जोधपूर मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Jodhpur in Marathi (Part 1)

20230730_082147.jpg

जोधपूर मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Jodhpur in Marathi (Part 1)

भारतातील जोधपूर ज्याला ब्ल्यू सिटी देखील म्हणून ओळखले जाते. येथे पर्यटक आकर्षाने भरपूर आहेत. पर्यटक लक्झरी हॉटेल्स पासून ते कमी किमतीच्या निवासस्थानांची निवड देखील करू शकतात. शहरामध्ये टॅक्सी बसेस रिक्षा आणि रेल्वे मार्गाची चांगली वाहतूक उपलब्ध आहे, ज्यामुळे प्रवाशांना प्रवास करणे सोपे होते.

जोधपूर या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला हवी असलेली संपूर्ण माहिती या लेखात आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. जोधपूर या ठिकाणाचे पर्यटक आकर्षाने, फिरण्यासाठी जागा, तेथील तिकीट, राहण्यासाठी जागा, वाहतूक कसे करावे, संपूर्ण माहिती त्या जागेबद्दल आपण या लेखात पाहणार आहोत.

या लेखामध्ये आज आपण जोधपूर या ठिकाणाबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. धार्मिक स्थळांबरोबरच पर्यटक आकर्षाने, फिरण्यासाठी जागा,  संपूर्ण माहिती पाहणार आहोत, आणि त्या ठिकाणासाठी जाण्यासाठी लागणारे वाहतूक कसे करावे, राहण्यासाठी सुविधा इत्यादी माहिती पाहणार आहोत.

जोधपूर या ठिकाणाबद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी आमचा लेख वाचा.

जोधपूर मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Jodhpur in Marathi

भारतातील जोधपूर ज्याला ब्ल्यू सिटी देखील म्हणून ओळखले जाते. येथे पर्यटक आकर्षाने भरपूर आहेत. पर्यटक लक्झरी हॉटेल्स पासून ते कमी किमतीच्या निवासस्थानांची निवड देखील करू शकतात. शहरामध्ये टॅक्सी बसेस रिक्षा आणि रेल्वे मार्गाची चांगलीच वाहतूक उपलब्ध आहे, ज्यामुळे प्रवाशांना प्रवास करणे सोपे होते.

जोधपूर कसे पोहोचाल? How to reach Jodhpur?

बस: राजस्थान जोधपुर ला जाण्यासाठी अनेक ठिकाणांवरून बसेस उपलब्ध आहेत. सिटीच्या आतल्या आत आणि सिटीच्या बाहेर जाण्यासाठी म्हणजेच इंटरसिटी आणि आंतरराज्य बस जोधपुर ला उदयपूर, जयपुर, दिल्ली आणि अहमदाबाद या महत्त्वाच्या सरांशी नियमितपणे चालू असतात. पर्यटक आणि प्रवासी विविध स्तरावरील आराम आणि दरांसह, खाजगी ऑपरेटेड किंवा सरकारी बसेस यांची निवड करू शकतात. बसने जोधपूरच्या अतिशय सुंदर आणि नयनरम्य ब्लू सिटी ला जाताना प्रवाशांना राजस्थानच्या अतिशय सुंदर निसर्ग रम्य परिसराचा अनुभव घेता येतो.

जोधपुर मध्ये पर्यटक किंवा प्रवासी जोधपुर मधील बस नेटवर्क चा उपयोग करू शकतात. जे स्थानिक आणि प्रवाशांना दोघांनाही सुलभ आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध करतात. शहराची बस प्रणाली विविध मार्गाद्वारे प्रमुख पर्यटक आकर्षणांना आणि महत्त्वाच्या जागांना जोडते. जोधपूरच्या बस सुविधा स्थानिक आणि प्रवाशांसाठी त्रास मुक्त आणि आरामदायी प्रवास अनुभवाची खात्री देते.

रेल्वे: जोधपुर ला भारतीय रेल्वे नेटवर्कद्वारे चांगली सेवा उपलब्ध आहे. ज्यामुळे आपण दिल्ली, मुंबई, जयपुर आणि अहमदाबाद सह भारतातील प्रमुख शहरांना रेल्वे उपलब्ध आहेत. ब्लू सिटी मध्ये स्वतःचे रेल्वे स्टेशनचे जोधपुर जंक्शन आहे हे प्रवाशांना शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठिकाणी पाहण्यासाठी एक सोयीस्कर वाहतूक मार्ग बनले आहे.

