वाराणसी मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Varanasi in Marathi (Part 2)
वाराणसी मधील पर्यटन स्थळे याविषयी आपण मागील लेखात सुरुवात केली. वाराणसी मध्ये नक्की काय काय करता येते, वाराणसी कसे पोहोचाल, वाराणसी मधील राहण्याची व्यवस्था आणि भरपूर साऱ्या गोष्टी आपण मागील लेखात बघितल्या. वाराणसी मधील मुख्य 4 पर्यटन स्थळे देखील आपण तिथे जाणून घेतली.
वाराणसी मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Varanasi in Marathi (Part 1)
आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण वाराणसी मधील इतर काही पर्यटन स्थळे आणि त्यांची माहिती जाणून घेणार आहोत. यातील काही पर्यटन स्थळे हि कदाचित अनेक पर्यटकांची राहून जातात किंवा माहिती नसतात त्यामुळे याविषयी नवीन माहिती देखील तुम्हाला आज जाणून घेता येईल.
- भारत माता मंदिर
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे भारत माता मंदिर हे भारत मातेला समर्पित असलेले एक प्रकारचे मंदिर आहे. या मंदिराचे उद्घाटन महात्मा गांधी यांच्या हस्ति करण्यात आले होते आणि भारताचे संगम रवरी नकाशात केला आहे. हे मंदिर राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिनिधित्व करते आणि भारताच्या संस्कृती आणि इतिहासिक आणि अध्यात्मचा सन्मान करते. हे मंदिर बांधण्यात आले ते बाबू शिवप्रसाद गुप्ता यांच्याकडून. या मंदिराची वेळ आहे सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत आणि याचे कोणतेही प्रकारचे तिकीट नाही.
- आलम गिर मस्जिद
आलमगीर मस्जिद हे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील मध्ययुगीन प्राचीन मस्जिद आहे. या मस्जिद ला बेनी माधव का दरेरा असेही किंवा ज्ञानवापी मस्जिद असेही म्हणतात. हे मस्जिद औरंगजेबच्या काळात बांधले गेले आणि प्रसिद्ध विश्वनाथ मंदिराशेजारी आहे. मस्जिद मध्ये उल्लेखनीय मोगल वास्तुकला आहे आणि वाराणसीच्या मुस्लिम अल्पसंख्यांक साठी प्रार्थना स्थळ म्हणून काम करते. या आलमगीर मस्जिद ची वेळ आहे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आणि येथे कोणत्या प्रकारचे तिकीट नाही.
- काल भैरव मंदिर
कालभैरव मंदिर हे उत्तर प्रदेशामध्ये वाराणसी येथे एक प्रसिद्ध मंदिर आहे जय भगवान शिवाचे उग्र स्वरूप असलेल्या भगवान भैरवांना समर्पित आहे. हे शहरातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे असे म्हटले जाते. वाराणसीचे सरक्षक देव भगवान भैरव यांच्याकडून आशीर्वाद आणि संरक्षण मिळवण्यासाठी भाविक मंदिरात दर्शन घेण्यास येतात. या मंदिराची वेळ आहे सकाळी 5:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि दुपारी 3 ते 10:30 वाजेपर्यंत रात्री आणि येथे कोणत्या प्रकाराचे तिकीट नाही.
- दुर्गा माता मंदिर
उत्तर प्रदेश मधील वाराणसी येथील दुर्गा माता मंदिर जे दुर्गा मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. हे वाराणसी मधील एक प्रमुख हिंदू मंदिर आहे जे दुर्गादेवीला समर्पित केले आहे. हे मंदिर सुप्रसिद्ध दुर्गा कुंडाच्या जवळ आहे. आणि नवरात्र उत्सव दरम्यान हे एक लोकप्रिय तीर्थ क्षेत्र होते. दुर्गा मातेचा आशीर्वाद आणि दर्शन घेण्यासाठी सर्व श्रद्धा भक्त या मंदिरात येतात. हे दुर्गा माता मंदिर अससी घाटापासून पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे. असे म्हणतात की या मंदिरामध्ये दुर्गा मातेची प्रतिमा कोणत्याही मनुष्यद्वारे ही बनवण्यात आलेली होती तेथे प्रकट झाली होती. मंदिराची वेळ आहे सकाळी 5 वाजेपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 वाजेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत आणि येथे कोणत्या प्रकारचे तिकीट नाही.
- राम नगर फोर्ट
उत्तर प्रदेश मधील वाराणसी येथील रामनगर किल्ला हा गंगा नदीच्या पूर्वेकडील एक मध्ययुगीन किल्ला आहे. हा किल्ला 18 व्या शतकात वाराणसीच्या राजाने बांधले होते आणि ते राजघराण्याचे वडिलोपार्जित कार्य करते. या किल्ल्यामध्ये मुघल आणि राजपूत स्थापत्य शैलीचे मिश्रण आहे तसेच शाही प्राचीन वस्तू आणि विविध संग्रहालय आहे. या किल्ल्यामध्ये जाण्याचे कोणतेही प्रवेश तिकीट 50 रू. आणि त्याच्या आत मध्ये एक संग्रहालय आहे ज्याचे तिकीट आहे 75 रुपये. हा किल्ला वाराणसी पासून 14 किलोमीटर लांब आहे. या किल्ल्याचे टिकीट आहेत 50 रुपये आणि याची वेळ आहे सकाळी 10 वाजता ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत.
