मनाली मधील पर्यटन स्थळे | Best Tourist Places to visit in Manali (Marathi) Part 2
मनाली मधील पर्यटन स्थळे | Best Tourist Places to visit in Manali (Marathi) Part 1
- सिसू व्हीलेज (Sissu Village)
अटल टनेल सोडून 10 किलोमीटर अंतरावर सिसु व्हिलेज आहे. तुम्हाला इथे रस्त्यात डोंगर आणि दऱ्या इतक्या सुंदर बघायला मिळतील की तुमचे मन नक्की मोहून जाईल. खूप दूर पर्यंत तुम्हाला बर्फाची चादर बघायला मिळेल. तुम्हाला इथे पोहोचल्यानंतर दुचाकी आणि चारचाकी पार्क करण्यासाठी जागा मिळेल.
इथे एक हँगिंग ब्रीज असून त्याला ओलांडून तुम्ही पुढे साहसी खेळ खेळू शकतात.
- रोहतांग पास (Rohtang Pass)
सीसु पासून 35 किलोमिटर अंतरावर रोहतांग पास आहे. हिमालयातील सर्वात उंच पास पैकी रोहतांग पास हा 13 हजार फूट पेक्षा जास्त उंचीवर आहे. तुम्हाला इथून पिरपंजाल डोंगररांग चे अनोखे दृश्य बघायला मिळेल. नोव्हेंबर ते मार्च हा पास पूर्णपणे बंद केला जातो. कारण इथे त्या काळात खूप मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते.
तुम्हाला या पासला भेट देताना दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी परमिशन घ्यावी लागते. परमिट चार्ज हे 500 रुपये असतात. त्यासोबत तुम्हाला कंजेशन फी ही 50 रुपये द्यावी लागते. तुम्ही जर रोहतांग पासून पुढे लाहोल स्पिती किंवा लडाख जात असाल तर तुम्हाला अशी कोणतीही फी द्यावी लागत नाही.
कुल्लू येथील डिस्ट्रिक्ट अडमिनिस्ट्रेशन च्या वेबसाईट वरून ही परमिशन तुम्हाला 2 दिवस आधी घ्यावी लागते. रोहतांग पास वर प्रत्येक दिवसाला फक्त 1200 गाड्या सोडल्या जातात. त्यामुळे परमिट हे अडव्हांस मध्ये बुक करणे कधीही योग्य ठरेल.
मनाली ट्रीप दिवस दुसरा
- हडिंबा देवी मंदिर (Hadimba Devi Temple)
दुसऱ्या दिवसाची सुरुवात ही तुम्ही हडिंबा देवी मंदिरातून करू शकतात. मनाली पासून हे मंदिर दीड किलोमिटर अंतरावर आहे. हडिंबा देवी मंदिराला धुंगरी देवी मंदिर नावाने देखील ओळखले जाते. हे मंदिर देवदार वृक्षाच्या जंगलाने वेढलेल आहे.
1553 मध्ये महाराज बहादुर सिंग याने या मंदिराची स्थापना केली होती. मंदिराला गुहेच्या चार बाजूंनी बनविण्यात आलेले आहे. इथेच देवी हडिंबा यांनी ध्यान केले होते. अशी मान्यता आहे की हडिंबा या त्यांचे बंधू हडिंब यांच्या सोबत तिथे राहत असत. राक्षस परिवारात जन्म झालेल्या हडिंबा यांनी असा प्रन घेतला होता की त्या लग्न अशा व्यक्तीशी करणार होत्या जो त्यांच्या भावाला हरवू शकेल. पांडवंच्या निर्वासान काळात भीम यांनी हडिंब यांना हरविले. त्यानंतर हडिंबा यांनी भीम सोबत लग्न करून घटोत्कच याला जन्म दिला. नवरात्री काळात लोक इथे हडिंबा देवीची पूजा करतात.
पांडव परत गेल्यानंतर देखील हडिंबा यांनी इथेच थांबून तपश्चर्या सुरू ठेवली. अखेर त्यांना देवीचा दर्जा प्राप्त झाला. मंदिरापासून थोडया अंतरावर घटोत्कच मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागे दुंगरी वन विभाग आहे. इथे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात चालू शकतात. इथे तुम्हाला एन्ट्री फी 5 रुपये द्यावी लागेल.
