काठमांडू मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Kathmandu in Marathi (Part 2)

20230730_082259.jpg

काठमांडू मधील महत्वाची पर्यटन स्थळे | Best Tourist Places to Visit in Kathmandu in Marathi

आपण काठमांडू मधील महत्वाची पर्यटन स्थळे भाग 1 मध्ये काठमांडू शहरात फिरण्यासाठी महत्वाच्या बाबी जसे कि काठमांडू मध्ये राहण्याची व्यवस्था, पर्यटन स्थळी कसे पोहोचणार, भेट देण्याची योग्य वेळ आणि काही महत्वाची पर्यटन स्थळे बघितली. आजच्या या लेखाच्या माध्यमातून काठमांडू मधील इतर काही दृष्टीक्षेपात नसलेले पर्यटन स्थळे बघणार आहोत.

  1. भक्तपूर दरबार स्क्वेअर

भक्तपूर दरबार स्क्वेअर हे नेपाळच्या काठमांडू मधील एक रेषा सुंदर आकर्षण आहे, जे ऐतिहासिक स्थळ देखील आहे. या ठिकाणी रॉयल पॅलेस 1427 मध्ये बांधण्यात आले होते आणि त्याला 55 खिडक्या आहेत. हे हे मध्ययुगीन वास्तुकला सोबत मंदिर आणि अंगण असलेले युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान बनले आहे. हे चौक प्राचीन मल्ल राजांची भव्यता दर्शवितो. या ठिकाणी नेवार कला आणि संस्कृती देखील अतिशय सुंदर आहे. हे ठिकाण काठमांडू मध्ये एक अतिशय सुंदर ठिकाण आहे, जे बघण्यासाठी पर्यटक काठमांडू मध्ये आल्यावर ती एकदा तरी या ठिकाणाला भेट देतात. या भक्तपुर दरबार स्क्वेअर याची वेळ आहे सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. या ठिकाणी भरतीसाठी 500 नेपाली रुपये आणि प्रदेशांसाठी 1000 नेपाली रुपयाचे तिकीट आहे.

  1. पाटण दरबार स्क्वेअर

नेपाल, काठमांडू मधील पाटण दरबार स्क्वेअर हे ठिकाण संस्कृतीचा खजाना म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे. या पाटण दरबार स्क्वेअरचे आधी नाव होते ललितपुर आणि आत्ता पण आहे ललितपुर. हे ठिकाण युनिस्कोचे जागतिक वारसा स्थळ बनले आहे, या ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदर नेवारी वास्तू कला, मंदिरे आणि राजवाडे पाहायला मिळतील, जे अतिशय सुंदर आहे.

हे ठिकाण एक मनोरंजक अनुभव आहे जो नेपाळच्या उल्लेखनीय इतिहास आणि परंपरा द्वारे पर्यटकांची लक्ष केंद्रित करतो. हे जागा चार स्तूप ने वेढलेले आहे, ज्याला सम्राट अशोका यांनी बांधले होते. या जागेची वेळ आहे सकाळी दहा वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत. भारतीयांसाठी या ठिकाणी 250 टिकीट आहे, आणि परदेशांसाठी 1000 रुपये तिकीट आहे.

  1. थामेळ एरिया (Thamel Area)

नेपाल काठमांडू मधील, थामेल हा एक चैतन्यशील आणि गजबजलेला जिल्हा आहे. अतिशय सुंदर आणि विविध आकर्षाने आणि सेवांसह हे एक लोकप्रिय काठमांडू मधील पर्यटक स्थळ बनले आहे. थामेल हे विविध रेस्टॉरंट, कॅफे, हस्तकला स्टोअर्स रस्त्यावरील बाजारपेठांसह त्याच्या उत्साही वातावरणासाठी काठमांडू मध्ये अतिशय प्रसिद्ध आहे, हे ठिकाण पर्यटक एकदातरी बघतात. जर आपण काठमांडू मध्ये चांगले जेवण आणि मज्जा करण्यासाठी जागा बघत असाल तर आपल्याला हवी असलेले ते संपूर्ण आणि सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहेत. सर्व प्रकारच्या निवासाचे पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. हे शहराची सांस्कृतिक संपत्ती पाहण्यासाठी आणि एक अनुभव भेट देण्यासाठी एक लक्ष केंद्रित करणारे ठिकाण आहे. ही जागा पूर्ण दिवस चालू असते आणि या ठिकाणी येण्याची कोणत्या प्रकारचे तिकीट नाही.

  1. नेपाळचे राष्ट्रीय संग्रहालय

नेपाल, काठमांडू मध्ये भेट देणारे पुढील ठिकाण म्हणजे नेपाळचे राष्ट्रीय संग्रहालय, हे देशाचा समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा प्रदर्शित करणारे एक संग्रहालय आहे, जे फार प्रसिद्ध आहे. या संग्रहालयामध्ये नेपाळच्या इतिहासातील अनेक कालखंडातील पुरातन वस्तू तसेच चित्रे आणि शिल्पांचा भरपूर मोठा संग्रह, या ठिकाणी या संग्रहालयात उपलब्ध आहे. प्राचीन सभ्यता, पारंपारिक हस्तकला, तसेच धार्मिक कला आणि इतर विषयांवरील प्रदर्शने, सर्वांसाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत. या संग्रहालयामध्ये नेपाळच्या अनोख्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक गोष्टींचे संग्रह आहे जे अभ्यास करणारे आणि पर्यटक या ठिकाणी बघू शकतात. या जागेची वेळ आहे सकाळी 10:30 वाजेपासून ते संध्याकाळी 4;30 वाजेपर्यंत

