श्री साई बाबा मंदिर शिर्डी || Sai Baba Temple Shirdi Information in Marathi

20231002_085303.jpg

साई बाबा मंदिर हे महाराष्ट्रातील शिर्डी या शहरात स्थीत आहे. शिर्डी हे अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातील एक शहर आहे. जे अहमदनगर पासून ८३ कि.मी. अंतरावर वसले आहे. इ. स. १९ व्या शतकाच्या उत्तार्धात साई बाबांच्या वास्तव्यामुळे शिर्डी नावा रूपास आले. साई बाबांच्या नंतर भक्तांनी तेथे उभारलेल्या साईबाबा मंदिरामुळे धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले. आज महाराष्ट्रतील शिर्डी ला सर्वच लोक ओळखतात. शिर्डीला साईनगर म्हणून पण ओळखतात. शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर(संस्थानांपैकी) एक आहे.

साईबाबांचे वास्तव्य आणि उत्तरकालीन मंदिर – Saibaba life in Shirdi and Saibaba Temple in Shirdi

साईबाबांचा जन्म २८ सप्टेंबर १८३६ रोजी झाला. पण तो कुठे आणि केव्हा झाला याबाबत अजून ही वाद आहेत.बाबा एका ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले आणि त्यानंतर त्यांना एका सूफी व्यक्तीने दत्तक घेतले.

असे म्हणले जाते वयाच्या १६ व्यां साईबाबा हे शिर्डीत आले. साईबाबा लोकांना प्रथम दिसले तेव्हा ते कडूलिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. तेव्हा पासून ते नित्यनेमाने रोज पाच घरी भीक्षा मागत.तिथे हे एका पडक्या मशिदीत राहत असत. जिथे ते सूफी पद्धतीनुसार धूनी घेत असत.त्यांनी मशिदला व्दारकामाईत असे नाव दिले(जे एक हिंदू नाव होते) .श्री साईबाबांनी ६० वर्ष त्या मशिदीत राहिले.बाबा हे अगदी सामान्य माणसा सारखे राहत. त्यांच्या फाकिरी पेहरावा मुळे लोक त्यांना मुस्लिम म्हणत, पण बाबा सर्व धर्मांना समान मान देत होते.अशी मान्यता आहे की बाबांना हिंदू धर्माचंही द्यान होत. गीता, ध्ज्ञानेश्र्वरी च पण त्यांना द्यांन होत.म्हणून आजही त्यांच्या दर्शनासाठी सर्व लोक येतात.

बाबांकडे अपारर्शक्ती होती अशी मान्यता आहे पण त्यांनी त्याचा उपयोग कधीचं स्वतः च्या प्रसिद्धी साठी केला नाही. उलट ते लोकांची मदत करत,लोकांना द्यांन देण्याचा प्रयत्न केला.आणि रोज भिक्षा मागुन आपला उदरनिर्वाह करत . बाबांनी गरीब, दीन-दुबळ्या लोकांची सेवा करत ,अनेकांना चांगल्या जीवनाची दिशा दाखवत आपल जीवन व्यतीत केल.बाबांचे भक्त हे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही होते कारण बाबांनी कधी धर्म भेद केला नाही. बाबांनी सर्वांना समान वागणूक दिली.गुरुवार हा बाबांचा आवडता वार होता.

ज्ञान हे कर्मकांड आणि प्रथा यातून नाही तर अनेकांची सेवा करून, प्राणिमात्रांवर प्रेम करून येते अशी बाबांची शिकवण होती.त्यांनी कथा, बोधकथा मधून आपली शिकवण पसरवली.बाबांचा विश्वास होता की इतरांची सेवा करणे हा ईश्वराची सेवा करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. निःस्वार्थ सेवा करणे आणि इतरांची मदत करणे यावर बाबांचा जोर होता. बाबा सबका मालिक एक हे वाक्य नेहमी म्हणत. बाबांचा विश्वास होता की सर्व धर्म हे एकाच उर्जेकडे नेणारे वेगवेगळे मार्ग आहेत.त्यामुळे त्यांनी कधीचं धर्मानं मध्ये भेदभाव केला नाही. बाबांनी श्रद्धा आणि सबुरी चा मंत्र जगाला दिला.

