जगन्नाथ रथ यात्रा एक अदभुत कथा || Hidden Secrets of Jagannath Puri Rath Yatra in Marathi (Part 2)

WhatsApp-Image-2023-08-10-at-08.30.07.jpg

ओडिसा राज्यातील जगन्नाथ पुरी येथील मंदिराविषयी आपण रहस्यमय गोष्टी जाणून घेत आहोत. भगवान श्रीकृष्ण यांचे वास्तव्य आजही असलेल्या या मंदिराविषयी आपण मागील लेखात विज्ञानाला देखील अचंबित करणाऱ्या काही गोष्टी बघितल्या आहेत. त्यात आता अजून भर घालूयात. 

जगन्नाथ पुरी मंदिरातील प्रसादाचे रहस्य

जगन्नाथ पुरी येथे येणाऱ्या भक्तांमध्ये दररोज प्रसाद वाटला जातो. त्यांच्यासाठी हा प्रसाद दररोज बनवायला देखील जातो. मात्र या मंदिरात होणाऱ्या प्रत्येक घटनेत भगवान कृष्ण यांच्या लीला दडलेल्या आहेत.

मंदिरात दररोज 500 लोकांसाठी प्रसाद बनवला जातो. कधी कधी भक्तांची संख्या ही हजारांच्या वर जाते तरी सुद्धा आजपर्यंत कधीच हा प्रसाद कमी पडलेला नाही. आजपर्यंत कधी एक अन्नाचा कण सुद्धा वाया गेलेला नाही. 

जर आपण हा विचार केला की अन्न कमी पडू द्यायचे नाही आणि जास्त देखील होऊ द्यायचे नाही तर हा अंदाज मनुष्याने बांधणे कधीही शक्य नाही. 

जगन्नाथ पुरी मंदिरातील अन्न शिजविण्याच्या भांड्यांचे रहस्य

प्रसाद वाटणे ही गोष्ट तर वेगळीच आहे मात्र प्रसाद बनविण्याचे रहस्य देखील वेगळे आहे. लाकडाच्या वर 7 भांडे एक मेकांवर ठेवून प्रसाद बनवला जातो.  विज्ञान आणि वैज्ञानिक सिद्धांत हेच सांगतात की सर्वात आधी खालच्या भांड्यातील प्रसाद हा तयार व्हायला हवा. मात्र पुरी येथील जगन्नाथ मंदिरात विज्ञान काम करत नाही असेच म्हणायला हवे. 

इथे सर्वात आधी सर्वात वर ठेवलेल्या भांड्यातील प्रसाद शिजतो. मग त्यानंतर दुसऱ्या वरच्या भांड्यातील आणि अखेर सर्वात खालच्या भांड्यातील प्रसाद तयार होतो. ही गोष्ट आजही कोणी समजू शकलेले नाही.

या मंदिराची सुंदरता शब्दात सांगता येणे कठीण आहे. हे इतके भव्य मंदिर इतक्या पुरातन काळात कोणत्याही प्रकारे तंत्रज्ञान नसताना कसे बनविले गेले असेल हा प्रश्न नेहमीच आहे.

जगन्नाथ पुरी मंदिर कळसाच्या सावलीचे रहस्य

214 फूट उंच असलेल्या या मंदिराच्या शिखराची सावली आजपर्यंत कधीच बघितली नाहीये. कारण ती सावली पडताच नाही. सावली बनतच नाही आणि त्यामुळे आपल्याला ती बघता येत नाही. आपल्याकडे एक दिवस 5 मिनिटांसाठी शून्य सावली दीन असतो मात्र जगन्नाथ पुरी मंदिराच्या शिखरावर असलेल्या कळसासाठी प्रत्येक दिवस हा शून्य सावली दिवस आहे. 

आपल्याला एक गोष्ट माहिती असेल की काही जागा या विमान उड्डाण करण्यासाठी प्रतिबंधित असतात. त्यालाच आपण नो फ्लाईंग झोन म्हणतो. इथे आपण कोणत्याही गोष्टी उडवू शकत नसतो. पक्षी मात्र अशा ठिकाणी जातात. मात्र जगन्नाथ पुरी मंदिराच्या वर कोणत्याही प्रकारे पक्षी, विमान, हेलिकॉप्टर किंवा ड्रोन उडवले जात नाही. कदाचित पक्ष्यांना देखील इथे काय आहे हे माहीत आहे जे आपल्याला माहीत नाही. 

