तिरुपती बालाजी मंदिर माहिती मराठी – About Tirupati Balaji temple
तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती जिल्ह्यात स्थित आहे. तिरुपती जिल्ह्यात तिरुमला हे सुंदर, पर्वतांची वेढलेले एक शहर आहे जिथे तिरुपती मंदिर आहे.
तिरुपती बालाजी मंदिर हे मूलतः श्री व्यंकटेश्वर स्वामी यांचे मंदिर आहे आणि ह्या मंदिरास प्रामुख्याने श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर असे म्हणतात. यासोबतच या मंदिरास तिरुमला मंदिर किंवा तिरुपती मंदिर असेही म्हणतात. श्री व्यंकटेश्वराला बालाजी, गोविंदा किंवा श्रीनिवास या मानवांनी देखील ओळखले जाते.
तिरुपती बालाजीला भुलोकावरील वैंकुठ मानले जाते. मानले जाते भगवान विष्णूंनी त्यांच्या भक्तांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी आणि मोक्षाकडे नेण्यासाठी धरतीवर इथे अवतार घेतला होता. म्हटले की देवी लक्ष्मी या भगवान विष्णू यांच्या नाराज होऊन पृथ्वी गर आल्या होत्या.
तिरुपती बालाजी मंदिराचे बांधकाम हे इ. स. नंतर 300 वर्षांपासून सुरू झाले. वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी आणि सम्राटांनी या मंदिराची वेळोवेळी बांधणी केली आहे पण 18 व्य शतकात मराठा सेनापती राघोजी भोसले यांनी मंदिराची जबाबदारी घेण्यासाठी आणि कामकाज बघण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानाची स्थापना केली. आज या संस्थांकडे अनेक मंदिरांची व्यवस्थापन आणि देखभालीची जबाबदारी आहे.
मंदिरातील देवता – God in Tirupati Balaji Temple
वेंकटेश्वर हे मंदिरातील प्रमुख देवता आहेत. वेंकटेश्वर मूर्ती ही स्वयंभू आहे अर्थात स्वतः प्रकट झाली आहे असे मानले जाते. वेंकटेश्वरा हे पाच देवता मिळून बनले आहे. त्यांना पंच बेरामुलू असे म्हटले जाते. हे पंच बेरामुलू ध्रुव बेरम (मूलावर), कौतुक बेरम, स्नापन बेरम, उत्सव बेरम, बाली बेरम आहेत आणि हे सर्व देवता आनंद निलयम म्हणजेच गर्भगृहात ठेवले आहेत
मूलविराट किंवा ध्रुव बेरम- मुळविरत किंवा ध्रुव बेरम ही व्यंकटेश्वराची मुख्य मूर्ती आहे. यास मुळविराट किंवा मूळ अवतार म्हंटले जाते. हा अवतार गर्भगृहाच्या मध्यभागी, आनंद निलयम विमानाखाली स्तिथ आहे. व्यंकटेश्वराचा मूलविराट कमळाच्या तळावर उभा आहे. त्याला चार हात ह्यापैकी दोन हात शंख आणि चक्र, एक वरद मुद्रेत आणि दुसरा कटि मुद्रामध्ये आहे. मूलविराट हि मंदिरातील ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत मानली जाते. मूर्तीला हिराचा मुकुटने आणि अनेक दागिन्यांनी सजवलेले आहे.
व्यंकटेश्वराची पत्नी अर्थात लक्ष्मी माता या मूलविराटच्या छातीवर व्यूहा लक्ष्मीच्या रूपात व्यास करते.
भोगा श्रीनिवास किंवा कौतुक बेरम – मूळविराटच्या डाव्या पायाजवळ स्थित असलेली एक फूट उंच चांदीची मूर्ती ही भोग श्रीनिवास यांची आहे. ही मूर्ती 614 या वर्षात राणी समवाई यांनी ही मूर्ती उत्स्वावसाठी समर्पित केली होती. कौतुक बेरम हे मूळविराट यांना संबंध क्रूच याने जोडले आहे. मुख्य देवतेच्या वतीने भोग श्रीनिवास हे सर्व सेवा-सुख उपभोगतात. म्हणूनच यांना भोग श्रीनिवास म्हंटले जाते.
