महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे || Best Tourist Places to visit in Mahabaleshwar (Part1)

20230703_201902.jpg

महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे || Best Tourist Places to visit in Mahabaleshwar (Part 1)

महाबळेश्वर हे ठिकाण म्हणजे धार्मिक स्थळांची आणि पर्यटन स्थळांची जणू यात्राच! महाबळेश्वर हे महाराष्ट्र राज्यातील थंड हवेचे ठिकाण असून इथे अनेक पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे आहेत. मात्र या ठिकाणी योग्य माहिती नसेल तर कदाचित आपल्याकडून अनेक महत्वाची पण समोर न आलेली स्थळे सुटू शकतात. त्यामुळे एकदा हा लेख नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला महाबळेश्वर फिरण्यासाठी एक संपूर्ण टुरिस्ट गाईड म्हणजे प्रवास माहिती मिळून जाईल. जेणेकरून असंख्य समाजापासून दुर्लक्षित राहिलेले काही ठिकाण तुम्हाला नक्की बघायला मिळतील. 

महाबळेश्वर शब्दाचा अर्थच जर सांगायचा झाला तर महा म्हणजे महान, बळ म्हणजे शक्ती आणि ईश्वर म्हणजे देवता. हे ठिकाण महान शक्तीची देवता असणाऱ्या शिव शंकराचे स्थान आहे. 

महाबळेश्वर हे ठिकाण इथल्या उंचच उंच डोंगरांसाठी, स्ट्रॉबेरी या फळासाठी, सुंदर तलावांसाठी आणि प्राचीन संस्कृती साठी प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर येथील थंड आणि शांत वातावरण सोबतच सुर्योदय आणि सुर्यास्त अनुभवणे म्हणजे स्वर्गसुखच… तुम्ही लहान असो किंवा कपल सर्वांसाठी महाबळेश्वर हे ठिकाण 3-4 दिवसांच्या सुट्ट्यांसाठी योग्य आहे. 

महाबळेश्वरला भेट देण्याची योग्य वेळ – Best Time to Visit Mahabaleshwar

ऑक्टोबर हा महिना महाबळेश्वरला भेट देण्यासाठी योग्य वेळ आहे. 

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याच्या केंद्रापासून महाबळेश्वर हे ठिकाण 50 किलोमिटर अंतरावर आहे. पुण्याहून महाबळेश्वर हे अंतर 120 किलोमिटर तर मुंबई हून अंतर हे 260 किलोमीटर आहे. तुम्ही इथे बस ने देखील येऊ शकतात. महाबळेश्वर हा इथला जवळचा बस स्टॉप आहे. 

महाबळेश्वर मध्ये तुम्हाला ऑटो मिळणार नाहीत. बस स्टॉप च्या बाहेरच तुम्हाला टॅक्सी मिळतील. त्यांना तुम्ही भाडेतत्त्वावर घेऊ शकतात. इथे तुम्हाला दुचाकी भाडे तत्वावर मिळणार नाहीत. तुमची चारचाकी गाडी असेल तर आतमध्ये तुम्हाला एन्ट्री फी ही 190 रुपये द्यावी लागेल. दुचाकी साठी काही फी नाही. 

महाबळेश्वर भागात तुम्हाला पेट्रोल पंप आणि एटीएम सुविधा सहज मिळतात. मोबाईल नेटवर्क मध्ये तुम्हाला मार्केट भागात नेटवर्क मिळेल मात्र डोंगरात तुम्हाला नेटवर्क कमी मिळेल. 

महाबळेश्वर भागात सर्व ठिकाणे ही महाबळेश्वर केंद्र स्थानावरून फक्त 20 किलोमिटर अंतरावर आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतःची गाडी घेऊन आला तर उत्तमच असेल. 

  1. मैप्रो गार्डन (Mapro Garden)

पाचगणी आणि महाबळेश्वर यांच्या मध्ये स्थित ठिकाण म्हणजे mapro गार्डन. तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात mapro गार्डन पासून करू शकतात. 