सुदर्शन चक्र

सुदर्शन चक्र हे नाव तुम्ही ऐकलेले असेलच कारण हे भगवान विष्णू यांचे शस्त्र आहे. सुदर्शन चक्र हे अधर्म विनाशासाठी आहे. जगन्नाथ मंदिराच्या कळसा जवला सुदर्शन चक्र आहे. तुम्ही हे सुदर्शन चक्र ज्या बाजूने बघायला तुम्हाला ते तुमच्या बाजूने असल्याचे दिसते. 

भगवान जगन्नाथ म्हणजे ज्यांच्या नावातच जगाचा नाथ आहे त्यांच्या दरबारात अनेक श्रद्धाळू आपली श्रद्धा ठेवून येतात. मात्र इथे फ्कत हिंदू धर्माला दर्शनाची परवानगी आहे.  इतर धर्माच्या लोकांना बाहेरून दर्शन घेऊन पाठविले जाते. आपल्या जुन्या पंतप्रधान इंदिरा गांधी या जगन्नाथ पुरी येथे दर्शनासाठी गेल्या असता त्या फारसी आहेत त्यामुळे हिंदू नसल्याने दर्शन परवानगी मिळाली नाही. 

2005 साली थायलंड येथील प्रिन्सेस महा चक्री सिरींधोर्न या जगन्नाथ पुरी येथे आल्या होत्या. त्यांना सुद्धा इथे प्रवेश दिला गेला नव्हता कारण इथे परदेशी लोकांना प्रवेश नाही. त्यांच्यासाठी काही प्रयोजन केले गेले होते मात्र दर्शन बाहेरूनच करावे लागले. 

स्वित्झर्लंड मधील एका महिलेने या मंदिराला 1 करोड 78 लाख रुपये दान देखील दिले आहेत. मंदिराचे निर्माण 12 व्या शकतात झाले असावे. मंदिरासाठी दिलेल्या दान रक्कमेत ही सर्वात मोठी रक्कम आहे. त्या देखील हिंदू नाहीत त्यामुळे त्यांना सुद्धा दर्शन बाहेरूनच घ्यावे लागले. 

प्रत्येक वर्षी जगन्नाथ पुरी येथे जगन्नाथ भगवान यांची रथयात्रा निघते. हा एकूण 9 दिवसांचा उत्सव असतो. यात भगवान श्री जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बाल भद्र यांना गर्भगृहा मधून बाहेर कडून रथयात्रा घडविली जाते. असे मानले जाते की भगवान या काळात बाहेर येऊन प्रजेतील सुख दुःख जाणून घेत असतात. प्रत्येक वर्षी या यात्रेचा भाग बनण्यासाठी जगभरातून अनेक लोक येतात.

याशिवाय अनेक रहस्यमय घटना या मंदिराच्या बाबतीत आहेत. जसे की भगवान प्रत्येक वर्षी 15 दिवसांसाठी आजारी असतात आणि त्यामुळे तो काळ मंदिर बंद असते. खूप कमी लोकांना हे का होते याचे उत्तर माहिती असेल. 

जगन्नाथ पुरी हे मंदिर अपूर्ण अवस्थेत आहे. त्याला कोणी पूर्ण करत नाही मात्र येणाऱ्या अनेक भाविकांच्या लक्षात ही बाब येते. आपल्याला यातून एक शिकवण मिळते की जीवनात सर्व काही अपूर्ण असते. त्यामुळे मानवी शरीरात घेतलेला जन्म हा अपूर्ण आहे.  

आपल्या धर्माच्या अशा अनेक गोष्टी असतात ज्याविषयी आपल्याला माहिती नसते.  आपण डोळे बंद करून पाश्चात्य धर्माला आणि आचरणाला अनुसरतो आहे. आपण हे विसरतो आहे की आपण अशा धर्माशी नाळ जोडून आहोत ज्याने जगाला संस्कृती, परंपरा आणि संस्कार या महत्वाच्या गोष्टी दिल्या आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top