हरिद्वार मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Haridwar in Marathi (Part 1)

20230702_202557.jpg

हरिद्वार मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Haridwar in Marathi (Part 1)

हरिद्वार जाण्याचा प्लॅन करत असाल तर आपल्याला हा संपूर्ण लेख तुमच्या हरिद्वार ट्रीपला अधिकाधिक आनंददायी बनविण्यासाठी नक्कीच मदत करेल. हरिद्वार मध्ये आपल्याला हर की पुरी सोबत काय काय बघायला मिळणार आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आज आपण या लेखाच्या माध्यमातून हरिद्वार मधील जवळपास सर्व पर्यटन स्थळांविषयी माहिती देणार आहोत. यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणाला भेट देण्यासाठी जी काही आवश्यक माहिती आहे जसे की तुम्हाला हरिद्वारला भेट देण्यासाठी कधी यायला हवे, हरिद्वारला कसे पोहोचू शकतात, गंगा आरती ची वेळ काय असते, मनसा देवी जाण्या विषयी संपूर्ण माहिती, प्रत्येक प्रयत्न स्थळाचा वेळ आणि त्याची माहिती  देण्याचा देखील आमचा प्रयत्न असेल.

आमच्या यादीत दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी काही ठिकाणे असे देखील असतील जिथे तुम्ही कधी नक्कीच गेलेला नसाल. तुम्हाला तिथे एकदा नक्कीच गेले पाहिजे. 

गंगोत्री मध्ये गोमुखातून उगम झाल्यानंतर डोंगरांमध्ये असलेली गंगा नदी सर्वात आधी हरिद्वारला येते. देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात असलेले भाविक गंगा नदीत स्नान करण्यासाठी इथे येतात. 

हरिद्वारला कसे पोहोचाल? How to reach Haridwar?

बस – तुम्ही जर उत्तर भारतातून प्रवासाला सुरुवात करत असला तर तुम्हाला उत्तर भारतातील प्रत्येक शहरातून हरिद्वारला जाणाऱ्या बस मिळतील. दिल्लीवरून हरिद्वार हे अंतर 150 किलोमिटर इतके आहे. 

रेल्वे – हरिद्वार हे मोठे नगर असल्याने इथे तुम्हाला संपूर्ण भारतातून सरळ हरिद्वार साठी रेल्वे गाडी मिळेल. 

हरिद्वार मध्ये रेल्वेस्थानक आणि बस स्टँड हे समोरासमोर आहेत. इथून तुम्हाला सहज बाहेर आल्यावर रिक्षा, ऑटो किंवा ई रिक्षा मिळतील. तुम्हाला हरिद्वार रेल्वेस्टेशन ते हर की पोडी जायचे असेल तर त्यासाठी हे रिक्षावाले 20 रुपये भाडे घेतात. 

विमान – तुम्हाला हरिद्वारला जवळ विमानतळ हे देहरादून आहे. हे शहर हरिद्वार पासून 40 किलोमिटर अंतरावर आहे. तिथून तुम्हाला टॅक्सी मिळेल आणि त्यामध्ये बसून तुम्ही 1 तासात हरिद्वारला पोहोचू शकतात. 

स्वतःची गाडी – हरिद्वारमध्ये भरपूर वेळा ट्रॅफिक जाम होते. आठवडी सुट्ट्यांच्या काळात तर इथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होते. तुम्हाला जर हरिद्वार मध्ये ट्रॅफिक जॅम मध्ये अडकायचे नसेल तर प्रयत्न करा की सकाळी 9 च्या आधी इथे पोहोचाल. किंवा आणखी एक पर्याय म्हणजे रात्री 9 नंतर या कारण मधील काळात इथे गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे सकाळी 9 ते रात्री 9 वाहतूक कोंडीची समस्या जाणवते. 

हरिद्वार मध्ये राहण्याची व्यवस्था कोठे होईल? Where to Stay in Haridwar?

हरिद्वार मध्ये अशा अनेक धर्मशाळा राहण्यासाठी उपलब्ध आहेत. यातील काही धर्मशाळा मध्ये तर तुम्ही मोफत राहू देखील शकतात. याशिवाय हरिद्वार मध्ये हॉटेल्स चे देखील खूप पर्याय आहेत. हॉटेल रूम्स साठी भाडे हे 600 रुपये प्रति दिवस पासून सुरू होते. हॉटेल मध्ये अशा देखील रूम्स मिळतात जिथे फॅमिली साठी एका खोलीत 6-8 लोक राहू शकतात. 

आमचा सल्ला हा असेल की रेल्वे रोड वर हॉटेल घ्या. इथून तुम्हाला स्टेशन बाहेर लगेच हॉटेल दिसायला सुरुवात होईल. याचा फायदा हा असेल की या ठिकाण पासून तुम्हाला कुठेही जाण्यासाठी रिक्षा सहज मिळतात. 

हरिद्वार मध्ये भेट देण्यासाठी ठिकाणे – Places to Visit in Haridwar

  1. हर की पौडी आणि गंगा आरती (Har ki Pauri and Ganga Aarati)

पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही हरिद्वारला पोहोचाल तेव्हा हर की पौडी येथे जाऊन नक्कीच गंगा स्नान करून घ्या. तुम्ही रेल्वे रोडला हॉटेल घेतले असेल तर तुम्हाला तेथून नक्कीच हर की पौडी इथे जाण्यासाठी ऑटो रिक्षा मिळेल. तुम्हाला काही अंतर हे पायी चालत जावे लागेल. घाट दिसल्यानंतर तुम्हाला अनेक लोक गंगा नदीमध्ये स्नान करत असताना दिसते परंतु स्नान करण्यासाठी हर कि पौडी इथेच जावे.