उग्र श्रीनिवास किंवा स्नापन बेरम – नावाप्रमाणेच ही देवता व्यंकटेश्वराचे उग्र रूप आहे. उग्र श्रीनिवास हे वर्षभर गर्भगृहातच राहतात आणि वर्षातून एकदा कैशिका द्वादशीला सूर्योदयापूर्वी मिरवणुकीमध्ये त्यांना बाहेर आणले जाते. मूलविराटच्या वतीने उग्र प्रत्येक दिनी अभिषेक प्राप्त होतो म्हणून त्याला स्नापन बेरम संबोधले जाते.
मलयप्पा स्वामी किंवा उत्सव बेरम – मलयप्पा स्वामी हे मिरवणुकीतील प्रमुख देवता आहेत आणि ते सदैव त्यांच्या दोन पत्नी श्रीदेवी आणि भुडेवी यांच्या समवेत विराजमान असतात. उत्सव बेरम यांना प्रत्येक उत्सवातील मिरवणुकीत दर्शनासाठी बाहेर आले जाते.
कोलुवू श्रीनिवास किंवा बाली बेरम- कोलुवू श्रीनिवास हे मंदिराच्या अर्थाचे अर्थात संपत्तीचे संरक्षक देवता आहेत. मंदिरातील सेवेत जे काही अर्पण, दान, मंदिराचा खर्च, उत्पन्न असे सर्व दुसऱ्या दिवशी सकाळी कोलुवू श्रीनिवास यांच्या चरणी अर्पण केले जाते.
मंदिरात या प्रमुख देवता सोबत इतर देवताही आहेत. मंदिरात राम, लक्षण, सीता, कृष्णा, रुक्मिणी, हनुमान, नरसिंह अश्या अनेक देवतांच्या मूर्ती आहेत.
तिरुपती बालाजी मंदिर स्थापत्य – Architecture of Tirupati Balaji Mandir
तिरुपती बालाजी मंदिर हे द्रविड स्थापत्य शैलीने बांधले गेले आहे. मंदिरात तीन मुख्य भाग आहेत – महाद्वार, प्रदक्षिणा आणि आनंद नीलयम किंवा गर्भगृह.
द्वारम् आणि प्रकारम् –
द्वारम हे मंदिरात प्रवेश करण्यासाठी असलेले प्रवेशद्वार आहेत. द्वारम् आणि प्रकारम् यांत तीन प्रवेशद्वार आणि 2 संरक्षक भिनितीचा समावेश आहे. महाद्वार, वेंदिवकिली आणि बांगारुवाकिली हे तीन प्रवेशद्वार आहेत तर महाप्रकारम् आणि संपंगी प्रकारम् हे दोन प्रकारम् समाविष्ट आहेत.
सर्वात प्रथम द्वार महाद्वार आहे. यास पदिकावली किंवा महाद्वारम् असेही म्हणतात. मंदिराच्या बाहेर महापराक्रम ही प्रचंड सरणक्षक भिंत आहे. या भिंतीतून प्रवेश करण्यासाठी महाद्वार आहे. या महद्वरावर 50 फूट पाच मजली गोपुरम म्हणजे मंदिराचा बुरुज बांधलेला आहे. गोपुरमाच्या शिखरावर सत कळस आहेत.
वेंदिवकिली हे दुसरे प्रवेशद्वार आहे. हे चांदीचे प्रवेशद्वार आहे आणि यास नदीमीपदिकावली असेही म्हणतात. संपंगी प्रकारम् ही दुसरी आतील सरंक्षक भिंत आहे. संपंगी प्रकारम् मधून प्रवेश करण्यासाठी वेंदिवकिली हे प्रवेशद्वार आये. वेंदिवकिली वर तीन मजली गोपुरम बांधला गेला आहे आणि त्याच्या शिखरावर सत कळस आहेत.