विमान: जोधपुर ला जाण्यासाठी पर्यटक किंवा प्रवासी जोधपुर विमानतळ याचा वापर करू शकता, ज्यामुळे आपण हवाई मार्गाने सोईस्कर पणे आणि लवकर प्रवास करू शकतो. दिल्ली, मुंबई, जयपूर आणि उदयपूर यासारख्या भारतीय प्रमुख शहरांमधून जोधपूरला अनेक विमाने जात असतात ज्याचा उपयोग करून आपण जोधपुरला प्रवास करू शकतो.

जोधपूर मध्ये राहण्याची व्यवस्था कोठे होईल? Where to Stay in Jodhpur?

जोधपुर हे प्रसिद्ध शहर असल्यामुळे, या ठिकाणी विविध प्रकारच्या आवडीनुसार आणि बजेट पूर्ण करण्यासाठी निवासाचे असंख्य पर्याय उपलब्ध आहे. या शहरात भव्य हॉटेल्स, बुटीक हाऊस, मध्यम श्रेणीचे हॉटेल्स आणि स्वस्त निवास व्यवस्था देखील उपलब्ध आहे ज्याचा वापर करू शकतो. पर्यटक मेहरानगड किल्ल्यांच्या उंच भिंतीत किंवा शहराच्या मध्यभागी असलेल्या आधुनिक हॉटेलमध्ये देखील राहू शकतात. जोधपूरचे निवास सुविधा प्रत्येक पर्यटकाला आणि प्रवाशांना आनंददायी आणि आरामदायी स्मरणीय राहण्याची खात्री देते.

आमचे मत असे असेल की आपण बस स्टॅन्ड किंवा रेल्वे स्थानक जवळ आपने हॉटेल्स किंवा निवासस्थान शोधावे या कारणाने आपल्याला जोधपूरचे आकर्षाने पाहण्यासाठी सोपे जाईल.

जोधपूर मध्ये भेट देण्यासाठी ठिकाणे – Places to Visit in Jodhpur

  1. उम्मेद भवन पॅलेस

राजस्थान जोधपुर मधील उम्मेद भवन पॅलेस एक ऐतिहासिक ठिकाण आणि हेरिटेज हॉटेल आहे. या ठिकाणी 347 आहेत त्यामध्ये 40 रूम्स तेथील राजकीय घराण्याला देण्यात आलेले आहे. उरलेले रूम्स मध्ये ऐतिहासिक संग्रहालय आणि हॉटेल ताज द्वारे विकत घेतले गेलेले आहेत जे आता हॉटेलमध्ये बदलले आहे. हे उम्मेद भवन पॅलेस विसाव्या शतकात बांधले गेले होते यामध्ये राजपूत, पाश्चात्य आणि आर्ट टेकओ वास्तुशास्त्रीय घटकांचे संग्रहालय आहे. जोधपूरचे राजघराणे आजही या राजवाड्यामध्ये काही भागात राहतात. पर्यटक या राजवाड्याला जोधपुर मध्ये आल्यावर एकदा तरी भेट देतात या ठिकाणी हॉटेल आणि संग्रहालय सोबत भारताचा इतिहास गोष्टी उपलब्ध आहेत. हे शहराच्या इतिहासिक आणि राजशाही वारसा याविषयी भरपूर माहिती देते. उम्मेद भवन पॅलेस ची भव्यता आणि सौंदर्य जोधपुर मध्ये पाहण्यासारखे ठिकाण आहे. या राजवाड्याची वेळ आहे सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. या ठिकाणी संग्रहालयाचे भारतीयांसाठी 30 रुपये तिकीट आहे आणि प्रदेशांसाठी 100 रुपये तिकीट आहे. हे रविवारी बंद असते.

