महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे || Best Tourist Places to visit in Mahabaleshwar (Part 2)

20230703_201911.jpg

महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे || Best Tourist Places to visit in Mahabaleshwar (Part 2)

महाबळेश्वर येथील आपला पहिला दिवस कोणती ठिकाणे पाहण्यात घालवावा याविषयी आपण मागील भाग बघितला. आपण त्यात जुने महाबळेश्वर, मुख्य पॉइंट्स जसे की एलफिन्स्टन पॉइंट, अर्थूर सीट पॉइंट, सावित्री पॉइंट, केस्टल रॉक पॉइंट, केटस् पॉइंट, माप्रो गार्डन यासारखी ठिकाणे बघितली आणि त्यासोबतच तिथली माहिती देखील जाणून घेतली. आता आपण दुसऱ्या दिवशी महाबळेश्वर मध्ये तुम्ही काय काय नवीन बघू शकतात याविषयी जाणून घेऊयात.

महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे || Best Tourist Places to visit in Mahabaleshwar (Part1)

  1. वेण्णा लेक (Venna Lake)

वेण्णा लेक या ठिकाणी तुम्ही बोटिंग आणि हॉर्स रायडिंग (घोडेस्वारी) करू शकतात. महाबळेश्र्वर पासून 3 किलोमिटर अंतरावर हे ठिकाण आहे. पाचगणी पासून हे अंतर 12 किलोमिटर आहे. 

इथे तुम्ही 2 ते 3 तास सहज घालवू शकता. अनेक लोकांनी इथे स्टॉल लावलेले असतात त्यामुळे तुम्हाला भूक लागलेली असेल तर तुम्ही नक्की खाऊ शकतात. 

महाबळेश्वर विषयी महत्वाची गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला देशातील 85% स्ट्रॉबेरी उत्पादन बघायला मिळते. वेण्णा लेक च्या समोरच लहान मुलांच्या खेळण्यासाठी एक छोटासा पार्क देखील आहे. 

  1. वेलोसिटी एंटरटेनमेंटस (Velocity Entertainmentz)

महाबळेश्वर मधील हे सर्वात उत्तम अम्युजमेंट पार्क आहे. इथे तुम्हाला दैशिंग कार्स, झिपलाईन, ट्रामपोलिन, मेरी गो राऊंड सारख खेळ मिळतील.

तुम्हाला इथेच इन हाऊस रेस्टॉरंट मिळेल. इथे थोड महाग आहे मात्र त्यांच्या चवीला ते योग्य म्हणता येईल. गो कर्टिंग इथे तुम्ही नक्की अनुभवायला हवे. 

  1. मुंबई पॉइंट / सनसेट पॉइंट (Mumbai Point / Sunset Point)

मुंबई पॉइंटला सनसेट पॉईंट या नावाने देखील ओळखले जाते. हे ठिकाण महाबळेश्वर पासून 2 किलोमिटर अंतरावर आहे. तुम्ही इथे सायंकाळी 5:30 च्या आधी पोहोचण्याचा प्रयत्न करा कारण इथे सनसेट बघण्यासाठी खूप जास्त गर्दी असते. 

  1. पारसी पॉइंट (Parsi Point)

महाबळेश्वर पासून 12 किलोमिटर अंतरावर हे ठिकाण मुख्य रस्त्याला लागूनच आहे. इथे तुम्हाला हँगिंग ब्रीज बघायला मिळेल तो खूप जास्त लोकप्रिय आहे. हँगिंग ब्रिजच्या बाजूलाच एक आणखी ठिकाण आहे जिथून तुम्हाला अधिक विहंगम दृश्य बघायला मिळेल.

  1. टेबल लँड (Table Land)

टेबल लँड हे ठिकाण समुदरसपाटीपासून 4500 फूट उंचावर आहे. हे ठिकाण पाचगणी मधील सर्वात उंच ठिकाण आहे.आशिया मधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब डोंगरी पठार म्हणून टेबल  लँड ओळखला जातो. यामध्ये पहिल्या क्रमांकावर तिबेटीयन पठार आहे. 

