महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्चिमेत वसलेले एक सुंदर राज्य आहे. महाराष्ट्र राज्य हे आपल्या राज्याच्या सौंदर्यासाठी प्रसिद्धच आहे पण यासोबतच हे राज्य धार्मिक मंदिरासाठी देखील ओळखले जाते. महाराष्ट्र राज्यात अनेक पावन धार्मिक स्थळे आहेत आणि यासोबतच अनेक प्रसिद्ध मंदिरे देखील आहेत. यापैकी बरीच मंदिरे ही पर्यटन स्थळे म्हणून प्रसिध्द आहेत. आजच्या लेखात आपण अशाच काही प्रसिध्द मंदिरांविषयी माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरूवात करूया.
पळसनाथ मंदिर – Palasnath mandir
पळसनाथ मंदिर हे पुण्यापासून 120 किमी अंतरावर असलेल्या पळसदेव गावात आहे. हे गाव उजनी धरणाच्या काठी वसलेले आहे. हे मंदिर उजनी धरणाचा एका जलाशयात स्थित आहे. हे मंदिर निसर्गरम्य वातावरणात आहे. धरणाकडे जाण्यासाठी पक्का राष्ट्र आहे. आणि धरणाच्या कडेला मंदिराकडे जाण्यासाठी होड्या आहेत.
पळसनाथ मंदिर हे पाण्यात असल्याने बऱ्याचदा पाणी वाढल्यावर मंदिराचा बराचसा भाग पाण्याखाली असतो त्यामुळे दर्शनास जाताना पाण्याच्या स्तराचा विचार करून जर फायद्याचे ठरेल.
पळसनाथ मंदिरात शिव पार्वती आणि दोन विर्गळा ची मूर्ती आहे.
पळसनाथ मंदिरास उंच शिखर आहे. कलासाचा आकार गोलाकार आहे. पळसनाथ मंदिराला जोडून अजून एक मदिर आहे जे बली चे मंदिर आहे असे म्हटले जाते.
पळसनाथाच्या मंदिरास तीन मुखमंडप आहेत. मंदिराच्या आजूबाजूला शिळा आहेत. हे मंदिर ऐतिहासिक दृश्य खूप महत्त्वाचे मानले जाते.
वेरूळ भुलेश्वर मंदिर, पुणे – Verul Bhuleshwar Mandir , Pune
वेरूळ भुलेश्वर मंदिर हे पुण्याजवळील एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर शंभू महादेवाचे आहे. मदिरावर अप्रतिम शिल्पकाम आहे. हे भव्य मंदीर एका गडाच्या माथ्यावर आहे. ह्या गडाचे नाव 1634 मध्ये विजापूरच्या सरदारांनी बांधला होता. त्यामुळे या मंदिराच्या आजूबाजूला गडाचे अवशेष जसे की, विहिरी, कुंड, बुरुज, एक मोठा दरवाजा, इत्यादी बघायला मिळते. मंदिराजवळ गेल्यानंतर आपल्याला मदिराचे दगडातील भव्य बंधकम दिसते. ह्या मंदिराचा खालचं भाग दगडांचा तर वरचा भाग विटांचा बांधला गेला आहे. हे मंदिर 13 व्या शतकात बांधण्यात आले होते आणि मंदिराचे नंतरचे शिखर, भिंत याचे बांधकाम हे 18 व्या शतकात केले गेले आहे.
मदिराचा आतील भाग हा अतिशय सुंदर आहे. यातील भिनी, खांब सर्वकाही कोरीव आणि रेखीव अशा शिल्पाने नटलेले आहे. यांवर महाभारतातील चित्र कोरलेली आहेत. मंदिराच्या बाहेरील बजुवरील देखील कोरीव काम आहे ज्यात देव, अप्सरा यांच्या मुर्त्या कोरल्या आहेत. आतील सर्व भाग बघत राहावं एवढा सुंदर आहे. आतमध्ये मूळ मंदिर आणि नंदीमंडप आहे, जो एकत्रित आहे. मंदिरात गर्भगृह, अंतराळ असे भाग येतात. मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे आणि त्यावर पूजेसाठी मुखवटा आहे. गर्भृह आणि अंतराळ यांवर देखील अत्यंत रेखीव नक्षीकाम आहे. पाने – फुले, इत्यादीचे हे नक्षीकाम आहे.
मंदिरा शिवाय एक शिल्पपट आहे ज्यावर भ्रम, विष्णू आणि महेश यांच्यासोबत लंबोदरीची मूर्ती आहे जे दुर्मिळ आहे. लंबोदरी हे गणपतीचे स्त्रिरूप आहे. हे संपूर्ण मादिर म्हणजे कलेचा साक्षात्कार आहे. मंदिराच्या तटावरून आपल्याला दूरवरचा परिसर दिसतो. एक निसर्गरम्य देखावा आपल्याला येथून बघायला मिळतो.
