नेपाल मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Nepal in Marathi (Part 3)

20230721_085009.jpg

नेपाल मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Nepal in Marathi (Part 3)

मागील दोन भागांमध्ये आपण क्रमाने नेपाळ विषयी पर्यटन दृष्ट्या महत्वाची माहिती आणि नेपाळ मधील पर्यटन आणि धार्मिक स्थळे यांची माहिती जाणून घेतली. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण मागील लेखात सांगितल्या प्रमाणे आकाराने लहान असलेल्या मात्र पर्यटनाच्या बाबतीत खूप मोठ्या असलेल्या या देशातील इतर काही पर्यटन स्थळे जाणून घेणार आहोत.

नेपाल मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Nepal in Marathi (Part 1)

नेपाल मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Nepal in Marathi (Part 2)

  1. गुह्येश्वरी देवी

नेपाळमधील काठमांडू येथील गुहेश्वरी देवी मंदिर हे एक प्रमुख हिंदू मंदिर आहे. हे भगवान शिवाची जोडीदार देवी पार्वती यांना समर्पित मंदिर आहे. मंदिराला धार्मिक महत्त्व खूप जास्त आहे. हे शक्तिपीठांपैकी एक असल्याचे म्हटले जाते जिथे देवीचे शरीराचे अवयव पडले होते असे सांगितले जाते. हे जागा हिंदूंसाठी आणि तांत्रिक लोकांसाठी फार महत्त्वाची आहे कारण की येथे ते पूजा करतात. आशीर्वाद घेण्यासाठी आणि धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्यासाठी भाविक लांब लांबून या मंदिरामध्ये येतात. या मंदिराची वेळ आहे सकाळी 4 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत आणि येथे कोणत्या प्रकारचे तिकीट नाही.

  1. पोखरा मार्केट

नेपाल मधील पुढील फिरण्यासाठी जागा म्हणजे पोखरा मार्केट हे मार्केट दोन भागांमध्ये विभागलेले आहे. उत्तर आणि मध्यभाग हे मार्केट पोखरा सिटी मधले सगळ्यात मोठे मार्केट आहे आणि येथे प्रत्येक वस्तू उपलब्ध आहेत त्या पर्यटकांना लागतात, येथे काठमांडू पेक्षा स्वस्त आणि चांगल्या वस्तू मिळतात. हे मार्केट ला भेट देण्यासाठी वेळ आहे सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत. येथे येण्यासाठी कोणते प्रकारचे टिकीट नाही.

  1. पुमदिकोट शिव मंदिर

नेपाल मधील पुढील फिरण्यासाठी किंवा धार्मिक ठिकाण म्हणजे पुमदिकोट शिवमंदिर. हे नेपाल मधील सगळ्यात मोठ्या मूर्ती पैकी एक आहे हे प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे हे हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या देवांपैकी एक असलेल्या भगवान शिवाला समर्पित मंदिर आहे आणि हे मंदिर पुमदिकोट गावात आहे. या मंदिरात भाविक प्रार्थना करतात आणि शांत आणि गंभीर वातावरणात भगवान शिवाचा आशीर्वाद घेतात. ह्या मंदिराची उंची आहे 108 फूट. ह्या जागेची वेळ आहे सकाळी 6 वाजेपासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आणि या ठिकाणी कोणते प्रकारचे तिकीट नाही.

  1. वर्ल्ड पीस पगोडा

नेपाळमधील पुढील भेट देण्यासाठी जागा म्हणजे वर्ल्ड पीस पगोडा, नेपाल मधील पोखरा येथील वर्ल्ड पीस पगोडा ही टेकडीवरील बांधली गेली म्हणजे पूर्वी बौद्ध धार्मिक ठिकाण आहे. हे हिमालय आणि सेवा तलावाच्या सुंदर दृश्यांनी वेढलेल्या भेट देणाऱ्यांसाठी शांतता आणि सौंदर्याचे दिवाण म्हणून कार्य करते. पाचशे पायऱ्या चढून आपण या ठिकाणावर जाऊ शकतो किंवा मग दुसरा रस्ता असा आहे मागच्या बाजूने आपल्या गाडीवरती जाऊन 50 पायऱ्या चढून आपण या ठिकाणावर जाऊ शकतो.  याची वेळ आहे सकाळी 5 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत  येथे कोणत्या प्रकाश तिकीट नाही.

  1. महेंद्र गुफा

नेपाळमधील पुढील भेट देण्यासाठी जागा म्हणजे महिंद्र गुफा. पोखरामध्ये सगळ्या त फेमस गुफामध्ये एक म्हणजे महिंद्र गुफा. या गुफा मध्ये फार अंधार आहे. या उपाशी टाईम आहे सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि येथे तिकीट भारतीयांसाठी 80 नेपाली रुपये आहे आणि परदेशी यांसाठी 150 नेपाली रुपये आहे.

  1. गुप्तेश्र्वार महादेव गुफा

नेपाळमधील पुढील फिरण्यासाठी जागा म्हणजे पोखरा मधील गुप्तेश्वर महादेव गुफा, असे म्हणतात की ही गुफा सोळाव्या शतकामध्ये बांधण्यात आली होती आणि 1991 मध्ये ही सापडली. या गुफामध्ये देवी फॉल चे पाणी येते. जेव्हा पण तुम्ही एक गुफा पाहण्यासाठी जाताना तेव्हा तुम्हाला एक गोलाकार पायऱ्या दिसतीन. या गोपाच्या आत मध्ये एक भगवान् शिवजींचा एक मंदिर आहे. या गुफा चे टाईम आहे सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि येथे तिकीट आहे 100 नेपाली रुपये.

