या आहेत. 

जगन्नाथ पुरी मंदिरातील मूर्ती काही काळानंतर का बदलतात ?

प्रत्येक 12 वर्षानंतर भगवान जगन्नाथ यांच्या मूर्ती नवीन बसविल्या जातात. भगवान श्रीकृष्ण यांचे हृद्य त्या नवीन मूर्तीत बसविले जाते. मूर्तीत असलेले हे हृदय इतक्या जास्त प्रमाणात ऊर्जा देत असते की त्या ऊर्जेला काबूत ठेवण्यासाठी ते लाकूड देखील झीज होत चालते. त्यामुळेच हे लाकूड बदलण्याची गरज असते. हे लाकूड बदलण्याची प्रक्रिया देखील तितकीच मजेशीर आहे. 

प्रत्येक 12 वर्षानंतर एक दिवस असा असतो जेव्हा आपल्याला मंदिरात कोणालाच प्रवेश मिळत नाही. मंदिरातील मुख्य पुजार्याच्या हातात मोठे दस्ताने घालून आणि डोळ्यावर पट्टी बांधून पुरी शहरातील पूर्ण वीज घालवून हे हृदय एका मुर्तीतून दुसऱ्या मूर्तीत हलविले जाते. 

ज्या पुजाऱ्यानी इतिहास मध्ये ही केलेली आहे त्यांनी ही गोष्ट पाहिलेली नाही. या हृदयाला ब्रम्ह पदार्थ असे म्हणतात. पुजाऱ्यांच्या मते त्यांनी ही गोष्ट हातात घेतल्यास त्यांना असे जाणवले की त्यांनी हातात एखादा जिवंत ससा पकडलेला आहे. असे देखील म्हणले जाते की एखाद्याने ब्रम्ह पदार्थ पाहिला तरी देखील त्याच क्षणाला त्याचा मृत्यू निश्चित होतो. त्यामुळे प्रत्येकाला हे सुरू असताना डोळ्यावर पट्टी बांधली लागते. 

मंदिरावरील ध्वज

जगन्नाथ पुरी मंदिराच्या वर एक ध्वज आहे. हा ध्वज वैज्ञानिक सिद्धांतांचा पूर्णपणे विरोधी आहे. आपल्याला एक संकल्पना माहिती असेल की जिकडे हवेचा प्रवाह असतो तिकडे कोणतीही गोष्ट उडते. उदाहरण म्हणजे पतंग. त्यामुळे जर एखादा ध्वज असेल तर तो सुद्धा त्याच दिशेला उडायला हवा. 

जगन्नाथ पुरी मंदिरावर असलेला ध्वज हा पूर्णपणे याच्या विरोधी आहे. हा नेहमी हवेच्या विरुद्ध दिशेला उडत असतो. हे का घडते आणि कसे घडते याला आपल विज्ञान देखील अजून सुद्धा पुरावा देऊ शकलेले नाही.

या ध्वजाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे हा ध्वज दररोज बदलावा लागतो. या मंदिराचे जे पुजारी आहेत ते दररोज 214 फूट उंच चढून हा ध्वज बदलतात. असे देखील सांगितले जाते की जर एखाद्या दिवशी जरी हा झेंडा बदलला गेला नाही तर मंदिर 18 वर्षांसाठी बंद होऊन जाईल. 

पुढील भागात आपण अजून काही रहस्यमय गोष्टी भगवान जगन्नाथ पुरी मंदिराविषयी जाणून घेऊयात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top