- जोगिनी धबधबा (Jogini Waterfalls)
मनाली पासून 8 किलोमिटर अंतरावर जोगिणी धबधबा आहे. हा जवळपास 150 फुटांवरून कोसळणारा एक धबधबा आहे. वशिष्ठ गावाच्या जवळच हा धबधबा आहे. ट्रेक साठी तुम्ही एखाद्या वाटाड्याला सोबत घेऊ शकता. 45 मिनिटांचा ट्रेक करत तुम्ही धबधब्याच्या जवळ पोहोचाल. 15 मिनिट ट्रेक नंतरच तुम्हाला लगेच धबधबा दिसायला सुरुवात होते. इथे तुम्ही हिमालयातील सुंदर डोंगर बघत आपला ट्रेक एन्जॉय करू शकतात.
जोगीनी देवीच्या नावावरून या धबधब्याला नाव देण्यात आलेले आहे. जोगिनि देवीला इथे शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते.
- हनुमान मंदिर
जोगीनि धबधब्याच्या नंतर तुम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या हनुमान मंदिराला भेट देऊ शकतात. इथे तुम्ही दर्शन करू शकतात. भजन सुरू असेल तर त्याचा देखील आनंद घेऊ शकतात.
- वशिष्ठ मंदिर (Vashistha Temple)
मनाली पासून 4 किलोमिटर अंतरावर हे वशिष्ठ मंदिर आहे. इथे अनेक श्रद्धाळू भेट देत असतात. वशिष्ठ गावाचे नाव हे स्पतऋषी पैकी वशिष्ठ ऋषींच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे. असे सांगितले जाते की ऋषी वशिष्ठ यांना जेव्हा समजले की त्यांच्या मुलांना विश्र्वमित्रा यांनी मारले तेव्हा त्यांनी नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र नदीने त्यांना मारण्यास नकार दिला. त्यानंतर ऋषी वशिष्ठ यांनी इथे गावात एक नवीन आयुष्य सुरु केले. ऋषी वशिष्ठ यांना गावापर्यंत घेऊन जाणारी नदी म्हणजे विपाशा म्हणजेच याचा अर्थ असा होतो की बंधनातून मुक्ती मिळणे. या नदीला आता व्यास नदी या नावाने ओळखले जाते. हे मंदिर 4 हजार वर्षे जुने असून इथे ऋषी वशिष्ठ यांची काळ्या कातळातील सफेद वस्त्र धारण केलेली मूर्ती आहे. मंदिराचे नक्षीकाम हे खूप सुंदर असून ते लाकडात बनविलेले आहे. इथे तुम्हाला एक गरम पाण्याचा झरा देखील बघायला मिळेल. असे सांगितले जाते की या पाण्यात अनेक आरोग्यदायी गुणधर्म असून ते खूप साऱ्या त्वचेच्या रोगांसाठी उपायकारक आहेत.
ऋषी वशिष्ठ हे प्रभू राम आणि लक्ष्मण यांचे गुरू होते. त्यामुळे असे सांगितले जाते की लक्ष्मण यांना वाटत होते की ऋषी वशिष्ठ यांना जास्त दूर स्नान करण्यासाठी जावे लागायला नको. त्यामुळे त्यांनी जमिनीत एक बाण चालविला. तिथेच आज हे स्नान कुंड आहे.
मंदिराच्या जवळच एक राम मंदिर आहे. इथे मंदिरात राम, लक्ष्मण आणि सीता माता यांच्या मूर्ती आहेत.
- मॉल रोड (Mall Road)
दुसऱ्या दिवसाची सायंकाळ तुम्ही मनाली मधील मॉल रोडला घालवू शकतात. इथे तुम्हाला खाण्यापिण्याची आणि शॉपिंग साठी खूप सारी दुकान मिळतील. तुम्ही इथे आल्यानंतर मनाली मधील सिद्दु ही डिश ट्राय करायला विसरू नका. इथे तुम्हाला ड्राय फ्रूट देखील मिळतील. मॉल रोडवर एक दुर्गादेवी मातेचे मंदिर आहे. त्यामध्ये जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकतात.
मनाली ट्रीप तिसरा दिवस
- मनू मंदिर (Manu Temple)
तिसऱ्या दिवशीI तुम्ही जुन्या मनाली मध्ये स्थित असलेले मनू मंदिराला भेट नक्की देऊ शकतात. इथले रस्ते खूप जास्त छोटे आहेत. मनाली हे नाव देखील ऋषी मनू यांच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे. हे तेच मंदिर आहे जिथे ऋषी मनू यांनी ध्यानधारणा केली होती.
मनू ऋषींचे हे भारतातील एकमेव मंदिर आहे. पागोडा पद्धतीत हे मंदिर बांधलेले आहे. इथे भरपूर मोठ्या प्रमाणात भक्त दर्शनासाठी येत असतात.
