नेपाल मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Nepal in Marathi (Part 2)

20230721_084958.jpg

नेपाल मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Nepal in Marathi (Part 2)

आपण मागील भागात नेपाळ विषयी महत्वाची माहिती जाणून घेतली. आजच्या या लेखाच्या माध्यामतून आपण नेपाळ मधील इतर काही पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये आपण धार्मिक स्थळांची माहिती, आकर्षक स्थळे, तिथे पोहोचण्याचे मार्ग, तिकीट, योग्य वेळ या सर्व बाबी जाणून घेणार आहोत.

नेपाल मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Nepal in Marathi (Part 1)

  1. थमेल एरिया

नेपाल मधील काठमांडूच्या मध्यभागी असलेले थमेल हे एक चैतन्यशील आणि गर्दीने भरलेला जिल्हा आहे. गजबजलेले रस्ते, दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि सरायासाठी हेच प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. थांबेल मध्ये पर्यटकांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी विविध सुविधा आणि सेवा उपलब्ध आहेत. ज्यामध्ये जसे की हायकिंग उपकरणांची दुकाने, स्मरणिका दुकाने, पुस्तकांची दुकाने आणि विविध भोजन साठी पाककृती पर्याय उपलब्ध आहे. थांबेल हे त्याच्या डायनॅमिक नाईट लाईफ साठी देखील ओळखले जाते ज्यामध्ये पब लाईव्ह म्युझिक स्थळे आणि सांस्कृतिक कृतींचा समावेश आहे ज्यामुळे ते पर्यटकांना आणि प्रवाशांना थमेलकडे आकर्षित करते. थामेल एरियामध्ये आपल्याला फ्री वायफाय देखील भेटेल. मेल एरिया हा 24 तास चालू असतो आणि ह्या एरिया मध्ये जाण्यासाठी कोणते प्रकारचे तिकीट नाही.

  1. भक्तपूर दरबार स्क्वेअर

भक्तापूर दरबार स्क्वेअर हे काठमांडू पासून 13 किलोमीटर लांब आहे. भक्तापूर दरबार स्क्वेअर हे नेपालच्या भक्तापूर शहरातील युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान देखील आहे. हा एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक चौक आहे जो जुन्या राजवाडे मंदिरे आणि शिल्पांनी वेढलेला आहे जे उत्कृष्ट नेवारी वास्तुकला प्रदर्शित करतात. 55 खिडक्या असलेला हा राजवाडा, न्याटापोला मंदिर, गोल्डन गेट आणि नक्षीकाम केलेले लाकूड काम हे चौरसाचे सगळ्यात जास्त आकर्षण आहे. पर्यटक आणि प्रवासी भक्तपुर दरबार स्क्वेअरचा समृद्ध सांस्कृतिक वारसा पाहण्यासाठी लांब लांबून येथे येतात. पारंपारिक उत्सवांना उपस्थित राहू शकतात आणि गोंधळलेल्या वातावरणाचा आनंद घेऊ शकतात आपण येथे. या मंदिराची वेळ आहे सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि याचे तिकीट आहे भारतीयांसाठी 500 नेपाली रुपये आणि परदेशांसाठी 1800 नेपाली रुपये.

  1. नॅशनल म्युझियम ऑफ नेपाल (नेपाळ राष्ट्रीय संग्रहालय)

नॅशनल म्युझियम ऑफ नेपाल हे काठमांडू, नेपाल मधील एक सांस्कृतिक संस्था आहे, जे नेपालचा समृद्ध वारसा आणि इतिहास प्रतिबिंबित करणाऱ्या पुरातन वास्तू, कलाकृती आणि ऐतिहासिक कलाकृतींचा विविध संग्रह दाखवते. चित्रे धार्मिक वस्तू शिल्पे आणि विविध कालखंडातील पुरातत्वीय शोध संग्रहालयात ठेवलेले दिसतात. जे देशाच्या संस्कृती सभ्यते बद्दल आणि कला बद्दल माहिती देतात. शैक्षणिक विद्वान आणि नेपाळचा अद्वितीय इतिहासाबद्दल माहिती करून घेणाऱ्या पर्यटकांना आणि प्रवाशांना हे एक मौल्यवान संसाधन आहे. नॅशनल म्युझियम ऑफ नेपाल राष्ट्रीय संग्रहालय असे देखील म्हणतात या ठिकाणी नेपाळचा बद्दल सर्व इतिहास आहे. असे म्हणतात की हे संग्रहालय 100 वर्ष जुना आहे आणि या ठिकाणी नेपाळच्या सर्व पुरातत्वीय गोष्टी ठेवलेल्या आहेत. या जागेची वेळ आहे सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत आणि इथे भारतीयांसाठी पन्नास रुपये नेपाली आणि परदेशांसाठी दीडशे नेपाली रुपया तिकीट आहे.