कलेचा अद्वितीय वारसा असलेले ऐतिहासिक असे हे मंदिर पुण्यापासून अवघ्या 50 किमी अंतरावर आहे. येथे मंदिराच्या खालच्या भागात वाहन लावण्यास जागा आहे आणि वान भोजनासाठी देखील जागा आहेत. एक दिवसीय सहलीसाठी हे एक उत्तम स्थळ आहे. त्यामुळे निसर्ग आणि कला प्रेमींनी येथे आवर्जून एक भेट द्यावी.
संगमेश्वर मंदिर, पुणे – Sangameshwar Mandir Pune
पुण्यापासून अवघ्या 30 किमी अंतरावर असलेल्या सासवड गावात संगमेश्वर मंदिर आहे. मंदिराला दगडी तटबंदी आहे. कऱ्हा आणि भगवती (चंबळी) या नद्यांच्या संगमावर महादेवाचे हे सुंदर मंदिर पिशवीच्या काळात बांधले आहे असे म्हणतात. मदिरचे बांधकाम दगडी आहे. नदीच्या ताटातून मदिरत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या मंदिरात दीपमाळा, स्तंभ, घुमट, शिखर या सर्वांवर रेखीव कोरीव काम केले आहे. मंदिरातील आतील भाग हा सर्व दगडात आहे. मदिरात गणेशमूर्ती आणि हनुमान मूर्ती देखील आहे. मंदिरातील नांदी हा घोटीव दगडात साकारला आहे. दरवाजा, भिंती, यावरील नाजूक नक्षीकाम बघण्यासारखे आहे. नदीच्या तटावर वसलेले हे मंदिर मनाला प्रसन्न करते. यासोबतच इथला नदीचा घट, आजूबाजूचा सुंदर परिसर, मन तृप्त करून टाकते.
जण्या येण्यासाठी सोपे जावे म्हणून येथे जागोजागी सूचना फलक, दिवे लावण्यात आले आहे.
प्राचीन असे हे पेशवाई काळातील मंदिर डोळ्यांना तृप्त करते. मंदिराचे सौंदर्य बघून, परिसरातील शांतता अनुभवून अविलक्षणीय वाटते. पुण्यापासून अगदी थोड्या अंतरावर असलेल्या या मंदिराला तुम्ही आवर्जून भेट देऊ शकता.
गणपती पुळे मंदिर – Ganpati Pule Mandir
रत्नागिरीतील गणपती पुले हे मदीर सर्वांनाच ज्ञात आहे. पुण्यापासून 325 आणि मुंबईपासून 375 किमी अंतरावर गणपतीपुळे आहे. रस्त्याने जाताना समुद्र, झाडे यांचे निसर्गरम्य नजारे दिसतात.
गणपतीपुळे मंदिर समुद्र किनाऱ्यावर वसले आहे. हे एक प्रसिध्द ठिकाण असल्यामुळे इथे शक्यतो गर्दी असते. मुख्य दरवाजासमोर चप्पल काढण्यासाठी जागा असते आणि तेथून दर्शनासाठी रंग सुरू होते. सर्वात प्रथम मूषक राजांचे दर्शन होते. मंदिरात गणपतीची सुंदर मूर्ती आहे. खांबावर, भिंतीवर नक्षीकाम आहे. अष्टविनायकांच्या मूर्ती भिंतीवर कोरल्या आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूला वनराईने नटलेला डोंगर आहे. मदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रदक्षिणा मार्ग आहे. मादिराचे काम हे रेड अग्र या विशिष्ट दगडाचे आहे. हे मंदिर पहाटे 5 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते.
मदिराच्या समोर मोठा समुद्र किनारा आहे त्यामुळे इथे वॉटर स्पोर्ट्स आहेत. अनेक पर्यटक याचा आनंद घेतात. मादिराच्या जवळच जेवणासाठी हॉटेल्स आहेत.
आधीपासूनच पर्यटन स्थळ असलेले गणपतीपुळे हे मंदिर महाराष्ट्राचा एक सुंदर वारसा आहे. त्यामुळे येथे एक तरी भेट नक्की द्यावी.
अंबाबाई महालक्ष्मी मंदिर – कोल्हापूर – Ambabai Mahalakshmi Mandir Kolhapur
कोल्हापूर मध्ये पंचगंगा नदीच्या काठी स्थित असलेले महालक्ष्मी मंदिर हे पर्यटनाचे आणि भविंकाचे प्रसिध्द असे ठिकाण आहे. ह्या मंदिराची स्थापना सातव्या शतकात झाल्याचे मानले जाते आणि या मंदिरातील महालक्ष्मीची मूर्ती ही 7000 वर्षे पूर्वीची आहे असे म्हंटले जाते. हे देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ आहे. मंदिराचा आजूबाजूचा परिसर हा पूजेचे समान, फुलांच्या दुकानांत भरलेला आहे. मंदिराला 4 दिशांना 4 मुख्य दरवाजे आहेत. मंदिरात 4 मंडप आहेत. मुख्य मंडपाखली महालक्ष्मीची मूर्ती स्थित आहे. पश्चिम मंडपाखळी गणेशमूर्ती तर उत्तर आणि दक्षिण मनदापाखली महाकाली आणि सरस्वती देवी स्थित आहेत. महालक्ष्मी मातेची मूर्ती ही कल्या दगडात साकारली गेली आहे. ही मूर्ती 3 फूट आहे.
