त्रिपुरा सुंदरी मंदिर विषयी माहिती || Information about Tripura Sundari Temple in Marathi

Tripura sundari temple information marathi

भारतातील सर्वात महत्त्वाच्या अश्या मंदिरांपैकी एक त्रिपुरा सुंदरी मंदिराची माहिती आज आपण बघणार आहोत. 

त्रिपुरा सुंदरी मंदिर माहिती – Information about Tripura Sundari mandir 

51 शक्तीपीठ मधील एक मंदिर म्हणजे त्रिपुरा सुंदरी मंदिर. हे मंदिर हिंदू भाविकांमध्ये सर्वात महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक मानले जाते. ईशान्य भारतातली काही मोठ्या श्रद्धास्थानांपैकी हे एक मंदिर आहे. 

त्रिपुरा सुंदरी मंदिर – ठिकाण – Tripura Sundari Temple Location

भारतातील त्रिपुरा राज्यात त्रिपुरा सुंदरी मंदीर आहे. त्रिपुरा राज्याची राजधानी आगरतळा पासून अवघ्या 55 किमी अंतरावर असणाऱ्या गोमती जिल्ह्यातील उदयपूर या गावात त्रिपुरा सुंदरी मंदिर आहे. 

त्रिपुरा सुंदरी मंदिर – Tripura Sundari Mandir

त्रिपुरा सुंदरी देवी ही स्थानिक ठिकाणी देवी त्रिपुरेश्वरी म्हणून ओळखली जाते. यासोबतच माताबरी देवी म्हणून त्रिपुरा सुंदरी देवीस संबोधले जाते. त्रिपुरा सुंदरी मंदिर हे शक्तीपुरी, शिवपुरी आणि विष्णुपुरी अश्या तीन गावांच्या मध्यभागी स्थित आहे आणि तीन दुर्गांनी वेढलेले आहे त्यामुळे या मंदिरास त्रिपुरा सुंदरी मंदिर असे नाव या मंदिरास पडले. 

त्रिपुरा सुंदरी मंदिर हे त्रिपुरा राज्यातील धार्मिक दृष्ट्या आणि पर्यटन दृष्ट्या देखील एक महत्त्वाचे स्थान आहे. म्हणूनच त्रिपुरा राज्याला त्रिपुरा हे नाव या मंदिरामुळे पडले आहे. 

त्रिपुरा सुंदरी देवी मंदिर हे हे एक शक्तीपीठ आहे त्यामुळे हे देशातील सर्वात पवित्र दैवतांपैकी एक मानले जाते आणि अनेक भाविकांचे हे श्रध्दास्थान आहे. ईशान्य भारतातील मंदिरांपैकी आसाम मधील कामाख्या या मंदिरानंतर याच मंदिरात भाविकांची संख्या जास्त असते. 

त्रिपुरा सुंदरी मंदिर एका छोट्या टेकडीवर आहे. ही टेकडी साधारण 100 ते 125 फूट उंच आहे. या टेकडीचा आकार कासवाच्या कुबड सारखा आहे. या आकाराला कूर्मपत्री असे म्हणतात आणि मंदिरासाठी से स्थान सर्वात पवित्र मानले जाते म्हणून या मंदिरास कुर्मा पीठ असे नाव देण्यात आले आहे.

मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. त्रिपुरा सुंदरी मंदिरचा कळस गोलाकार आकाराचा आहे आणि गर्भगृह हा चौकोनी आकाराचा आहे. मंदिर हे शेंदरी रंगाने रंगवलेले आहे. 

मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला खूप सारी पूजेच्या सामानाची, फुलांची, खेळण्याची आणि तलावातील मासे आणि कासवांना देण्यासाठी खाद्याची दुकाने दिसतात. 

त्रिपुरेश्वरी देवीला प्रसाद म्हणून पेढ्याचा प्रसाद चढवला जातो. त्यामुळे या परिसरात पेद्यांची देखील अनेक दुकाने आहेत. मंदिरात जाताना तुम्हाला प्रसाद आणि पूजेचे सामान घेऊन जाणे सोयीस्कर ठरते.

त्रिपुरा सुंदरी मंदिर – स्थापत्य – Tripura Sundari Mandir Construction and Foundation

त्रिपुरा सुंदरी मंदिर हे इसवी सन 1501 मध्ये बांधण्यात आले आहे. त्रिपुरा धान्य माणिक्य येथील महाराजांनी या मंदिराची स्थापना केली आहे. असे सांगितले जाते की या दुर्गा माता मानिक्या महाराजांच्या दोनदा स्वप्नात आल्या आणi त्यांना त्या ठिकाणी मंदिर बांधण्यात यावे असे सांगितले. म्हणून महाराजांनी येथे मंदिर स्थापित केले. पण याठिकाणी आधीपासून विष्णूचे मंदिर होते. त्यामुळे हे मंदिर हिंदू धर्माच्या वैष्णव आणि शकत अश्या दोन संप्रदायाच्या एकतेचे उदाहरण मानले जाते.  दोन समहुहांचे एकसया शतकात मदिरस 500 हून अधिक वर्षे झाली आहेत. 

त्रिपुरा सुंदरी मंदिराचे स्थापत्य बंगाली आहे. हे मंदिर एक-रत्न शैलीमध्ये बांधण्यात आले आहे. मंदिरास तीन स्तरीय छत असलेली रचना आहे. 