Mapro हे नाव आपण सर्वांनी ऐकलेले असते मात्र त्याचा अर्थ अनेकांना माहीत नसतो. Mapro म्हणजेच महाबळेश्वर प्रॉडक्ट्स. Mapro गार्डन हे ठिकाण मुख्य पर्यटन स्थळ असून इथे तुम्हाला चॉकलेट प्रोडक्शन फॅक्टरी, गार्डन, रेस्टॉरंट आणि एक रिटेल आउटलेट बघायला मिळेल. इथून तुम्ही mapro मधील सर्व उत्पादने खरेदी करू शकतात. 

Mapro गार्डन सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत सुरू असते. इथे कुठल्याही प्रकारे एन्ट्री फी नाही. रेस्टॉरंट मध्ये तुम्हाला पैसे देऊन जेवण मिळेल. इथे तुम्हाला सँडविच, पिझा, आईस्क्रीम आणि इतरही अनेक पदार्थ मिळतील. इथले सर्वात जास्त पसंत केले जाणारे उत्पादन म्हणजे स्ट्रॉबेरी विथ क्रीम होय. 

रिटेल आउटलेट मध्ये mapro चे सर्व प्रकारचे उत्पादन असतात. यामध्ये सिरप, सॉस, चॉकलेट, जेली, मोकटेल, आणि खूप काही उपलब्ध आहेत. तुम्हाला गार्डन मध्ये एटीएम सुविधा देखील मिळेल. आतमध्ये गेल्यानंतर कुठल्याही प्रकारे पार्किंग फी लागणार नाही. 

  1. केटस पॉइंट (Kates Point)

Mapro गार्डन पासून 20 मिनिटांच्या अंतरावर हे ठिकाण आहे. मुख्य रस्त्यावरून उजव्या बाजूला वळण घेऊन तुम्ही इथे जाऊ शकतात. एकाच ठिकाणी तुम्हाला 3 वेगवेगळे पॉइंट बघायला मिळतील. 

केट्स पॉइंट मध्ये तुम्हाला कॅट्स पॉइंट, इको पॉइंट आणि निडल होल पॉइंट बघायला मिळेल. केट्स पॉइंट हे ठिकाण महाबळेश्वर पासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारे एन्ट्री फी द्यावी लागणार नाही. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या ठिकाणाला नाके खिंड नावाने ओळखले जात होते. Kates point हे नाव ब्रिटिश गव्हर्नर सर जॉन मालकम यांच्या मुलीच्या नावावरून ठेवलेले आहे. इथून तुम्हाला धोम धरणाच्या सुंदर बॅकवॉटर चे दर्शन घडेल. या ठिकाणाला शूटिंग पॉइंट म्हणून ओळखले जाते. इथून तुम्हाला 30 रुपये देऊन 4 मिनिट साठी शूटिंग झालेल्या जागा बघायला मिळतील. इथे तुम्हाला बाजीराव मस्तानी मधील शेवटचे दृश्य जिथे शूट केले ते बघायला मिळेल. स्वदेश सिनेमातील मंदिराचा सिंग देखील जिथे शूट झाला ते ठिकाण बघायला मिळेल.

इको पॉइंट हे ठिकाण तुम्हाला दरीत जोरात आवाज दिल्यानंतर तो आवाज पुन्हा ऐकायला मिळेल. तुम्ही ज्या केटस पॉइंट वर उभे होता त्या ठिकाणी आहे एलिफंन्ट पॉइंट. त्याला बघण्यासाठी तुम्हाला निडलस पॉइंट वर जावे लागेल. इथून तुम्हाला हत्तीची प्रतिकृती असलेले कॅटस पॉइंट चे विलोभनीय दृश्य बघायला मिळेल. 

  1. जुने महाबळेश्वर (Old Mahabaleshwar)

केट्स पॉइंट पासून 6 किलोमीटर अंतरावर हे जुने महाबळेश्वर ठिकाण आहे. तुम्हाला रस्त्यात 2 फाटे फुटत त्यातील उजव्या बाजूला तुम्हाला जायचे आहे. गुगल मॅप काम करत नसल्याने तुम्ही ऑफलाईन मॅप आधीच डाऊनलोड करून ठेवू शकतात. तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला 2 मुख्य मंदिर बघायला मिळतील. गाडी पार्क करून तुम्ही हे मंदिर बघू शकतात. 