बांगारुवाकिली हे तिसरे प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वार गर्भगृहात प्रवेशासाठी आहे. हे सुवर्ण प्रवेशद्वार आहे. बांगारुवाकिलीच्या दोन्ही बाजूला जया-विजया या द्वारपालकांच्या उंच तांब्याच्या प्रतिमा आहेत. हे प्रवेशद्वार जड लाकडी असून यावर विष्णू अवताराचे सोन्याच्या सोन्याच्या गिल्ट प्लेट्सने चित्रण केले गेले आहे.
गर्भगृह किंवा आनंद नीलायम –
बालाजी मंदिरातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आनंद निलायम किंवा गर्भगृह. सुवर्ण प्रवेशद्वारातून गर्भगृहात प्रवेश केला जातो. हा भाग सोन्याचा मुलामा असलेला एक मोठा बुरुज आहे. गर्भगृहात मुख्य देवता श्री व्यंकटेश्वर स्वामी यांची मूर्ती स्थित आहे. ही मूर्ती 12 व्या शतकातील आहे. हि मूर्ती पूर्णपणे काळ्या दगडात असून 8 फूट उंच आहे. श्री व्यंकटेश्वर स्वामी यांना तिरुमला बालाजी, गोविंदा अश्या नावांनी देखील संबोधले जाते.
मुख्य मूर्तीच्या आजबजुला देखील अनेक मुर्त्या आहेत. मानले जाते की ह्या प्रत्येक मूर्तीचे तिथे असण्याचे विशेष कारण आहे. यात भोगास श्रीनिवास यांची चांदीची मूर्ती आहे. कोंडवू श्रीनिवास यांची मूर्ती मंदिराच्या विधि-विधानात समाविष्ट केली जाते.अग्र श्रीनिवास यांची मूर्ती आहे जे देवाचे क्रोधित स्वरूप मानले जाते. श्री मलयाप्पा स्वामी आणि त्यांच्या दोन बाजूंना दोन देवी, भुदेवी आणि श्रीदेवी यांच्या मूर्ती आहेत.
बांगरुवाकिली आणि गर्भगृह यांच्यामध्ये देखील आणखी दोन दरवाजे आहेत. मुख्य देवता म्हणजेच श्री वेंकटेश्वर आणि इतर मूर्तींना दागिन्यांनी सजवलेले आहे.
भाविकांना गर्भगृहात प्रवेश दिला जात नाही तर गर्भगृहाच्या बाहेरूनच दर्शन करण्याची परवानगी आहे.
आनंद निलय विमानम हे गर्भगृहात बांधलेले गोपूरम आहे. आनंद निलय विमानम तीन मजली त्याच्या शिखरावर एक कळस आहे. यावर सोनेरी फुलदाणी पसरलेली आहे आणि त्यावर गर्भगृहावर बांधलेले मुख्य गोपुरम आहे. हे तीन मजली गोपुरम आहे आणि गिल्ट कॉपर प्लेट्सने चे आच्छादन आहे.
आनंद निलय विमानम वर अनेक देवतांची चित्रे कोरली गेली आहेत. यावर व्यकांतेश्वरची मुख्य देवतेसारखी हुबेहूब प्रतिमा आहे. त्यांना विमान व्यकांतेश्र्वर म्हटले जाते.
स्वामी पूषकरिनी पिंड –
मंदिराच्या उत्तरेला स्वामी पुष्करिणी हा पवित्र पाण्याचा पिंड आहे. हा मंदिराचा लक्षणीय भाग आहे. हे तिरुपती मंदिराचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे हे 1.5 एकर मध्ये आहे. पिंडाच्या मध्यभागी एक सोनेरी चौथारा आहे ज्यात अनेक स्तंभ आहेत. 1468 मध्ये सलुवा राजा नरसिंह राय यांनी तो बांधला होता. अनेक भावी इथे दर्शना अगोदर पवित्र स्नान करून मंदिरात प्रवेश करतात.
प्रदक्षिणाम् –
प्रदक्षिणाम् हे मंदिरात किंवा देवतांच्या गर्भगृहाभोवती केलेल्या प्रदक्षिणा आहेत. तिरुपती बालाजी मंदिरात प्रदक्षिणाम् मध्ये दोन प्रदक्षिणा मार्ग येतात – संपंगीप्रदक्षिणाम् आणि विमानप्रदक्षिणाम.
