चतुर्शृंगी मंदिर पुणे विषयी माहिती || Information about Chaturshrungi Temple Pune

20231002_085514.jpg

पुण्यातील एस बी रोड ने जेव्हा आपण प्रवास करत असतो तेव्हा चतुर्श्रुंगी मंदिराच्या कमानीकडे आपले नक्कीच लक्ष जाते. पुण्याच्या अगदी वायव्यकडे असलेल्या या मंदिराचा इतिहास आणि चतुर्श्रुंगी देवी विषयी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत.

चतुर्श्रुंगी देवीचा प्रगट होण्यामागील इतिहास – History behind the Chaturshrungi Devi Statue

पेशवे काळात पेशव्यांच्या अकत्यारीत एक सावकार होते त्यांचे नाव दुर्लभ शेठ होय. पेशव्यांना मोहिमांसाठी कर्ज देण्याचे काम हे दुर्लभ शेठ करायचे. दुर्लभ शेठ यांची स्वतःची एक टांकसाळ होती. या टांकसाळी मधून दुर्लभ शेठ नाणी पाडण्याचं काम करायचं. त्याकाळी त्यांनी चतुर्श्रुंगी रुपया या नावाचा एक नाणं काढलं होतं. 

दुर्लभ शेठ हे वणीच्या सप्तशृंगी मातेचे निसिम भक्त होते. पेशव काळामध्ये ते जवळपास तीनशे किलोमीटरचा प्रवास करून देवीचे दर्शनासाठी जात. पुढे वृद्धापकाळ मध्ये इतका जास्त प्रवास करणे त्यांना शक्य होत नव्हते. 

देवीने दुर्लभ शेठ यांना एक दृष्टांत दिला ज्यामध्ये सांगितले की पुण्याच्या वायव्य जागेला एका ठिकाणी तू उत्खनन कर. उत्खननामध्ये तुला तांदळा स्वरूप माझी एक मूर्ती सापडेल त्याचीच तू पूजा कर. 

पुण्याच्या वायव्येला सध्या जिथे चतुर्श्रुंगी मंदिर आहे तिथे दुर्लभ शेठ यांनी उत्खनन केले असता त्यांना एका गुहेमध्ये देवीची तांदळा स्वरूप मूर्ती सापडली. तांदळा म्हणजे देवीचा फक्त मुखवटा होय.

तुम्ही जर वनी गडावरील सप्तशृंगी मातेची मूर्ती बघितली तर ती माता देखील एका बाजूला कललेली आहे अगदी त्याचप्रमाणे चतुर्श्रुंगी मातेची मूर्ती देखील एका बाजूला कललेली आहे. सर्वात मोठे साम्य सांगायचं झालं तर वनी गडावरील सप्तशृंगी मातेचा उत्सव चैत्र पौर्णिमेच्या दिवशी होतो आणि त्याच दिवशी पुण्यामध्ये चतुर्श्रुंगी मातेची मूर्ती प्रकट झाली होती. 1765 साली देवी या ठिकाणी मुर्तिरुपात प्रकट झालेली आहे. देवीची ही मूर्ती स्वयंभू आहे.

चतुर्श्रुंगी देवीचे नाव इतिहास – History Behind name Chaturshrungi Devi

जसं सप्तशृंगी मातेचे नाव सप्तशृंगी आहे, यामागील कारण म्हणजे सप्त म्हणजे सात आणि शृंग म्हणजे ज्या डोंगरावर ती देवी वसलेली आहे. वनी मधील सप्तशृंगी देवी ही सात शिखरांच्या मध्ये बसलेले आहे. अगदी त्याचप्रमाणे चतुर्श्रुंगी ही चार डोंगरांच्या म्हणजे चार शिखरांच्या मध्ये बसलेली आहे. पुण्यातील चतुर्श्रुंगी देवीच्या मंदिराच्या जागेची हवेतून फोटोग्राफी केली असता तुम्हाला लक्षात येईल की मंदिराच्या बाजूला चार शिखर आहेत.

चतुर्श्रुंगी मंदिर नियमित दिनक्रम – Daily Routine at Chaturshrungi Temple Pune

सकाळी साडेसहा वाजता पुण्यातील चतुर्श्रुंगी मंदिर उघडले जाते. साडेसात ते आठ या काळामध्ये देवीची शोडशोपचार पद्धतीने पूजा केली जाते. त्यानंतर पंचोपचार पूजा केली जाते. पुढे देवीचा अभिषेक सुरू होतो देवीचा अभिषेक सुरू होत असताना आधी अथर्वशीर्ष म्हणजेच गणपतीचा देखील अभिषेक केला जातो. पुरुषसूक्त, स्त्री सूक्त आणि नंतर रुद्राचा अभिषेक केला जातो. 