अशीच लोकांची सेवा करत , प्राणिमातत्रांवर प्रेम करत आणि जगाला चांगली प्रेम, करुणा, निःस्वार्थ सेवा यांची शिकवण देत बाबांनी आपल सर्व आयुष्य व्यतीत केल. आणि मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी १५ ऑक्टोबर, ई.स. १९१८ रोजी बाबांनी समाधी घेतली, जगाला निरोप दिला .बाबांच्या समाधीनंतर त्यांच्या भक्तांनी शिर्डीत मंदिर उभारले. या मंदिरामुळे शिर्डीस धार्मिक क्षेत्राचे महत्त्व आले.आणि शिर्डी हे एक छोट शहर सर्वांना ज्ञात झालं. आज आपल्याला शिर्डी म्हणलं की लगेच साईबाबा आठवतात.

शिर्डीच्या मंदिराची श्रीमंती – Richness of Saibaba Temple Shirdi

आयुष्य एकदम साध्या आणि फकीर म्हणून जगलेल्या बाबांच्या संस्थानात दरवर्षी कोटींच दान भाविकांकडून दिल्या जात. सस्थांनची झोळी जगभरातील लाखो भाविकांच्या बाबांप्रती असलेल्या प्रेमामुळे भरलेली आहे.यातून भक्तांच बाबांवर असलेल प्रेमच तर दिसत. बाबांच्या नावाने सुरू करण्यात आलेले हे संस्थान करोडपती बनले आहे. साई बाबांच्या मूर्तीवर दीड कोटींचा हिरेजडित मुकुट आहे आणि तसेच कोट्यावधींची आभूषणे मूर्तीवर घालण्यात येतात.

शिर्डी संस्थानची स्थापना झाल्यावर २८ मे १९२३ रोजी झाली. तेव्हा संस्थानने काही तांब्या – पितलेची भांडी आणि चांदीच्या दोन ताटल्या मोडून बाबांच्या आरतीसाठी तबक बनवले होते. पण आज बाबांचे सिंहासन व मंदिराच्या शिखरासह ,रोजच्या पूजेतील  जवळपास सर्वच वस्तू सोन्या – चांदीच्या आहेत. 

शिर्डी साईबाबा मंदिराचे बांधकाम आणि स्थापत्य – Construction and Architecture of Saibaba Temple Shirdi

 शिर्डी साईबाबा मंदिर हे हिंदू स्तपत्यकलेचे एक उत्तम उदाहरण आहे. मंदिरात एक प्रशस्त सभा मंडप आहे. आणि आता गर्भगृहात साईंची मुर्ती आहे. मंदिराच सर्व काम हे पांढऱ्या संगमरवरी त केले आहे.समोर एक चांदीचा दरवाचा आहे.

मंदिराच्या बाजूला बाबांशी संबंधित अनेक ठिकाणे आहेत.त्यात बाबांनी जेथे समाधी घेतली ते समाधी मंदिर आहे. ज्याचं बांधकाम सुंदर आणि पांढऱ्या संगमरवरीत झालं आहे. समाधीच्या मागे बाबांची मुर्ती आहे ज्यात बाबा सिंहासनवर बसलेले दिसतात.ही मूर्ती इटालियन संगमरवरी ने बनलेली आहे.मुर्तीला बघून बाबा आपल्याशी बोलतील की काय असा भास होतो.हा एक उत्तम नमुना आहे.