  1. देवीस वॉटर फॉल

नेपाल मधील पुढील भेट देण्यासाठी जागा म्हणजे पोखरा मधील देवीचे वॉटर फॉल, या वॉटरफॉल मध्ये पाणी 500 फूट वरून खाली पडते आणि खाली गुफा मध्ये जाऊन मिळते. देवीस वॉटर फॉल चा टिकीट घेतल्यानंतर आपण आत मध्ये गेल्यावर ती आपल्याला वॉटर फॉल तर दिसेलच पण आपण तेथे फ्लोरा आणि फोना पण पाहू शकतो.  देवीस वॉटर फॉल चा वेळ आहे सकाळी 5 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आणि येथे 100 रुपये नेपाली तिकीट असे आहे.

  1. फेवा लेक

नेपाल मधील पुढील भेट देण्यासाठी जागा म्हणजे पोखरा मधील फेवालेक हे लेख नेपाळमध्ये सगळ्यात मोठा लेक आहे आणि सुंदर देखील आहे. हे राणीबागच्या मधी वसलेले आहे. या लेक पासून अन्नपूर्णा डोंगर आणि धावलागिरी डोंगर पण आपण पाहू शकतो अतिशय सुंदर आहे. अतिशय नैसर्गिक रम्य आणि जगात कुठेच न दिसणारा सूर्यास्त या नदी तून आपल्याला पाहायला मिळतो जो आपण वोटिंग करताना पाहू शकतो संध्याकाळच्या वेळेस. हे नदी पाहण्यासाठी आपल्याला एक ते दीड तास लागू शकतो. ही जागा 24 तास चालू असते आणि येथे पण ते प्रकारचे तिकीट नाही पण आपल्याला बोटिंग करण्यासाठी खर्च येईल.

  1. सारंग कोट

नेपाल मधील पुढील जागा म्हणजे सारंग कोट, या ठिकाणावरून आपण संपूर्ण पोखरा पाहू शकतो अतिशय नैसर्गिक रंग ठिकाण तिथून दिसते आपण इथून सगळ्या नद्या पाहू शकतो डोंगर पाहू शकतो. या जागेवरून आपण अन्नपूर्णा डोंगर आणि धावलागिरी डोंगर सुद्धा आपण होऊ शकतो अतिशय सुंदर येथून दिसते.  या ठिकाणावरून आपण पॅराग्लायडिंग, मोटो रिंग इत्यादी गोष्टी करू शकतो. ही जागा 24 तास चालू असते आणि येथे कोणत्या प्रकारचे एन्ट्री फी नाही.

  1. हँगिंग ब्रीज

पोखरा मधील पुढील भेट देण्यासारखी जागा म्हणजे हँगिंग ब्रिज सगळ्यात लांब पाचशे मीटर लांबी आहे असं ब्रिज म्हणजे हँगिंग ब्रिज. हे ब्रिज 2016 मध्ये बांधण्यात आले होते. ही जागा 24 तास चालू असते आणि येथे येण्यासाठी कोणतेही फी नाही.

  1. आंतरराष्ट्रीय पर्वत संग्रहालय

पुढील भेट देण्यासारखी जागा म्हणजे आंतरराष्ट्रीय पर्वत संग्रहालय, त्या जागेवरती आपण पाहू शकतो डोंगरच्या लागणारे साहित्य. ज्या लोकांना डोंगर चढणे आवडते त्यांच्यासाठी एक सगळ्यात चांगल्या ठिकाणी राहील पाहण्यासाठी. या जागेची वेळ आहे सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी पाच पर्यंत आणि भारतीयांसाठी याच्या टिकीट आहे 200 नेपाली रुपये आणि परदेशांसाठी अशी तिकीट आहे 400 नेपाली रुपये.

  1. रूपा ताल लेक

पोखरा मधील पुढील पाहण्यासाठी जागा म्हणजे रूपा ताल लेक, ही नदी गोड पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. ही लेक समुद्र पासून सहाशे मीटर उंची वरती आहे आणि 135 हेक्टर्स मध्ये पसरलेली आहे. ही जागा 24 तास चालू असते आणि येथे येणे फ्री आहे.

  1. बॅगनस लेक

पोखरा मधील पुढील पाहण्यासाठी जागा म्हणजे बॅगनस लेक. हे तलाव नेपाळमधील तिसरे सर्वात मोठे तलाव आहे. हे अतिशय सुंदर निसर्ग ठिकाणावरती असलेले तलाव आहे. याच्या एका बाजूला एक खुदी खोला डॅम आहे. ही जागा 24 तास चालू असते आणि येथे फ्री आहे.

  1. बिंद्या बासणी मंदिर

पोखरा मधील पुढे जागा म्हणजे बासनी मंदिर हे मंदिर पोखरा मधील सगळ्यात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. असे म्हणतात की हे मंदिर चे काम 18 व्या शतकात झाले होते जे पृथ्वी नारायण शहा यांनी केले होते. या मंदिराची वेळ आहे सकाळी 5 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आणि येथे कोणते प्रकारचे प्रवेश फी नाही.

1 Reply to “नेपाल मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Nepal in Marathi (Part 3)”

  1. 707 says:

    I don’t even knoww how I enjded up here, but I thoght thiks post wass good.
    I do not know who yyou aree butt certtainly you’re giing to a famouus bloggerr if you aren’t alrready 😉 Cheers!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top