हे सर्व झाल्यानंतर देवीला 9 वाजेच्या दरम्यान साडी नेसविली जाते. दररोज देवीला नवीन सहावार साडी नेसवली जाते. देवीचे सगळे दागिने दिवस ठरल्याप्रमाणे घातले जातात. नंतर देवीला फुलांनी सजविले जाते. 

सप्तशृंगी मातेला वर्षातून दोन नवरात्र साजरे केले जातात एक चैत्र पौर्णिमेचा नवरात्र अनेक अश्विनी पौर्णिमेचे नवरात्र. चतुर्श्रुंगी मातेला फक्त अश्विनी पौर्णिमेचा नवरात्र साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी देवीची मोठी पालखी निघते. पौष पौर्णिमेला म्हणजे जानेवारीमध्ये शाकंभरी देवीचं नवरात्र देखील चतुर्श्रुंगी मंदिरात साजरा केला जातो. 

दुपारच्या वेळी देवीला पुजाऱ्याच्या घरातून नैवेद्य येतो. रात्री 8 वाजता पुन्हा देवीची आरती केली जाते. त्याच्या आधी संध्याकाळची पंचोपचार पूजा केली जाते. 

चतुर्श्रुंगी मंदिरातील चांदीच्या कमानी – Silver Kamani in Chaturshrungi Temple Pune

चतुर्श्रुंगी मंदिरात तुम्ही जेव्हा प्रवेश कराल तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांदीचे कमानी आहेत. गाभाऱ्यामध्ये तुम्हाला दोन चांदीच्या कमानी दिसतील त्याच्या बाहेर एक आणि अगदी बाहेरच्या बाजूला एक, सभामंडपात 2 अशा सहा कमानी आहेत. या सर्व सहा कमानी चांदीच्या आहेत. या कमानी जवळपास 500 किलो चांदि पासून बनविलेल्या आहेत. 

चतुर्श्रुंगी मंदिरातील पुजारी – Pujari at Chaturshrungi Temple Pune

अंगळ घराण्यातील त्यांचे 5 वें वंशज आज देवीची सेवा करत आहेत. दुर्लभ शेठ यांनी दस्तगीर गोसावी यांच्याकडे हे काम दिले होते. दस्तगीर गोसावी यांनी मग हे काम अंगळ घराण्याकडे दिले. 

मागील 150 वर्षांहून अधिक काळापासून अंगळ घराणे देवीची सेवा करत आहे. 

चतुर्श्रुंगी मंदिरात साजरे केले जाणारे सण – Festivals Celebrated at Chaturshrungi Temple Pune

चतुर्श्रुंगी मंदिरात आश्विन पंचमी ते दसरा इथपर्यंत मोठा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. यादरम्यान भाविकांसाठी मोफत प्रसाद देखील दिला जातो. 

दसऱ्याला देवीची मिरवणूक निघते. त्यामध्ये देवीची मिरवणूक ही मंदिरातून खाली येते. पालखीवर पुष्वृष्ठी केली जाते. देवीची ढोल ताशांच्या गजरात आणि वाघ्या मुरळी समवेत मिवणुक अगदी पारंपरिक पद्धतीने निघते. 

देवीची चैत्र पौर्णिमेला महापूजा केली जाते. कारण हा दिवस देवीचा प्रकट दीन आहे. गुढी पाडवा या दिवशी देखील देवीची पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते. मोठ्या सणांसाठी देवीची आभूषणे वेगवेगळी आहेत. 

दिवाळीला पाडव्याच्या दिवशी देखील प्रामुख्याने महापूजा केली जाते.

चतुर्श्रुंगी मंदिराचे बांधकाम – Architecture of Chaturshrungi Temple Pune 

साधारणतः १२५ वर्षांपूर्वीच हे सर्व बांधकाम सध्या आपल्याला बघायला मिळतं. यामध्ये नव्याने दुरुस्ती आणि काही पर्यटन दृष्टीने बदल देखील केले जात आहे. म्हणजेच मंदिर जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू आहे. 

सध्याच्या सभामंडपाचे काम सुरू असून त्याचा आकार वाढविला जातो आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top