भारतात दहा हजाराच्या आत डोंगरदऱ्यांच्या ट्रीपसाठी ठिकाण || Places to Visit Under 10k in India for Mountains and Trekking
भारत हा देश तसा फिरण्यासाठी अगदी मोठा. तुम्हाला जर गजबजलेले शहर आवडत असतील तर तुम्ही दिल्ली मुंबईसारख्या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता. तुम्हाला जर शांती हवी असेल तर तुम्ही हिमाचल प्रदेश आणि हिमालय या भागात जाऊ शकता. तुम्हाला जर बीचेस बघायचे असतील तर गोवा आणि गोखरना या ठिकाणी तुम्हाला बीच बघायला मिळतील. तुम्हाला जर एक रीच असलेले कल्चर किंवा युनिक अशा ठिकाणी जायचे असेल तर तुमच्यासाठी नॉर्थ ईस्ट भाग खूप सुंदर आहे. आपला भारत देश तसा खूप जास्त समृद्ध आहे.
तुमच्याकडे जर कमी पैसे असतील म्हणजे जर तुमच्याकडे 10 हजारांच्या आसपास पैसे असतील तर तुमच्यासाठी आज एक खास ठिकाणांची लिस्ट घेऊन आलो आहे. आपण आजच्या या लेखातून डोंगरदऱ्या असलेल्या भागा विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
मनाली (Manali)
मनाली म्हणजे प्रत्येकाच्या आवडतीचे ठिकाण. दिल्ली वरून मानली जने अगदी सोपे आहे. जवळपास 18 तासांचा कालावधी तुम्हाला लागतो. इथून तुम्हाला अगदी 1000 रुपयांमध्ये बसेस नक्की मिळतील. तुम्हाला जर अजून चांगली सेवा हवी असेल तर फकत 1500 मध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारची सुविधा युक्त बस नक्की मिळेल.
जुन्या मनाली मध्ये तुम्हाला बजेट मध्ये राहण्यासाठी हॉस्टेल सर्व्हिसेस आहेत. 2 व्यक्तींसाठी इथे तुम्हाला 1000 रुपये इतका खर्च येईल. तुम्हाला इथून मॉल रोड जवळ आहे आणि सोबतच खूप गर्दी नसल्याने निसर्गाचा देखील आनंद चांगल्या प्रकारे घेता येतो. तुम्ही जर सोलो ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला तिथे अनेक लोकांशी संवाद देखील साधता येईल.
तुम्हाला इथे गेस्ट हाऊस आणि होम स्टे सारख्या सुविधा देखील मिळतायत. तुम्हाला इथून पराशर लेक, चंदरखणी ट्रेक देखील तुम्हाला करता येईल. तुम्हाला इथे ट्रेक स्वतः देखील कमी खर्चात करता येईल कारण ट्रेकिंग कंपनी इथे मोठ्या प्रमाणत पैसे घेतात. फक्त सोबत एक गाईड घेऊन जा ज्याचे चार्जेस हे कमी असतात. व्यास्कुंड आणि ब्रिगु सारख्या ठिकाणी देखील तुम्ही स्वतः जाऊ शकता. लाहोल या ठिकाणी देखील भेट देऊ शकतात.
कासोल या ठिकाणी तर तुम्ही या ट्रीपला नक्कीच भेट द्यायला हवी. कसोल मध्ये तर सर्व काही खूप कमी खर्चात होते. इथे हॉस्टेल आहेत, इथ पर्यंत तुम्हाला बस सुविधा देखील मिळेल. इथून तुम्हाला खिरगंगा ट्रेक देखील करता येईल.
किंनौर (Kinnaur)
हे ठिकाण म्हणजे कल्पा किनौर. तुम्ही इथे दोन पध्दतीने पोहोचू शकतात. दिल्ली वरून बस पकडुन तुम्ही रिकाँग पिओ इथे या किंवा तुम्ही हा प्रवास दोन टप्प्यात दिल्ली ते शिमला आणि शिमला ते रिकोंग पियो असा करू शकतात. हा प्रवास मोठा आहे मात्र खूप सुंदर आणि काहीतरी नवीन शिकविणारा आहे. हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट मधून तुम्ही प्रवास करतात आणि त्यामुळे त्यांचा खर्च देखील कमी येतो. तुम्हाला हा प्रवास 1000 रुपयांत करता येतो.
तुम्हाला इथे बुकिंग करण्यासाठी ऑनलाईन देखील करता येते. मात्र त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला अगदी कमी खर्चात ही बुकिंग करता येते. कीनौर येथे होळी हा सण अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो आणि त्यामुळे तुम्ही एकदा नक्की त्यांची परंपरा जाणून घेण्यासाठी सणांच्या काळात इथे भेट द्यायला हवी.
कींनौर शेजारीच तुम्हाला स्पिती आहे. स्पिती मध्ये एक प्रवास हा पूर्णपणे 10 हजार रुपयांमध्ये होऊ शकतो तर त्याकडे देखील तुम्ही बघू शकतात. तुम्हाला तिथे होम स्टे आणि गेस्ट हाऊस नक्की मिळतात. तुम्हाला इथून सिक्कीम भागातील अनेक ठिकाणं भेट देता येतील .
बोनस पॉइंट
हिमाचअल प्रदेश मध्ये तुम्हाला या कॅटेगरी मध्ये अनेक ऑप्शन बघायला मिळतील. हिमाचल प्रदेश मध्ये कसोली या ठिकाणी तुम्ही एक दिवस भेट देऊ शकतात. कासोली जवळच चैल हे ठिकाण आहे. तुम्हाला इथेच शिमला हे ठिकाण असून तिथे तुम्हाला खूप कमी खर्चात सर्व काही मिळते. बारोट व्हॅली हे ठिकाण देखील पर्यटकांकडून दुर्लक्षित असे आहे.
उत्तराखंड येथे चक्राता हे ठिकाण प्रसिद्ध आहे. दिल्ली ते डेहराडून बस पकडुन तुम्हाला चक्रता येथे जाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जवळपास 7 तासांचा हा सुखद प्रवास आहे.
ओली या ठिकाणी देखील तुम्ही भेट देऊ शकतात. ओली हे जास्त दूर आहे मात्र त्यासाठी तुम्हाला आधी हृषिकेश येथे यावे लागेल. ऋषिकेश वरून तुम्हाला सकाळी बस किंवा शेअर्ड टॅक्सी मिळेल. जोशिमठ इथपर्यंत तुम्हाला ही बस मिळेल. जोशी मठ पासून रोपवे आणि पुढे केबल कार घेऊन तुम्ही ओली पर्यंत पोहोचू शकतात. याची ट्रीप ची किंमत ही 1500 रुपये इतकी आहे. इथे तुम्हाला खूप सारे होम स्टे मिळतील जे पॉकेट फ्रेंडली आहेत.
डोंगरदऱ्यांमध्ये फिरायचं असेल तर आपला सह्याद्री काही कमी नाही. मात्र या सह्याद्री विषयी एक पूर्ण लेख लिहिणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे आता आपण पुढील लेखांमध्ये सह्याद्रीमध्ये कमी खर्चात फिरता येणारे ठिकाण बघणार आहोत ज्या ठिकाणी तुम्ही विकेंड ला आपल्या कुटुंबासोबत नक्की भेट देऊ शकता.