नेपाल मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Nepal in Marathi (Part 1)

20230721_084941.jpg

नेपाल मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Nepal in Marathi (Part 1)

समृद्ध सांस्कृतिक वारसा असणारा सुंदर हिमालयात वसलेला नेपाळमध्ये चित्त थरारक दृश्य आहे. काठमांडू व्हॅलीच्या शांत वैभव पासून माउंट एव्हरेस्टच्या उत्तुंग शिखरापर्यंत हे शोधक आणि पर्यावरणी प्रेमींसाठी स्वर्ग असलेले देश म्हणजे नेपाल.

नेपाल या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल, तर आपल्याला हवी ती संपूर्ण माहिती या लेखात आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. नेपाल या ठिकाणाचे पर्यटक आकर्षाने, फिरण्यासाठी जागा, तेथील तिकीट, राहण्यासाठी जागा, वाहतूक कसे करावे, संपूर्ण माहिती त्या जागेबद्दल आपण या लेखात पाहणार आहोत.

या लेखामध्ये आज आपण नेपाल या ठिकाणाबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. धार्मिक स्थळांबरोबरच पर्यटक आकर्षाने, फिरण्यासाठी जागा, मज्जा येईल अशी संपूर्ण ठिकाणे पाहणार आहोत, आणि त्या ठिकाणासाठी जाण्यासाठी लागणारे वाहतूक, राहण्यासाठी सुविधा हे संपूर्ण पाहणार आहोत.

नेपाल या ठिकाणाबद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी आमचा लेख वाचा.

नेपाल मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Nepal in Marathi

नेपाल एक शांत आशियाई देश, पर्यावरण प्रेमी आणि सहा शोधणाऱ्यांसाठी अतिशय सुंदर पर्यटन स्थळे आहेत. ऐतिहासिक राजवाडे, मंदिरे आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेली काठमांडू व्हॅली पाहणे आवश्यक आहे. अन्नपूर्णा सर्किट आणि एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प मार्ग हायकर साठी रोमांचक ट्रेक देखील आहे. पोखरा हिमालयात लपलेले एक शांत तलाव किनारी शहर त्याच्या मोठ्या मोठ्या तलावांनी आणि पर्वतीय दृश्यांनी मोहित करते. वन्यजीव प्रेमींसाठी चितवन राष्ट्रीय उद्यान त्याच्या अनोख्या वनस्पती आणि प्राण्यांमुळे आकर्षित करते. ज्यामध्ये एक शिंगी असलेला गेंडा आणि लुप्तप्राय बंगाल वाघ यांचा समावेश आहे. नेपाळचे नैसर्गिक सौंदर्य अस्सल मैत्री वैविध्यपूर्ण सांस्कृतिक मिश्रण यामुळे कोणत्याही पर्यटकांसाठी हे एक आवश्यक पर्यटक ठिकाण आहे.

नेपाल कसे पोहोचाल? How to reach Nepal

नेपाळला पोहोचण्यासाठी आपण विविध प्रकारच्या वाहतुकीचा वापर करू शकता जसे की बस, ट्रेन, विमान इत्यादी.

बस: नेपाळला भारत आणि तिबेट या शेजारील देशांमधून बसणे प्रवेश करणे शक्य आहे. नियमित बस मार्ग प्रमुख शहरे आणि शेजारच्या समुदायांना जोडण्यास मदत करतात. आपण बसच्या माध्यमातून नेपाळला जाऊ शकतो.

ट्रेन: नेपाळमध्ये थेट रेल्वे सेवा नसल्यामुळे, तिथे ट्रेनने जाण्यासाठी वेगवेगळ्या ट्रेन आणि बस किंवा विमानाचा वापर करून आपण नेपाळमध्ये होऊ शकतो. भारतात सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन गोरखपूर आहे त्यानंतर तुम्ही नेपाल सीमेवर बस किंवा कॅप घेऊन नेपाळ जाऊ शकतात.

विमान: नेपाळला पोहोचण्याचा पुढील मार्ग म्हणजे विमानाने जाणे. नेपाळमध्ये विविध आणि अनेक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. सगळ्यात मोठे म्हणजे काठमांडू मधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आहे. जगभरातील प्रमुख शहरांमधून काठमांडूला थेट उंडाने किंवा फ्लाइट्स आहेत. नेपाळला जाणारी नियमित फ्लाइट्स नेपाल एअरलाइन्स, एअर इंडिया, एमीरेट्स आणि इतर यासारख्या विमान कंपन्या द्वारे चालवली जातात. देशांतर्गत हिमालयन ट्रेकिंग साठी पोरखा आणि लुक्लासारख्या दुर्गम भागात जाण्यासाठी देशांतर्गत हिमाने देखील उपलब्ध आहेत.

तुम्ही ज्या देशातून निघत आहात त्या ठिकाणी विजा आवश्यकता आणि प्रवासाच्या मर्यादा सह नवीनतम माहिती तपासणी आवश्यक आहे कारण ते प्रत्येक देशासाठी भिन्न किंवा वेगळ्या असू शकते.

नेपाल मध्ये राहण्याची व्यवस्था कोठे होईल? Where to Stay in Nepal?