  1. मेहरानगड किल्ला

राजस्थानच्या जोधपूर मधील खडकाळ टेकडीवर उभा केलेला एक नेत्र दीपक ऐतिहासिक कलाकृती म्हणजे मेहरानगड किल्ला आहे. हा किल्ला राव जोधा-यांनी 1460 मध्ये बांधला होता. हा किल्ला बांधण्यामागं 35 राजांचे हात आहे, त्यांनी या किल्ला बांधण्यासाठी मदत केली आहे. जोधपूरच्या सपाटीपासून 410 फुटावरती असलेले एक किल्ला सगळ्या बाजूने दिसतो, हे जोधपुरची शान आहे. हे पंधराव्या शतकात बांधण्यात आले होते आणि त्यात उल्लेखनीय राजपूत वास्तुकला, तसेच ब्लू सिटी चे आकर्षक दृश्य बघण्यासाठी अतिशय सुंदर ठिकाण आहे. या किल्ल्याचे विस्तीर्ण प्रांगण उत्कृष्ट राजवाडे आणि अवशेष आणि शास्त्रात यांचा समृद्ध संग्रह असलेले संग्रहालय शहराच्या भूतकाळातील माहिती घेण्यासाठी आणि सांस्कृतिक वारसाचा एक चित्तवेधक बघण्यासाठी फार मदत करते. या किल्ल्यावर येण्याचे वेळ आहे सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. या ठिकाणी येणाऱ्या भारतीयांसाठी 100 टिकीट आहे आणि परदेशांसाठी 600 रुपये तिकीट आहे.

  1. जसवंत थाडा

जसवंत झाड आहे जोधपुर मधील, मेरानगर किल्ल्या जवळील एक अतिशय सुंदर संगम वरी सुंदर मंदिर आहे, जे 19व्या शतकात महाराजा जसवंत सिंग II यांचे स्मारक म्हणून बांधण्यात आले होते. या जागेवर आपल्याला फार तर फार अर्धा ते पाऊण तास लागेल पूर्वी जागा फिरण्यासाठी. या ठिकाणी येण्यासाठी सगळ्यात चांगली वेळ हेच सूर्यास्ताची असेल. जसवंत थाडा ज्याला जोधपूरचे ताजमहाल देखील म्हटले जाते, हे अतिशय सुंदर राजस्थानी कामगिरी केलेले एक ठिकाण आहे. हे एक सुंदर कोरेगाव काम केलेले आणि शांत ठिकाण आहे. हे वास्तु शिल्प चमत्कार मारवाड सम्राटांचे स्मारक म्हणून काम करते, आणि हे पर्यटकांना त्यांचे सौंदर्य आणि ऐतिहासिक जोधपुर मधील मूल्य पाहण्यासाठी एक शांत वातावरण प्रदान करण्यास मदत करते. या जागेवर येण्यासाठी वेळ आहे सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आणि इथे तिकीट आहे भारतीयांसाठी 30 रुपये, परदेशांसाठी 50 रुपये तिकीट आहे.

  1. राव जोधा डेझर्ट रॉक पार्क

जोधपूरमधील हे राव जोधा डेझर्ट रॉक पार्क मेहरानगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले एक निसर्गरम्य वाळवंट फिरण्याचे ठिकाण आहे. प्रदेशातील खडकाळ लँडस्केप आणि अद्वितीय वनस्पती आणि संरक्षित करणाऱ्यांच्या उद्देशाने 2006 मध्ये या ठिकाणाला स्थापन करण्यात आले होते. पर्यटक उद्यानाचे अनोखे वातावरण पाहण्यासाठी आणि जिल्हा आणि शहराच्या अद्भुत दृश्यांचा आनंद घेण्यासाठी या मतदानाच्या मार्गावर भटकू शकतात आणि आनंद घेऊ शकतात. ही जागा 200 एकर मध्ये विस्तारलेली आहे आणि येथे आपण ट्रेकिंग करण्यासाठी गाईडचा देखील वापर करू शकतात. या ठिकाणाचे वेळ आहे सप्टेंबर ते एप्रिल मध्ये 7 वाजेपासून 6:30 वाजेपर्यंत आणि ऑक्टोबर ते मार्च वेळ आहे, 8 वाजेपासून 5:30 वाजेपर्यंत. जोधपूरमधील हे राव जोधा डेझर्ट रॉक पार्क याचे प्रवेश टिकीट आहे 100 रुपये आणि जर मार्गदर्शक किंवा गाईड चा उपयोग केल्यावरती 200 रुपये असे आहे.

पुढील लेखात आपण जोधपुर मधील इतर काही पर्यटन स्थळे बघुयात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top