साईबाबा मंदिर शिर्डी मंदिर परिसर – Around Saibaba Shirdi Temple

गुरुस्थान: Gurusthan

साईबाबा वयाच्या १६ व्या वर्षी जेव्हा शिर्डीत आले तेव्हा तेव्हा ते प्रथम कडूलिंबाच्या झाडाखाली बसलेले लोकांना दिसले होतें.याच ठिकाणास आज गुरुस्थान म्हणून ओळखल्या जात.या गुरुस्थान मंदिरात एक छोटंसं मंदिर आहे ज्यात बाबांची एक तसबीर ठेवण्यात आलेली आहे.एरवी कडुलिंबाची पाने कडू लागतात , पण या झाडाची पाने गोड लागतात, केवढी ही बाबांची किमया.भाविक ह्या झाडाचं श्रद्धेने दर्शन घेतात.

द्वारकामाई: Dwarkamai

द्वारकामाई हे ते ठिकाणं आहे जेथे बाबा शेवटपर्यंत राहत होतें.जेथे बाबा भक्तना भेटायचे ,त्यांच्या समस्या सोडायचे.ही मशीद मंदिराच्या उजव्या बाजूला आहे.

चावडी: Chawadi

मुख्य समाधी मंदिराच्या पूर्वेस चावडी हे ठिकाण आहे. बाबा येथे अधूनमधून येऊन विश्रांती घेत.तेथे इतर कुणासही येण्याची अनुद्या नसे.

लेंडीबाग: LendiBag

मंदिराच्या पच्श्चीमेला एक सुंदर बाग आहे.जिला लेंदिबाग असे म्हणतात.बाबा येथे रोज तीन वेळेस तरी येत.बागेत आसणाऱ्या पिंपलच्या वृक्षाखाली येऊन बसत.

शिर्डी साईबाबा मंदिर दळणवळणाची सोय – How to reach Saibaba Temple Shirdi

भाविक आपआपल्या सोयी नुसार रस्त्याने, रेल्वेने किंवा

हवाई अशा तिन्ही मार्गाने येऊ शकता.येथील जवळील रेल्वे स्टेशन मंदिरापासून १० की.मी. अंतरावर आहे आणि त्याला साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशन म्हणून ओळखतात.हे स्टेशन सर्व प्रमुख शहरांना जोडते.त्यामुळे काळजीच काही कारण नाही.भाविकांची तारांबळ होणार नाही.

हवाई मार्गाने जायचं असेल तर मंदिरापासून १५ की.मी. अंतरावर शिर्डी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. जे प्रमुख शहरांना जोडते. हे आताच २०१७ मध्ये उघडण्यात आले.

पुणे, मुंबई यासारख्या सर्व प्रमुख शहरांमधून शिर्डी ल यायला बसेस उपलब्ध आहेत.

भक्तांच्या खाण्यापिण्याची सोय – Food and Stay in Saibaba Temple Shirdi

बाबांच्या मंदिरापासून जवळच एका भव्य प्रसदालयात भाविक-भक्तांच्या खाण्यापिण्याची सोय संस्थान ने केली आहे.त्याला साईप्रसादालय असे म्हणतात.तेथे हजारो भाविक एकाच वेळी बसून प्रसादाचा अस्वाद घेऊ शकता आणि हे ही एकदम मोफत.दूर-दुरुन येणाऱ्या भाविकांसाठी ती एक उत्तम सोय आहे.रोज लाखो भाविक या प्रसादाचा अस्वाद घेतात.येथे सौऊर्जेचा वापर करून जेवण बनवल्या जात.

बाबांचं आवडत फूल गुलाब, त्यातही गुलाब-पासून बनवलेली अगरबत्ती बाबांना खूप आवडत. शिर्डीत मंदिराच्या बाहेर असलेल्या दुकानांमध्ये बाबांच्या मूर्तीवर चढवलेल्या गुलाबाच्या हारानपासून बनवलेल्या अगरबत्ती असतात,भाविक लोक ते आनंदाने विकत घेतात आणि आपल्या घरी लावतात.त्यातून येणारा सुगंध एक वेगळाच मनाला शांती देणारा असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top