त्रिपुरा सुंदरी मंदिराचा महत्वाचा भाग म्हणजे मंदिराचे गर्भगृह. मंदिराच्या गर्भगृहात सारख्या पण वेगवेगळ्या आकाराच्या दोन मुर्त्या आहे. या मुर्त्या काळ्या पाषाणात घडवल्या गेल्या आहेत. एक मूर्ती ही 5 फूट उंच आहे. ही मूर्ती मुख्य असून देवी त्रिपुरा सुंदरीची आहे. त्रिपुरा सुंदरी जवळच मंदिरात दुसरी मूर्ती स्थापित केली आहे  मंदिरातील ही दुसरी मूर्ती 2 फूट उंच आहे.  ह्या मूर्तीस छोटो-मा म्हणजेच लहान आई म्हणून आराध्यले जाते. छोटि-मा देवी ह्या देवी चंडीची प्रतिमा असल्याचे म्हटले जाते. 

मुख्य मुर्तील असगिण्यांनी, पोषकांनी आणि फुलांनी सजवले जाते. मंदिरात देवीची सेवा करण्यासाठी पारंपरिक ब्राह्मण पंडित आहेत. दर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागते. एक एक करून दर्शन घेतले जाते. दर्षा करताना ब्राम्हण पंडित बाहेर येऊन आपले पूजेचे सामान घेतात आणि आपले नाव विचारून देवीला ते अर्पण करतात.

त्रिपुरा सुंदरी मंदिर – धार्मिक महत्त्व – Regional Importance of Tripura Sundari Temple

त्रिपुरा सुंदरी मंदिर किंवा त्रिपुरेश्र्वरी मंदिर हे 51 शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ आहे. असे अख्यायिका आहे की सतीच्या डाव्या पायाची करंगळी या ठिकाणी पडली. त्यामुळे ह्या मंदिराची स्थापना येथे करण्यात आली. येथे शक्तीची त्रिपुरसुंदरी म्हणून पूजन केले जाते. प्रत्येक शक्तिपीठ मंदिरात देवी सोबत एक भैरव स्थापित असतो. मानले जाते की भैरव हा महादेवाचे अवतार असतात आणि ते देवीचे संरक्षण करण्यासाठी देविसोबत स्थित असतात. त्रिपुरा सुंदरी मंदिरात देखील भैरव स्थापित आहे. या मंदिरातील भैरवास त्रिपुरेश संबोधले जाते.

त्रिपुरा सुंदरी मंदिरात दिवाळीच्या शुभमुहूर्तावर विशेष पूजा होते. त्रिपुरा सुंदरी देवीच्या नावाने दरवर्षी दिवाळीमध्ये मंदिराजवळ मोठी यात्रा भरते. अशावेळी देवीची भक्तिभावाने पूजा केली जाते. या जातीस 2 लक्षहून अधिक यात्रेकरू भेट देतात. देशविदेशातील अनेक भाविक यात्रेनिमित्त देवीचे दर्शन करण्यास येतात. याशिवाय दुर्गा पूजा आणि काली पूजा करण्याच्या काळात येथे भक्तिभावाने मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. नवरात्रीचा सन हा देवीसाठी विशेष मानला जातो आणि त्या काळात भकागण वेईशेशकरून डेव्हिस भेट देतात. 

सुमारे 520 वर्षांपूर्वीचे ह्या मंदिराच्या विकासाचे आणि विस्ताराचे काम अजूनही चालू आहे. 2018 मध्ये श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते फाउंडेशन स्टोन ठेवण्यात आला आहे आणि मंदिराचे विस्तराच्यले स्वरूप वाढवण्यात आले आहे. 

कल्याण सागर तलाव – Kalyan Sagar Lake

कल्याण सागर हा देवी त्रिपुरा सुंदरी मंदिराच्या पूर्वेला असलेला तलाव आहे. हा तलाव 6.4 एकर मध्ये पसरले आहे. हा पाण्याचा खूप मोठा विस्तार आहे आणि त्रिपुरा देवीला येणाऱ्या भक्तांचे हे आवडते स्थान आहे. 

कल्याण सागर हा भाविकांसाठी तीर्थ स्वरूप आहे. हा तलाव मंदिराचे सौंदर्य आणखी वाढवतो. तलावाच्या मागच्या बाजूला सुंदर , हिरव्या, नयनरम्य टेकड्या आहे ज्या मंदिराचे दृश्य अजून देखनिय बनवतात. या तलावात दुर्मिळ आढळणारे बोस्तामी कासव आहेत. त्यातील काही कासव खूप मोठे आहेत असे कासव तलावाकाठी असणाऱ्या दुकानावर अंन शोधत येतात. हिंदू धर्मामध्ये कासवाचे अधिक महत्त्व आहे. कासावास पवित्र आणि शुभ मानले जाते. अनेक भक्तगण या कासवांना एक परंपरा म्हणून अन्न खाऊ घालतात. यात प्रामुख्याने मुरी हा पदार्थ श्रध्देने खाऊ घातला जातो. 

त्रिपुरा सुंदरी मंदिर – जाण्याचा मार्ग – Way towards Tripura Sundari Temple

त्रिपुरा सुंदरी मंदिर पासून 2 किमी अंतरावर माताबरी रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे भाविकांना रेल्वे मार्गाने जाण्यासाठी त्रिपुरा रेल्वेने जाऊन माताबरी रेल्वे स्थानकावर उतरावे लागेल. तेथून रिक्षा किंवा बसणे भाविक त्रिपुरा सुंदरी मंदिरापर्यंत पोहचू शकतात. 

विमान मारागणे जाण्यासाठी त्रिपुरा सुंदरी मंदिराच्या सर्वात जवळ असणारे विमानतळ म्हणजे आगरतळ विमानतळ. भाविक आगरतल विमानतळापर्यंत विमानाने प्रवास करू शकतो. तेथून पुढे त्रिपुरा सुंदरी मंदिर हे अवघ्या 55 किमी अंतरावर आहे. हा प्रवास भाविक बसणे करू शकतात. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top