- जुनी मनाली (Old Manali)
आता तुम्ही जुन्या मनाली मध्ये आहात तर जुनी मनाली एक्सप्लोर करून घ्या. तुम्ही यात मनू मार्केट फिरू शकतात. तुम्हाला इथे एक संग्रहालय देखील भेट देता येईल. म्युझियम ऑफ हिमाचल कल्चर अँड फोलक आर्ट्स असे त्या संग्रहालयाचे नाव आहे. मनाली वाइल्डलाइफ संच्युरी ला देखील तुम्हाला भेट देता येईल.
मॉल रोड जवळच तुम्हाला एक हिमालयन निंमपा बुद्धिष्ट मंदिर बघायला मिळेल. तुम्ही तिथे देखील भेट देऊ शकतात.
- कसोल (Kasol)
तिसऱ्या दिवशी दुपारी तुम्ही मनाली वरून कुल्लू आणि नंतर कसोल जाऊ शकतात. कुल्लू मध्ये कुल्लू मार्केट, वैष्णो देवी मंदिर, आणि नागार कास्टल ला भेट देऊ शकतात. कुल्लू मध्ये रिव्हर राफ्टिंग देखील करता येते. 800 ते 1200 रुपये देऊन तुम्ही इथे रिव्हर राफ्टिंग करू शकतात. एप्रिल ते जुलै हा काळ रिव्हर राफ्टिंग साठी बेस्ट समजला जातो.
मनाली पासून 76 किलोमिटर अंतरावर कसोल आहे. इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला 3 तास वेळ लागू शकतो. तुम्हाला इथे जाताना उंच डोंगरातून जावे लागते आणि पुढे रस्ते छोटे होत जातात. तुम्हाला इथे रस्त्याने विहंगम दृश्य बघायला मिळेल.
हिमाचल मधील कसोल हे छोटेसे गाव आहे. पार्वती नदीच्या काठावर हे गाव वसलेले आहे. कसोल हे ठिकाण तिथल्या संस्कृती साठी ओळखले जाते. लोक या ठिकाणाला भारताचे amsterdam किंवा छोटा इस्त्राईल म्हणून ओळखतात. कसोल मध्ये तुम्हाला अनेक हॉटेल्स मिळतील मात्र रात्री कॅम्पिंग करण्याची मजा काही वेगळीच आहे. पार्वती रिव्हर चे दृश्य विहंगम आहे.
कसोल मध्ये तुम्ही शॉपिंग करू शकतात. इथे तुम्हाला इस्त्राईल फूड देखील खायला मिळेल. इथे नेचर पार्क कसोल आहे. तिथे देखील तुम्ही जाऊ शकतात.
- मनिकरण (Manikaran)
मनिकरन हे कसोल मधील मुख्य पर्यटक आकर्षण आहे. कासोल पासून 4 किलोमिटर अंतरावर मनिकरन आहे. हिमाचल प्रदेश मधील मुख्य धार्मिक स्थळांमध्ये मनीकरण देखील आहे. मनिकरण येथे तुम्हाला गाड्यांसाठी फ्री पार्किंग सुविधा मिळेल. मनिकरण मध्ये तुम्हाला गुरुद्वारा मनिकरण साहिब आणि भगवान शंकराचे मंदिर बघायला मिळेल. इथे तुम्हाला गरम पाण्याचा झरा देखील बघायला मिळेल. मनिकरण शब्द हा दोन शब्दांचा मिळून बनलेला आहे. यातील मनी म्हणजे रत्न आणि करण म्हणजे काम होय. अशी कथा आहे की माता पार्वती यांनी त्यांचा अनमोल दागिना नदीत हरवला आणि त्याला शोधण्याची मागणी भगवान शंकर यांना केली. शंकरांनी हे काम शेषनाग याणा दिले आणि शेषनाग यांनी जेव्हा शोधण्यासाठी एक फुंकार मारली तेव्हा तो गरम पाण्याचा झरा निर्माण झाला.
मनिकरण मध्ये थांबण्यासाठी तुम्हाला गुरुद्वारा साहिब द्वारे निःशुल्क थांबता येते. त्यांचे प्रसाद देखील तुम्हाला भेटतात.
मनाली मधील ही महत्वाची ठिकाणे होती. तुम्हाला जर काहीतरी वेगळं अनुभवाचे असेल तर तुम्ही हमता पास ट्रेक, व्यास कुंड ट्रेक, फ्रेंडशिप पीक ट्रेक , खिर गंगा ट्रेक, चंदरघणी पास ट्रेक यासारखे अनेक ट्रेक करू शकतात.
0 Replies to “मनाली मधील पर्यटन स्थळे | Best Tourist Places to visit in Manali (Marathi) Part 2”