  1. काठमांडू ड्रीम्स गार्डन

नेपाल, काठमांडूच्या मध्यभागी असलेले अतिशय सुंदर आणि शांत ठिकाणी म्हणजे ड्रीम्स गार्डन, हे एक शांत ठिकाण आहे. काठमांडूचे गार्डन ऑफ ड्रीम्स ज्याला स्वप्न बागेच्या म्हणून देखील ओळखले जाते आणि तसेच याला गार्डन ऑफ सिक्स सीजन असेही म्हटले जाते. हे 1920 च्या दशकातील नवशास्त्रीय उद्यान आहे. हे शहराच्या गजबजाटातून, अतिशय सुंदर डिझाईन केलेल्या बागा, मंडप आणि कारंजे यासह शांत आराम घेण्यासाठी जागा आहे. पर्यटक आणि रहिवासी तसेच अभ्यासगत सर्वांसाठी हे एक अतिशय चांगले ठिकाण आहे, जर आपण काठमांडू मध्ये फिरून फिरून थकले असाल आणि शांत झाला सापडत असाल, तर आपण या ठिकाणी येऊ शकतो. या ठिकाणी आपण चक्कर मारू शकतो, तसेच पुस्तक वाचू शकतो आणि आराम करू शकतो. या जागेची वेळ आहे सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत आणि या ठिकाणी 400 नेपाली रुपयासाठी गेट आहे सगळ्यांसाठी.

  1. तौदाहा तलाव

नेपाल, काठमांडूच्या बाहेरील एक क्षंत गोड पाण्याचे सरोवर म्हणजे तौदाहा तलाव. हे हिरवीगार झाडी आणि अतिशय सुंदर डोंगरांनी वेढलेले एक तलाव आहे. हे तौदाहा तलाव एक पवित्र तलाव मानले जाते आणि सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व असलेले हे प्रसिद्ध तलाव आहे. हे तलावापासून आपण पक्ष निरीक्षण पण करू शकतो. हे तलाव त्याच्या आध्यात्मिक महत्त्व व्यतिरिक्त पक्षी आणि सहलीसाठी एक अतिशय लोकप्रिय ठिकाण बनले आहे. पर्यटक आणि रहिवासी तसेच अभ्यासगत या शांत वातावरणात आराम करू शकतात. बोटीतून फिरू शकतात माझ्या करू शकतात आणि शहरात जवळील या लपलेल्या रत्नाचा नैसर्गिक सौंदर्याची दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकतात. हे तलाव पूर्ण दिवस चालू असते आणि या ठिकाणी भारतीयांसाठी 50 नेपाळी रुपये आणि परदेशांसाठी 70 नेपाळी रुपयासाठी आहे.

  1. गुह्येश्वरी मंदिर

नेपाल, काठमांडू मधील गुह्येश्वरी मंदिर हे देवी पार्वती यांना समर्पित असलेले, एक पवित्र आणि प्रमुख हिंदू मंदिर आहे. हे 52 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे. मंदिराच्या वास्तूमध्ये अतिशय सुंदर नक्षीकाम आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. काठमांडूच्या मध्यभागी असलेल्या या पवित्र ठिकाणी यात्रेकरू आणि भक्त आशीर्वाद घेण्यासाठी लांब लांबून येथे येतात. या मंदिराची वेळ आहे सकाळी 4 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत आणि येथे येण्यासाठी कोणते प्रकारचे टिकीट नाही.

  1. पशुपतिनाथ मंदिर

नेपाल मध्ये प्रमुख शहर म्हणजे काठमांडू येथील, बागमती नदीच्या काठावर असलेले सर्वात महत्त्वाचे हिंदू मंदिर म्हणजे पशुपतिनाथ मंदिर. हे शिव स्वरूप भगवान पशुपतिनाथ यांना समर्पित असलेले एक हिंदू मंदिर आहे. या ठिकाणी यात्रेकरू आणि पर्यटक मंदिराच्या पगोडा शैलीतील वास्तू कला, तसेच भव्य लाकडी को येऊ काम आणि धार्मिक गोष्टींकडे आकर्षित होतात. हे मंदिर एक महत्त्वाचे स्मशान स्थळ म्हणूनही काम करते. मंदिराचे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक महत्त्व भरपूर असल्यामुळे हे ठिकाण 1979 मध्ये युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ बनले आहे. या ठिकाणी हजारो लाखोंच्या संख्येमध्ये श्रद्धाळू भगवान शिवचे दर्शन घेण्यासाठी येतात. या मंदिराची वेळ आहे सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. या ठिकाणी भारतीयांसाठी कोणते प्रकारचे टिकीट नाही पण परदेशांसाठी एक हजार नेपाली रुपयासाठी गेट आहे. मध्ये आल्यावरती हे मंदिर अवश्य भेट द्या अतिशय सुंदर इतिहास असलेली हे मंदिर आहे

काठमांडू मधील आश्चर्यकारक पर्यटन स्थळांवरील माझा ब्लॉग वाचल्याबद्दल धन्यवाद. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझ्या या ब्लॉगमध्ये हवी ती संपूर्ण माहिती भेटली असेल. तुम्हाला आणखी काही शंका असल्यास किंवा अतिरिक्त माहिती हवी असल्यास कृपया आमच्याशी संपर्क करा.

सुरक्षित प्रवास करा! सुखाचा प्रवास!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top