नेपाळमध्ये पर्यटकांसाठी आणि प्रवाशांसाठी निवास पर्यायाची वेगवेगळ्या नैवेद्यपूर्ण निवड आहे, ज्यामध्ये बजेटची आणि रुचीची विस्तृत श्रेणी आहे. काठमांडू आणि पोखरा सारख्या ठिकाणी बुटीक लॉजिंग, लक्झरी हॉटेल्स, गेस्ट हाउस आणि बजेट फ्रेंडली लॉज सह अनेक पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. या हॉटेल्स आधुनिक सुविधा, आरामदायक निवास आणि आनंददायी सेवा प्रदान करण्यास सक्षम आहे.

प्रवाशांना आणि पर्यटकांना स्थानिक संस्कृती आणि आदरातिथ्य यामध्ये मग्न होण्यासाठी होम स्टे चे पर्याय देखील उपलब्ध करून दिले आहेत. माऊंटन लॉज आणि टी हाऊस लोकप्रिय ट्रेकिंग भागात हायकर साठी मूलभूत निवास आणि भोजन प्रदान करते. काही प्रदेशांमध्ये कॅम्पिंग हा देखील एक पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही भव्य निवासास्थान निवडाल किंवा आरामदायक बजेट साठी अनुकूल, नेपाल तुमचा मुक्काम आनंददायी आणि संस्मरणीय बनवण्यासाठी बरेच विविध पर्याय उपलब्ध करून देते.

नेपाल मध्ये भेट देण्यासाठी ठिकाणे – Places to Visit in Nepal

समृद्ध सांस्कृतिक वारसा असणारा सुंदर हिमालयात वसलेला नेपाळमध्ये चित्त थरारक दृश्य आहे. काठमांडू व्हॅलीच्या शांत वैभव पासून माउंट एव्हरेस्टच्या उत्तुंग शिखरापर्यंत हे शोधक आणि पर्यावरणी प्रेमींसाठी स्वर्ग असलेले देश म्हणजे नेपाल.

  1. पशुपति नाथ टेम्पल (Pashupati nath temple)

नेपाल मधील काठमांडू येथे पशुपतिनाथ मंदिरे हे भगवान शिवाला समर्पित एक पवित्र हिंदू मंदिर आहे. हे मंदिर युनिस्को चे जागतिक वारसा स्थान आहे आणि नेपाळच्या सर्वात महत्त्वाच्या तीर्थ क्षेत्रांपैकी एक देखील आहे. मंदिर परिसर तिच्या धार्मिक विधी, शमशान घाट आणि आध्यात्मिक वातावरण तसेच त्याच्या संदर्भात कामासाठी फार प्रसिद्ध आहे.

हे मंदिर नेपाल मध्ये सगळ्यात जास्त भेट देणाऱ्या मध्ये एक आहे. या मंदिराची वेळ आहे सकाळी दहा वाजेपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि भारतीयांसाठी या मंदिरामध्ये कोणते प्रकाश टिकीट नाहीत पण परदेशी साठी या ठिकाणी 1000 नेपाली रुपये असे तिकीट आहे.

  1. बोधनाथ स्तुपा

नेपाल मधील काठमांडू या ठिकाणावरती बौद्धनाथ स्तूप जगातील सर्वात मोठ्या स्तुपांपैकी एक आहे आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळ देखील आहे. हे बौद्धांसाठी अत्यंत धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. तुपाची आकर्षक रचना प्रार्थना ध्वजांनी लपलेली आणि मठ आणि वेढलेली पर्यटकांनी यात्रेकरूंना शांत आणि आध्यात्मिक वातावरण प्रदान करण्यास मदत करते आणि त्यामुळे या ठिकाणी फार जास्त गर्दी असती वर्षभरामध्ये. हे ठिकाण 24 तास चालू असते आणि भारतीयांसाठी याचे तिकीट आहे 100 नेपाली रुपये आणि परदेशांसाठी याची तिकीट आहेत 400 नेपाली रुपये.

  1. स्वयंभू महाचैत्या स्तूप

स्वयंभुनात स्तूप, ज्याला मंकी टेम्पल म्हणून सुद्धा ओळखले जाते हे प्रसिद्ध टेम्पल आहे, हा काठमांडू नेपाल मधील एका टेकडीवर बौद्ध स्तूप आहे. हे महत्त्वपूर्ण धार्मिक महत्त्व असलेले युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ देखील आहे. तुपाची मनमोहक रचना रंगीबिरंगी प्रार्थना ध्वज आणि माकडांची उपस्थिती हे प्रसिद्ध आध्यात्मिक पर्यटक स्थळ बनवते आणि प्रवाशांना आणि पर्यटकांना याकडे आकर्षित करते. हे टेम्पल बघण्यासाठी आपल्याला 300 ते 400 पायऱ्या चढाव्या लागतील मगच आपण तेथे जाऊ शकतो किंवा मग आपल्याकडे आपल्या स्वतःचं वाहन असल्यावर ते आपण मागच्या रस्त्याने जाऊन 50 ते 60 पायऱ्या चढून त्या मंदिराला पोहोचू शकतो. हे स्वयंभू नात स्तुपा दिवसभर चालू असते आणि भारतीयांसाठी याचे तिकीट आहे 50 रुपये नेपाली आणि परदेशांसाठी याचे तिकीट आहे 200 नेपाली रुपये.

पुढील भागात आपण इतर काही पर्यटन स्थळे आणि नेपाळ विषयी अधिकाधिक माहिती जाणून घेऊयात.

नेपाल मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Nepal in Marathi (Part 2)

नेपाल मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Nepal in Marathi (Part 3)

0 Replies to “नेपाल मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Nepal in Marathi (Part 1)”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top