हरिद्वार मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Haridwar in Marathi (Part 2)

20230702_202610.jpg

हरिद्वार मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Haridwar in Marathi (Part 2)

मागच्या भागात आपण हरिद्वार विषयी माहिती जाणून घेतली. जर तुम्ही तो भाग वाचला नसेल तर तो नक्की वाचा कारण आपण त्यात हरिद्वारला कसे पोहोचाल , हरिद्वार मधील मुख्य पर्यटन स्थळे, राहण्याची व्यवस्था आणि गंगा आरती सारखी महत्वाचे मुद्दे संपविले आहेत. त्या लेखात आपण हर की पौडी, गंगा आरती आणि मां मनसा देवी मंदिर याविषयी माहिती बघितली. चला तर मग आता पुढील पर्यटन आणि धार्मिक स्थानांची माहिती घेऊयात. 

हरिद्वार मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Haridwar in Marathi (Part 1)

3. चंडी देवी मंदिर (Chandi Devi Mandir)

नील पर्वताच्या शिखरावर चंडी देवी मंदिर स्थित आहे. मनसा देवी मंदिरा प्रमाणे या मंदिराची देखील धार्मिक मान्यता आहे. इथे जाण्यासाठी देखील 2 मार्ग आहे. पहिला म्हणजे रोप वे. याचे तिकीट तुम्हाला पायथ्याशी मिळतील किंवा मनसा देवीची तिकिटे जिथे मिळाली तिथे सुद्धा घेऊ शकतात. 

चंडी देवी मंदिरापर्यंत पोहोचण्याचा दुसरा मार्ग म्हणजे ट्रेक. हा ट्रेक जवळपास 3 किलोमिटर अंतराचा असून ट्रेक मध्ये तुम्हाला मकडे देखील बघायला मिळतील. चंडी देवी मंदिरासाठी जो सुरुवातीचा पॉइंट आहे हा रेल्वेस्टेशन पासून 4 किलोमिटर अंतरावर आहे..तिथे जाण्यासाठी तुम्हाला सहज ऑटो किंवा टॅक्सी मिळेल. 

4. हरिद्वार मधील इतर घाट (Other Ghats in Haridwar)

हर की पौडी सोबतच हरिद्वार मध्ये इतरही अनेक घाट आहेत. इथे देखील तुम्ही भेट देऊ शकतात. हर की पौडी हा घाट जास्त सुरक्षित आहे कारण इथे पाण्याचा प्रवाह तितका वेगवान नाही आणि इतर सुरक्षा सुविधा देखील आहेत. 

प्रत्येक घाटावर तुम्हाला मंदिर बघायला मिळेल. सायंकाळी या प्रत्येक घाटावर आरती होते. संध्याकाळी जेवण वैगेरे झाल्यानंतर तुम्ही फिरण्यासाठी जवळील घाटावर जाऊ शकतात. रेल्वे रोडला थांबला असाल तर तुम्हाला सर्वात जवळ हा बिरला घाट आहे. इथपर्यंत तुम्ही पाई पाई देखील पोहोचू शकतात. 

5. ऋषिकेश (Rishikesh)

हरिद्वार पासून हृषिकेश हे अंतर 35 किलोमिटर आहे. हरिद्वार बस स्टँड वरून तुम्हाला हृषिकेश जाण्यासाठी बस मिळतील. इथून तुम्हाला ऑटो देखील मिळतील. ऑटो वाल्यासोबत चर्चा करून तुम्ही ऑटो येण्यासाठी आणि जाण्यासाठी ठरवून घेऊन जाऊ शकतात. हरिद्वार ते हृषिकेश एक चांगला रस्ता बनवलेला आहे मात्र हृषिकेश आधी काही अंतरावर ट्रॅफिक जाम लागतो. त्यामुळे इथे जाण्यासाठी देखील सकाळी 9 च्या आधी प्रयत्न करा. 

हृषिकेश मध्ये अनेक ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकतात. यात राम झुला, लक्ष्मण झुला हे आकर्षण आहेत. तर याशिवाय अनेक मंदिरे, घाट आणि आश्रम देखील बघण्यासाठी आहेत. राम झुला हे उत्तराखण्ड मधील एक महत्वाचे ठिकाण आहे ज्यामुळे उत्तराखण्ड ला एक वेगळी ओळख देखील निर्माण झाली आहे. हा 450 फूट लांबीचा आयर्न सस्पेंशन पुल आहे. यावरून फकत पायी जाणारे लोक किंवा स्कूटी आणि बाईक जाऊ शकते. तुम्ही यावरून जात असताना तुम्हाला याचा अनुभव येईल की हा झुला हलतो आहे. 