- सारनाथ स्थुपा
उत्तर प्रदेश मधील वारणासी येथील सारनाथ स्तूप आहे एक प्रमुख बौद्ध निशाणी आहे. हे गौतम बुद्धाच्या ज्ञान प्राप्तीनंतरच्या पहिल्या उपदेशाच्या स्थानाचे स्मरण करते असे म्हणतात. ही जागा फिरण्यासाठी आपल्याला कमीत कमी एक ते दीड तास लागेल आणि आपण येथे पर्यटक मार्गदर्शन घेऊ शकतात. या ठिकाणी आपल्याला धार्मिक स्तूपा देखील पाहायला मिळेल आणि त्याची उंची 43.6 मीटर लांब आणि 36 मीटर रुंदी ला आहे. जसे वाराणसी हिंदू धर्मासाठी एक धार्मिक स्थळ आहेत असे हे वाराणसी देखील बौद्धिजम करणाऱ्या बौद्धिक लोकांसाठी एक धार्मिक स्थळ आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आणि येथे 25 रुपये तिकीट आहे.
- चौखंडी स्तुपा
चौखंडी स्तूपा हा उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एक बौद्ध स्तुपा आहे. गुप्त घराण्याच्या काळात इसवी सन पाचव्या किंवा सहाव्या शतकात बांधण्यात आल्याच्या सांगितले जाते. हेच स्तूपा त्याच्या विशिष्ट अष्टकोनी आकारासाठी आणि सुंदर कोरीव कामासाठी ओळखला जातो आणि तो एक पुरातत्व स्थळ आणि बौद्ध उपासनेचे स्थान दोन्ही म्हणून कार्य करते. याची वेळ आहे सकाळी 6 ते संध्याकाळी 6 आणि याचे तिकीट 20 रुपये असे आहे.
- गोडोलिया मार्केट
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील कोडोली या मार्केट हे एक भरभराटीचे बाजार आहे. प्रसिद्ध विश्वनाथ मंदिर जवळ असल्याने एक लोकप्रिय व्यवसाय आणि सांस्कृतिक ठिकाण देखील बनले आहे. हस्तकला मसाले दागिने कापड आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विकणाऱ्या बाजारपेठेत पर्यटकांना खरेदी आणि आनंद घेण्याचा अनुभव इथे मिळू शकतो. या बाजाराची वेळ आहे सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत.
- दश अश्वमेध घाट
वाराणसी मधील पुढची जागा म्हणजे दश अश्वमेध घाट. असं म्हणतात हे जगात सर्वात जास्त धार्मिक जागा आहे वाराणसी मधील, आणि येथे संध्याकाळची आरती पाण्यासाठी लोक लांब लांबून येथे येतात. हा घाट पेशवा बालाजी बाजीराव यांनी 1748 मध्ये बांधला होता. आणि आता हा घाट भारतीय सरकारने सुधारित केला आहे कारण जास्तीत जास्त पर्यटक येथे यावे म्हणून. वाराणसी मध्ये आल्यावरती येतील गंगा आरती सगळ्यात मोठी आरती आहे जे इथे दश अश्वमेध घाटावरती होती. असे म्हणतात की या घाटामध्ये आंघोळ केल्यानंतरच लोक काशी विश्वनाथ मंदिर ला भेट देण्यासाठी जातात.
- अससी घाट
उत्तर प्रदेश मध्ये एक वाराणसी येथे असे घाट हा एक सुप्रसिद्ध आणि आदरणीय घाट आहे. अससी नद्यांच्या संगमावर असल्याने धार्मिक वेधी आणि उत्सवांसाठी हे एक धार्मिक प्रमुख स्थान आहे. भक्त पवित्र स्नान करण्यासाठी पूजा करण्यासाठी आणि आश्चर्यकारक गंगा आरती पाहण्यासाठी येथे लांब लांबून येतात. घाट निसर्गरम्यदृष्टांसाठी प्रसिद्ध आहे आणि बोटीतून फिरणे आणि अनेक स्टोअर्स आणि भोजनालयांचा उत्साही वातावरण देखील या ठिकाणी आहे.
- मणिकर्णिका घाट
उत्तर प्रदेश येथील वाराणसी मधील मणिकर्णिका घाट हा एक सर्वात जुना आणि ऐतिहासिक सुप्रसिद्ध शमशान घाटन पैकी एक आहे. हिंदू धर्मात याला मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे कारण या घाटावर अंत्यसंस्कार केल्याने जीवन आणि मृत्यूच्या फेरीतून सुटका होते असे म्हणतात. हा घाट 24 तास चालू असतो आणि या ठिकाणी कोणत्या प्रकारचे तिकीट नाही.
- तुलसी घाट
वाराणसी चे प्रसिद्ध अससी घाटाजवळ आहे तुलसी घाट. ही जागा फिरण्याची सगळ्यात चांगली वेळ आहे दिवाळीच्या वेळेस कारण की या ठिकाणी असंख्य श्रद्धाळू दिवाळीच्या वेळेस येथे येतात. या गटाचे नाव तुलसीदास यांच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे जे राम चरित्र मानस चे लेखक आहे. हा घाट 24 तास चालू असतो आणि या ठिकाणी येण्याचे कोणतेही तिकीट नाही.
0 Replies to “वाराणसी मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Varanasi in Marathi (Part 2)”