पहिला महापराक्रम आणि संपंगीप्रक्रम यांच्यामधील भाग ही एक प्रदक्षिणा आहे आणि यास संपंगीप्रदक्षिणाम् म्हंटले जाते. या मार्गात अनेक मंडप, एक ध्वजस्तंभ, आणि प्रसाद वितरण क्षेत्र इत्यादी विभाग आहेत.
विमानप्रदक्षिणाम हा दुसरा प्रदक्षिणा मार्ग आहे आह. हे आनंद निलय विमानम यास प्रदक्षिणा करते. विमानप्रदक्षिणाम मार्गावर वरदराज आणि योग नरसिंह, पोटू अर्थात मुख्य स्वयंपाकघर, बंगारू बावी म्हणजे सोनेरी विहीर, एक अंकुरार्पण मंडप, एक यज्ञशाळा, उप-तीर्थस्थाने आहेत. यासोबतच रेकॉर्ड विभाग, एक हुंडी, आणि विश्वसेनाचे आसन देखील आहे.
बालाजी मंदिर दर्शन पास – Tirupati Balaji Mandir Darshan Pass
तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी तुम्हाला पासची गरज असते. हा पास मंदिरात मिळतो किंवा तुम्ही ऑनलाईन बुकिंग देखील करू शकता. दर्शन करण्यासाठी तुम्हाला 10 ते 12 तास देखील लागू शकतात. VIP पास असेल तर 3 ते 4 तासांत दर्शन मिळू शकते.
तिरुपती बालाजी जाण्याचा मार्ग – How to reach Tirupati balaji temple
तिरुपती बालाजी हे आंध्रप्रदेश मधील तिरुपती या ठिकाणी आहे. हे आंध्रप्रदेश एक मुख्य शहर असून जिल्ह्याचे ठिकाण आहे त्यामुळे येथे जाण्यासाठी सर्व प्रकारच्या साधनांची उपलब्धता आहे. तिरुपती मध्ये रेणुगुंता या 14किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि रेल्वे स्टेशन देखील आहे हे तिरुपती पर्यंत आहे.
तिरुपतीला जाण्यासाठी तूम्ही अगोदर तिरुपती रेल्वे स्टेशन पर्यंत रेल्वेने जाऊ शकता किंवा रेनुगुंता जंक्शन पर्यंत तुम्ही जाऊ शकता आणि तेथून पुढे तुम्ही तिरुपती पर्यंत बसणे प्रवास करून तिरुपतीला जाऊ शकता. विमानाने देखील तुम्ही जाऊ शकता, त्यासाठी तुम्ही रेनुंगुंता विमानतळावर विमनेने जाऊ शकता आणि तेथून पुढे 14 किमी अंतरावर तुमच्या आवडीच्या कोणत्याही साधनाने प्रवास करू शकता. तिरुपती शहरापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी बसने साधारण 80 ते 140 रुपये खर्च येऊ शकतो.
राहण्याची आणि खाण्याची सोय – Food and Stay near Tirupati balaji mandir
तिरुमला मध्ये गेल्यानंतर तुम्ही सीआरओ ऑफिस मध्ये जाऊ शकता. इथे रूम बुकिंग उपलब्ध असते. तेथे प्रत्येक व्यक्तीच्या अनुसार रूम मिळू शकतो. 50 रूपये ते 1000 रुपयांपर्यंत येथे रूम मिळू शकतात आणि प्रत्येक व्यक्तीची राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय ही तिरुपती बालाजीच्या अन्न प्रसाद केंद्रात होऊ शकते. हे केंद्र तिरुपती बालाजी ट्रस्ट कडून चालवले जाते. येथे भोजन निःशुल्क असून कोणीही येथे जेवणाचा आस्वाद घेऊ शकते. त्यामुळे राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय तिरुपती बालाजी मध्ये उपलब्ध आहे.