हे मंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा देखावा आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूंवर 108 योगिनिंच्या आणि देवी देवतांच्या मूर्ती कोरल्या गेल्या आहेत. हे स्थापत्य आणि मंदिर काळ्या दगडात साकारले गेले आहे. मंदिरातील मूर्ती ही वेगवेगळ्या हिरे, चांदीने सजवलेली आहे. मंदिराच्या आत अनेक स्तंभ आहेत बारीक नक्षीकाम केले आहे.
महलक्षी मंदिर हा कलेचा देखावा आहे. ह्या मंदिरात प्रवेश केल्यावर स्थापत्य सनुदर्या काय असते याची जाणीव होते. तसेच भाविकांसाठी हे एक खूप मोठे श्रध्दास्थान आहे त्यामुळे इथे एक तरी भेट द्यावी हे नक्की.
खंडोबा मंदिर, जेजुरी – Khandoba Mandir Jejuri Pune
खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते. जेजुरीचे खंडोबा मंदिर हे तर सर्वत्र प्रसिध्द आहे. हे मंदिर जेजुरी गडावरील स्थित आहे. गडावर जायला पायऱ्या आहेत. गडाच्या पायथ्याशी नंदीची मूर्ती आहे. गडावर जाण्यासाठी पायऱ्यांची सुरुवात तेथून होते. जेजुरी गडावरील जाण्यासाठी 384 पायऱ्या चढुन जावे लागते. गडावर जाण्यासाठी 2 वाटा आहेत, नवीन वाट आणि जूनी वाट. वर चाळताना वाटेच्या कडेने, फुले, पूजेचे सामान, नारळ, भंडारा यांची दुकाने आहेत. गडावर जाताना अनेक छोटी मंदिरे आहेत. गडावर गेल्यानंतर महाद्वारातून प्रवेश केल्यावर मंदिराचा प्रवेश सुरू होतो. मंदिराच्या परिसर 4 दीपमाळा आहेत. मंदिराचे बांधकाम हे दगडात आहेत. मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागते. त्वरित दर्शनासाठी पास घेऊन लवकर दर्शन मिळू शकते. मदिरचा परिसर पूर्णपणे भानादर्याने भरलेला आहे. जेजुरी हे महाराष्ट्रासाठी आस्थेचे आणि आपुलकीचे स्थान बनले आहे. इथे येऊन खंडोबाच्या दर्शन घेऊन जावेच.
साईबाबा मंदिर – शिर्डी – Sai Baba Temple Shirdi
शिर्डीचे साईबाबा मंदिर हे तर जगप्रसिध्द आहे. ह्या मंदिरात येणारे लोक हे महाराष्ट्र पुरते मर्यादित नाहीत तर या मंदिर पूर्ण भारतातून आणि विदेशातून देखील भक्त येतात. अनेक लोक श्रध्देने साईबाबा दर्शन घेण्यासाठी आहे.
साईबाबा मंदिर हे महाराष्ट्रातील शिर्डी या गावात आहे. हे गाव अहमदनगर (आत्ताचे अहील्यानगर ) जिल्ह्यात स्थित आहे.
लाखो भाविकांचे इच्छापूर्ती असलेले साईबाबा मंदिर आहे जगात सर्वत्र प्रसिध्द आहे. अश्या ठिकाणी भेट देणे अनिवार्यच आहे असे म्हटले तर हरकत नाही.
विठ्ठल मंदिर – पंढरपूर – Viththal Mandir Pandharpur
पांधूर्चे विठ्ठल मंदिर हे पूर्ण महारष्ट्र प्रसिध्द आहे. हे मंदिर महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते.
त्र्यंबकेश्वर मंदिर – नाशिक – Tryambakeshwar mandir Nashik
त्र्यंबकेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्रंब्यक या गावात स्तीत आहे. हे मंदिर नाशिक जील्ह्यापासून अगदी 28 किलोमीटर वर आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग हे त्र्यंबकेश्वर मध्ये आहे. सन 1755 ते सन 17 मध्ये हे मंदिर नानासाहेब पेशवे यांनी बांधले. येथील ज्योतिर्लिंगाचे मूर्तीला 3 चेहरे जे ब्रम्ह, विष्णू आणि महेश्वर यांचे प्रतीक मानले जातात.
जगप्रसिध्द असलेले हे मंदिर वारकऱ्यांसाठी स्वर्गप्रमाने आहे. येथे येऊन एकदा तरी विठ्छालाच्या भक्तीत तल्लीन होण्याचा आनंद घ्यायला हवा.
महाराष्ट्र ही संतांची भूमी मानली जाते आणि यासोबतच इथे अनेक दैवत स्थाने आहेत. पर्यटनासाठी आणि श्रद्धेसाठी अनेक मंदिरे आहेत जे भविंकांचे मन तृप्त करून टाकतात. अश्याच पैकी काही मंदिरे वर नमूद केली आहेत त्यांना तुम्ही आवर्जून भेट द्या.