पंचगंगा मंदिर – पंचगंगा मंदिर म्हणजे पाच नद्यांचे मंदिर. या ठिकाणी 5 नद्या म्हणजेच कृष्णा, वेण्णा, सावित्री, कोयना आणि गायत्री या नद्यांचा संगम होतो आणि त्यांचे पाणी एका नंदीच्या मुखातून बाहेर पडते. नंदीच्या मुखातून येणारे हे पाणी तुम्ही घरात पवित्र जल म्हणून ठेवू शकतात. 

मंदिराच्या बाहेर तुम्हाला मलबेरी फ्रूट मिळतील. इथे तुम्हाला हे सर्व काही फ्रेश मिळेल. 

महाबळेश्वर शिव मंदिर – पंचगंगा मंदिराच्या जवळच 5 मिनिट चालत गेल्यानंतर तुम्हाला दिसेल ते महादेव मंदिर. हे जवळपास 800 वर्षे जुने मंदिर आहे. या मंदिरात एक मोठा दगड असून त्याचा आकार रुद्राक्ष सारखा आहे. हा दगड 5000 वर्षे जुना असल्याचे सांगितले जाते. 

  1. एलफिन्स्टन पॉइंट (Elphinstone Point)

जुन्या महाबळेश्वर पासून 4 किलोमिटर अंतरावर हे ठिकाण आहे. नवीन महाबळेश्वर पासून हे ठिकाण 11 किलोमिटर अंतरावर आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील गव्हर्नर माऊंट एलफिन्स्टन यांच्या नावावरून या ठिकाणाला नाव देण्यात आले आहे. तुम्हाला या ठिकाणावरून सुंदर हिरवाई ने नटलेले डोंगर बघायला मिळतात.

  1. सावित्री पॉइंट (Savitri Point)

एलफिन्स्टन पॉइंट पासून काही अंतरावर तुम्हाला सावित्री पॉइंट बघायला मिळेल. हे ठिकाण सावित्री नदीच्या उगमाच्या जागेसाठी ओळखले जाते. इथून तुम्हाला सावित्री नदी आणि सावित्री व्हॅली दोन्ही बघायला मिळतील. 

  1. कॅस्टल रॉक पॉइंट (Castle Rock Point)

सावित्री पॉईंटच्या जवळच कॅस्तल रॉक पॉइंट आहे. इथून देखील तुम्हाला व्हॅली चे मनमोहक दृश्य बघायला मिळेल.

  1. अर्थर सीट पॉइंट (Arthur Seat Point)

अर्थुर सीट पॉइंट हे ठिकाण मागील ठिकाणापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. इथे तुम्हाला इको पॉइंट, हंटर पॉइंट, टायगर स्प्रिंग पॉइंट, विंडो पॉइंट आणि मालकम पॉइंट बघायला मिळतील.

एकाच ठिकाणी हे सर्व पॉइंट असून या ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या. टायगर स्प्रिंग पॉइंट या ठिकाणी डोंगरातील पाणी एका छोट्याश्या ठिकाणावरून बाहेर येते. हे पाणी तुम्हाला देखील पिता येते. जुन्या काळात इथे जंगली श्वापदे पाणी पिण्यासाठी येत असतं. 

अर्थूर सीट पॉइंट हे ठिकाण सावित्री नदीच्या प्रवाहात पत्नी आणि मुलीला गमवलेल्या आर्थुर यांच्या बसण्याची जागा म्हणून ओळखले जाते. असे सांगितले जाते की अर्थूर यांनी त्यांच्या जीवनातील सर्व सायंकाळ या ठिकाणी बसूनच त्यांच्या आठवणीत घालवल्या होत्या. तुम्ही देखील इथे सुर्यास्त अनुभवू शकता.

  1. महाबळेश्वर मार्केट ( Market of Mahabaleshwar)

सुर्यास्त बघून झाल्यानंतर तुम्ही महाबळेश्वर येथे मार्केट फिरू शकतात. 

एका दिवसाची आपली सफर इथे संपेल. पुढील भागात आपण दुसऱ्या दिवशी फिरण्यासाठी ठिकाण कोणते आहेत त्याविषयी माहिती जाणून घेऊयात.

महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे || Best Tourist Places to visit in Mahabaleshwar (Part 2)

0 Replies to “महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे || Best Tourist Places to visit in Mahabaleshwar (Part1)”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top