हर की पौडी येथे स्नान करण्यासाठी का जावे, तर हे ठिकाण स्नान करण्यासाठी सुरक्षित आहे आणि या ठिकाणी स्नान केल्यानंतर पवित्र झाल्याचे मानले जाते. घाटावर पायऱ्यांसोबत प्रत्येक ठिकाणी साखळी लटकवलेली आहे. साखळीच्या मदतीने तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवत स्नान करू शकता.

घाटावर आल्यानंतर तुम्हाला टोकण देऊन चप्पल काढून ठेवावी लागेल. याच घाटावर गंगा आरती साठी मंदिरे आहेत. इतरही ठिकाणी घाट आहेत मात्र सर्वाधिक महत्व हे हर की पौडी ला आहे. 

जर तुम्ही एक वेळा देखील गंगा आरती अनुभवली नसेल तर एकदा तरी तुम्हाला हा अनुभव घ्यावाच लागेल. तुम्हाला खूप जास्त आनंददायी आणि समाधानी असल्याचे वाटेल. लोक खूप लांबून गंगा आरती मध्ये सहभागी होण्यासाठी येतात. आरती मध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते कारण हरिद्वार मध्ये फिरण्यासाठी आलेले सर्व भाविक गंगा आरतीसाठी एकत्र येतात. 

गंगा आरतीची वेळ ही रात्री 6 वाजता आहे. तुम्हाला जर गंगा आरती मध्ये सहभागी व्हायचे असेल तर तुम्हाला इथे थोड लवकर यावं लागेल. तुम्ही इथे 3 वाजण्याच्या सुमारास येऊन स्नान करून 5 वाजेच्या आसपास एक चांगली जागा बघून बसू शकतात. इथून तुम्हाला गंगा आरतीचा आनंद घेता येईल. गंगा आरतीचे चांगले दृश्य अनुभवायचे असेल तर गंगा आरतीसाठी बनलेल्या हर की पौडी घाटाच्या विरुद्ध बाजूला असलेल्या घंटा घर असलेल्या घाटावर जागा पकडावी. 

परिसरात रोषणाई देखील केलेली आहे. आरती नंतर देखील काही भाविक स्नान करतात. बाजूलाच तुम्हाला काही हॉटेल्स देखील मिळतील. तिथे जाऊन तुम्ही जेवण देखील करू शकतात. रात्री साधारणतः 11-12 पर्यंत इथे थांबा तुम्हाला गंगा नदीचा आवाज आणि शीतलता अनुभवायला मिळेल.

  1. मां मनसा देवी मंदिर (Mansa Devi Temple)

अनेक लोक हे हर की पौडी आणि गंगा आरती अनुभवून घरी परततात मात्र मां मनसा देवी मंदिराला तुम्ही नक्कीच भेट दिली पाहिजे. शिवालिक पर्वतरांगेत असलेल्या बिरवा पर्वतावर हे मंदिर आहे. इथे जाण्यासाठी 2-3 मार्ग आहेत. 

मनसा देवी मंदिराला जाण्यासाठी marg-

रोप वे – तुम्हाला रोप वे च्या मदतीने मंदिरात जाता येते.

पायी – पायी जाण्या साठी पायऱ्यांचा मार्ग आहे. यासाठी तुम्हाला 780 पायऱ्या चढून मंदिरात जावे लागेल. 

रस्ता – स्कूटी आणि बाईकच्या माध्यमातून तुम्ही या मार्गाने जाऊ शकतो. 

तुम्हाला मंदिरात जाण्यासाठी हॉटेल वरून किंवा गंगा आरती ठिकाणावरून ऑटो मिळतील. मनसा देवी मंदिराला भेट देण्याची वेळ ही सकाळी 5 ते सायंकाळी 7 पर्यंत आहे. रोप वे साठी एका व्यक्तीचे येण्याजण्याचे चार्ज हे १३० रुपये आहेत. तुम्हाला एकच ठिकाणी चंडी देवी मंदिर आणि मनसा देवी मंदिरासाठी तिकीट मिळतील. गर्दी पासून वाचायचे असेल तर सकाळी 5 ते 7 या दरम्यान इथे पोहोचले पाहिजे.

वर पोहोचल्यानंतर तुम्हाला चप्पल किंवा बुट काढून ठेवावे लागतील. मंदिर परिसरात काहाई दुकाने आहेत जिथे तुम्ही खरेदी करू शकतात. मंदिरात देण्यासाठी प्रसाद आणि स्वतःसाठी देखील जेवणाची सोय आहे. मंदिरात कॅमेरा किंवा फोटोग्राफी साठी बंदी आहे. 

मंदिरात दर्शन झाल्यानंतर तुम्ही पर्वताच्या दुसऱ्या भागावर जाऊन गंगा नदीच्या पत्राचे दर्शन घेऊ शकतात. पायी येण्याच्या मार्गावर काही पायऱ्या तुम्हाला उतरून या ठिकाणी जाता येईल. इथे काही सुरक्षा रक्षक कठडे बसविलेले नसल्याने स्वतः सुरक्षिततेची काळजी घ्यावी. 

पुढील लेखात आपण हरिद्वार मधील इतर काही पर्यटन आणि धार्मिक स्थळांविषयी जाणून घेऊयात. 

हरिद्वार मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Haridwar in Marathi (Part 2)

0 Replies to “हरिद्वार मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Haridwar in Marathi (Part 1)”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top