  1. काठमांडू दरबार स्क्वेअर

नेपाळच्या मध्यभागी स्थित काठमांडू या ठिकाणी काठमांडू दरबार स्क्वेअर हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ देखिल आहे. ही जागा इतकी चांगली आहे की हे ठिकाण बघण्यासाठी आपल्याला कमीत कमी एक ते दीड तास लागू शकतो. पुरातन मंदिरे, इमारती आणि अंगण आणि वेढलेला हा एक ऐतिहासिक चौक आहे. हा परिसर नेपाळच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा साक्ष आहे आणि उत्कृष्ट नेवार वास्तुकाला देखील येथे आहे. हनुमान धोका पॅलेस, कुमारी घर आणि तळेजू मंदिर यासारखे सुंदर स्मारके पाहुण्याद्वारे शोधली जाऊ शकतात. हे एक गळती असलेले केंद्र आहे येथे स्थानिक लोक आणि पर्यटक आणि प्रवासी सारखेच वास्तुशांती या चमत्कार पाहण्यासाठी जातात आणि शहराचा ऐतिहासिक आकर्षणात मग्न होता. ह्या काठमांडू स्क्वेअर दरबार चे वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. येथे येणार्‍या प्रवाशांसाठीच्या मध्ये भारतीयांसाठी 150 नेपाळी रुपया तिकीट आहे आणि परदेशीयांसाठी 1000 नेपाली रुपये तिकीट आहे.

  1. व्हाइट मॉनेस्ट्री

नेपाल मधील पुढील फिरण्यासाठी जागा म्हणजे व्हाईट मॉनेस्ट्री. वाईट मॉनेस्ट्रीला आणखी अमितभा मॉनेस्ट्री केव्हा सेतू घुंबा असेही म्हणतात. अतिशय शांत ठिकाण नेपाल मधील एक आहे. नेपाल मध्ये येणारा पर्यटक किंवा प्रवासी या ठिकाणी एकदा तरी जातो कारण की या ठिकाणावरून सूर्या दय आणि सूर्यास्त अतिशय सुंदर दिसतो. आणि या ठिकाणावरून आपण काठमांडू व्हॅली देखील पाहू शकतो. वाईट मॉनेस्ट्रीची वेळ आहे सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. त्या ठिकाणी कोणते प्रकारचे तिकीट नाही सगळ्यांसाठी.

  1. पटान दरबार स्क्वेअर

नेपाल मधील शहरातील पटान दरबार चौक जागतिक वारसा स्थळ आहे. हे जुने मंदिरे राजवाडे आणि लग्नासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. नेपाळच्या राजधानी काठमांडू पासून हे ठिकाण पाच किलोमीटर दक्षिणेला आहे. सर्वांमध्ये नेवार वास्तुकला आहे. लाकूड कोरीव काम धातू आणि दगडी शिल्पे या भागात दिसायला मिळतात. भीमसेन मंदिर रॉयल पॅलेस आणि कृष्ण मंदिर हा सर्वात प्रमुख आकर्षाने आहे. पठाण दरबार स्क्वेअर हे एक सांस्कृतिक केंद्र देखील आहे जेथे पर्यटक नेपाळच्या समृद्ध इतिहास आणि कलात्मक वारसा जाणून घेऊ शकतात. या जागेचे वेळ आहे सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आणि या ठिकाणी भारतीयांसाठी तिकीट आहे 150 रुपये आणि परदेशांसाठी आहे 1000 नेपाली रुपये.

  1. गार्डन ऑफ ड्रिम

काठमांडूचा गार्डन ऑफ ट्रेन ज्याला स्वप्न बागेच्या असे देखील म्हणतात. याला आणखी एक गार्डन ऑफ सिक्स सीजन असे देखील म्हणतात. ह्या बगीचायला किशोर नर्सिंग यांनी 1920 मध्ये बांधले होते. ही जागा नेपाळची राजधानी काठमांडू मधील सगळ्यात सुंदर जागा आहे हे ठिकाण बघण्यासाठी पर्यटक आणि नेपाळमधील लोक येथे कायम सतत येत असतात. गार्डन ऑफ ड्रीम याची वेळ आहे सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 6:30 पर्यंत आणि याचे तिकीट आहे 400 नेपाली रुपये सगळ्यांसाठी.

  1. ताउदहा लेक

नेपाल मधील पुढील फिरण्यासाठी जागा म्हणजे ताउदहा लेख. ताऊ दहा लेक हे सगळ्या साईडने लपलेला आहे. या लेक मध्ये आपल्याला पाहायला भेटतील वेगवेगळ्या प्रकारचे पाण्यातील मासे पक्षी आणि इतर प्राणी. असे म्हणतात की लेक डोंगराला कापून बनवण्यात आले होते कारण की पक्षांना राहण्यासाठी जागा होण्यासाठी पण आता हे जागा पर्यटकांसाठी एक आकर्षण बनली आहे.

ही जागा 24 तास चालू असते आणि या ठिकाणी भारतीयांसाठी 50 नेपाली रुपये असे टिकीट आहे आणि परदेशीयांसाठी 70 नेपाली रुपये आहे.

नेपाळ हा देश इतकाच फिरायला नसून यामध्ये अजूनही काही पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे उर्वरित पर्यटन स्थळांची माहिती आपण पुढील आणखी एका भागात जाणून घेणार आहोत.

नेपाल मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Nepal in Marathi (Part 3)

0 Replies to “नेपाल मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Nepal in Marathi (Part 2)”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top