हे अंतर जवळपास 6 किलोमिटर असून इथे भरपूर वेळा तुम्हाला सिनेमांच्या शूटिंग होताना दिसतात. इथे तुम्ही पायी चालून पूर्ण अंतर जाऊ शकतात किंवा तुम्हाला घोडेस्वारी, घोडागाडी हे देखील पर्याय उपलब्ध आहेत. इथे तुम्हाला 2 तलाव बघायला मिळतील. तुम्हाला इथे एक ठिकाण असे सापडेल जिथे तुम्ही म्हणू शकतात की हे पांडवांची पाऊले आहेत. तुम्हाला इथे टायगर केव्ह हा पॉइंट देखील बघायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला एक लायन केव्ह देखील बघायला मिळेल. इथे तुम्हाला 10 रुपये तिकीट मूल्य जमा करावे लागेल. 

  1. हॅरीसन फॉली पॉइंट (Harrison Folly Point)

तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर बस साठी 100 रुपये, कार आणि जीपसाठी 50 रुपये तर मोटारसायकल साठी 20 रुपये तिकीट घ्यावे लागेल. तुम्हाला या ठिकाणावर जाण्यासाठी 1 किलोमिटर आतमध्ये जावे लागेल. तुम्हाला इथून सुंदर डोंगररांगा बघायला मिळतील. 

  1. सिडनी पॉइंट (Sydney Point)

पाचगणीच्या अगदी जवळ असलेला हा पॉइंट सुर्यास्त साठी प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर मध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी सुर्यास्त बघता येतो. इथे देखील तुम्हाला एक हँगिंग ब्रीज बघायला मिळेल. 

  1. लिंगमाला धबधबा (Lingmala Waterfall)

महाबळेश्वर मधील सर्वात जास्त सुप्रसिद्ध असा हा धबधबा पावसाळ्यात ओसंडून वाहत असतो. त्यामुळे जर पावसाळ्यात तुम्ही महाबळेश्वर ला भेट देण्यासाठी जात असाल तर इथे नक्की भेट द्या. 

  1. प्लेटो पॉइंट (Plato Point)

थोडीशी जंगल ट्रेक करून आपण या ठिकाणी पोहोचू शकतो. अगदी टेबल टॉप सारखे हे भव्य नाही मात्र येथून तुम्हाला एक चांगल्या निसर्गाचा आनंद घेता येतो. 

  1. विल्सन पॉईंट (Wilson Point)

हे ठिकाण देखील सुर्यास्त बघण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणावरून तुम्हाला सुर्यास्त अनुभवता येतो.

  1. भिल्लार धबधबा (Bhilar Waterfall)

महाबळेश्वर सोडून पाचागणी मध्ये आल्यानंतर तुम्हाला तुम्हाला एका विव्ह पॉइंट वरून हा धबधबा बघता येईल. 

  1. स्वच्छ भारत पॉइंट (Swachh Bharat Point)

नव्याने बनविण्यात आलेल्या या ठिकाणावरून देखील विहंगम आणि नयनरम्य दृश्य तुम्हाला बघायला मिळेल. 

महाबळेश्वरला कसे पोहोचाल? (How to reach Mahabaleshwar?)

महाबळेश्वरला येण्यासाठी तुम्हाला अनेक मार्ग आहेत. तुम्हाला बस, ट्रेन आणि फ्लाईट ने देखील इथे येता येईल. 

ट्रेन ने जर येणार असाल तर तुम्हाला सातारा हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. सातारा ते महाबळेश्वर हे अंतर जवळपास 60 किलोमिटर आहे. पुणे वरून सातारा साठी रेल्वे आहेत. हे अंतर 140 किलोमिटर आहे.

पुण्यात तुम्हाला विमानाने येता येईल. तिथून बस किंवा रेल्वे ने तुम्ही महाबळेश्वर येऊ शकतात. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातून तुम्हाला महाबळेश्वर साठी लगेच बस मिळतील. 

महाबळेश्वर भेट किती दिवसाची ठेवावी? How many Days can we spend in Mahabaleshwar?

महाबळेश्वर आणि जवळच असलेले पाचगणी हे ठिकाण फिरण्यासाठी तुम्हाला कमी कमी 3 दिवस इथे राहावे लागेल. तुम्ही 3 दिवसात 3 वेगवेगळ्या  ठिकाणी सुर्यास्त बघू शकतात. 

महाबळेश्वर मध्ये राहण्याची व्यवस्था – Where to Stay In Mahabaleshwar?

हॉटेल्स साठी तुम्हाला 2 जागा योग्य आहेत. एक तर मार्केट परिसर किंवा पाचगणी. दोन्ही तुम्हाला योग्य दरात हॉटेल मिळतील. 2000 पासून पुढे एका रुमची भाडे रक्कम असेल. 

0 Replies to “महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे || Best Tourist Places to visit in Mahabaleshwar (Part 2)”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top