हृषिकेश मध्ये रिव्हर राफ्टिंग आणि बंजी जम्पिंग सारखे साहसी खेळ देखील खेळता येतात. हृषिकेश मध्ये गेल्यानंतर लगेच तुम्हाला अनेक दुकाने हे राफ्टिंग साठी दिसतात. त्यामध्ये जाऊन तुम्ही बुकिंग करू शकतात. 

राम झुलाच्या जवळच शत्रुघ्न घाट आहे. इथे संध्याकाळी आरती होते. राम झुला तुम्हाला जर पायी जायचा नसेल तर नदी ओलांडण्यासाठी होडी व्यवस्था देखील आहे. एका बाजूने जाण्यासाठी इथे 10 रूपये प्रति व्यक्ती खर्च येतो. रिव्हर राफ्टिंग संपविण्याचा पॉइंट हा देखील राम झुला परिसरात आहे. 

6. पतंजली योगपीठ ( Patanjali Yogpeeth)

ऋषी पतंजली यांच्या नावाने हे सुरू करण्यात आले असून याचे सर्वेसर्वा हे बाबा रामदेव आहेत. दिल्ली हरिद्वार रस्त्यावरच हे ठिकाण आहे. इथे प्रवेश करताच डाव्या बाजूला पार्किंग असून सर्वात मोठे एक हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटल मध्ये खूप दुरून लोक उपचारासाठी येतात. इथे मेडिकल कॉलेज, गुरुकुल, योगा आणि भरपूर काही आहे. इथे एक पतंजली चे मोठे दुकान देखील आहे. 

प्रवेश करताच तुम्हाला दिसेल की येथे महर्षी पतंजली यांची मूर्ती आहे. त्यांच्यासमवेत इतर काही महर्षी देखील मूर्ती रुपात आहेत. जेवणासाठी इथे दानापानी नावाची कॅन्टीन देखील आहे. यांच्या दुसऱ्या फेज मध्ये एक मोठा सभागृह बनविलेले आहे. समोर हिरवळ देखील सुंदर आहे.

7. भारत माता मंदिर (Bharat Mata Mandir)

हे मंदिर एकूण 8 मजली असून पूर्णपणे सफेद रंगात बनलेले आहे. मंदिरात फोटोग्राफी करण्यास मनाई केलेली आहे. 180 फूट उंचीचे हे मंदिर असून प्रत्येक मजल्यावर वेगवेगळी थीम वापरलेली आहे. प्रत्येक मजला हा वेगवेगळ्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी आणि देशभक्त साठी बनविलेला आहे. रेल्वे स्टेशन पासून याचे अंतर हे 7 किलोमिटर आहे. इथे पोहोचत असताना तुम्हाला रस्त्यात अनेक मंदिरे दिसतील. तुम्ही त्याठिकाणी देखील भेट देऊ शकतात.

8. शांती कुंज (Shanti Kunj)

शांती कुंज हे एक शैक्षणिक संकुल असून इथे मोफत शिक्षण दिले जाते. त्यासोबतच इतर शैक्षणिक सोडून ज्ञान देखील इथे दिले जाते. पर्यटक इथे भेट देऊ शकतात. प्रवेशासाठी इथे कोणत्याही प्रकारे शुल्क लागत नाही. तुम्ही इथे 2-3 दिवस थांबू देखील शकतात मात्र त्यासाठी एक अट आहे की तुम्हाला तिथले नियम पाळावे लागतात. यामध्ये तुम्हाला योगा आणि प्रार्थना हे नियम पाळावे लागतात. इथे आतमध्ये एक गायत्री माता मंदिर देखील बनविलेले आहे. 

हरिद्वार मधील या काही महत्वाच्या पर्यटन आणि धार्मिक स्थळांची माहिती होती. आता आपण या ठिकाणी भेट देण्यासाठी योग्य वेळ जाणून घेऊयात.

हरिद्वारला भेट देण्यासाठी योग्य वेळ – Best Time To Visit Haridwar

हरिद्वारला तुम्ही वर्षभरात कधीही येऊ शकतात. गंगा स्नान जेव्हा तुम्ही करतात तेव्हा तो उन्हाळा जरी असेल तरी पाणी इतके गार असते की तुम्ही एकाच वेळी डुबकी मारू शकणार नाही. 

हरिद्वार भेटीसाठी खर्च – Budget to Visit Haridwar

हरिद्वारला भेट देत असाल तर तुमचे जास्त पैसे जाणार नाहीत कारण इथे राहण्यासाठी आणि खाण्यासाठी जास्त पैसे जात नाहीत. हर की पौडी परिसरात स्ट्रीट फूड खूप चांगल्या प्रकारे मिळते त्यामुळे ते खाणे विसरू नका!

0 Replies to “हरिद्वार मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Haridwar in Marathi (Part 2)”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top