त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर माहिती || Trimbakeshwar Jyotirlinga Mandir information in Marathi

20231002_090028.jpg

ब्रम्ह आणि विष्णू यांच्यामधे सर्वात श्रेष्ठ कोण हा वाद निर्माण झाला. हा वाद मिटवण्यासाठी महादेवांनी एका विशाल प्रकशस्तंभाचे स्वरूप घेतले. हेच प्रकशस्तंभ स्वरूप ज्योतिर्लिंग होय. आज आपल्या देशात 12 महत्त्वाची ज्योतिर्लिंग आहेत. त्यातील एक म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे.

नाशिक शहरात स्थित असलेले हे.मंदिर एक प्रसिध्द धार्मिक पर्यटन स्थळ बनले आहे.

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचे महत्त्व, वैशिष्ट आपण पुढे जाणून घेऊया.

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर || Trimbakeshwar Jyotirlinga Mandir

त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर महाराष्ट्र राज्यात आहे. महाराष्ट्रातील नाशिक शहरात 28 किमी अंतरावर त्र्यंबक गावात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे.

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला ब्रह्मगिरी पर्वत आहे. ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी नदीचा उगम होतो. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ कुशावर्त तीर्थ कुंड आहे. या कुंडात गोदावरीचे पाणी आहे. या कुंडात गोदावरीचा उगम आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शना अगोदर भाविक कुशावर्त कुंडात स्नान करून दर्शनास जातात.

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर स्थापत्य || Trimbakeshwar Jyotirlinga Architecture

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचे पूर्ण स्थापत्य हे काळ्या पाषाणात आहे. तिसरे पेशवे नानासाहेब यांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराची बांधकाम केले. 1740 ते 1761 मध्ये या मंदिराची बांधणी केली गेली. मंदिराचे काम 21 वर्ष चालले. पुन्हा 1789 मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराची पुनर्निर्मिती केली.

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर || Trimabakeshwar Jyotirling Mandir 

ज्योतिर्लिंग हे एक पवित्र आणि शक्तिमान स्थान मानले जाते. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे बाकीच्या ज्योतिर्लिंगांपैकी विशिष्ट मानले जाते त्याचे मुख्य कारण हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मधी ज्योतिर्लिंगाची मूर्ती आहे. मंदिरात असणाऱ्या कायमच्या शिवलिंग पासून ही मूर्ती वेगळी आहे. ज्योतिर्लिंगस तीन मुख आहेत. हे मुख ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचे आहेत. ज्योतिर्लिंग वर हिऱ्यांचा मुकुट चढवला आहे.

भाविकांना ज्योतिर्लिंग असलेल्या आतल्या भागात जाण्यास परवानगी नसते. एका विशिष्ट वेळेत फक्त पुरुषांना आत जाण्यास परवानगी असते. आत प्रवेश नसल्याने भाविकांना ज्योतिर्लिंग स्पष्ट दिसण्यासाठी ज्योतिर्लिंगाचे वर एक आरसा लावलेला आहे. त्यामध्ये ज्योतिर्लिंगाचे प्रतिबिंब दिसते.

कुशावर्त कुंड हे देखील एक पवित्र स्थान आहे. इथेही लोक दर्शन घेऊन स्नान करतात.

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग सारखेच एक शिवलिंग मंदिर प्रांगणात बनवण्यात आले आहे. भाविक येथे ज्योतिर्लिंग पूजा करतात. प्रांगणात इतर देवांच्या अनेक मुर्त्या आहेत. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग एक महत्त्वाचे देवस्थान आहेत. येथे मोठमोठ्या पूजा केल्या जातात. अनेक भावीक हवन, पूजा, नवस अश्या गोष्टींसाठी या ठिकाणी येतात. तुम्हाला एखादी पूजा करायची असेल तर तुम्हीऑनलाईन बुकींग करू शकता.

मंदिराच्या बाहेर पूजेच्या सामानाची, प्रसादाची अनेक दुकाने आहेत. तुम्ही पूजा करण्यासाठी आणि प्रसाद चढविण्यासाठी तेथून खरेदी करू शकतो. या दुकानामध्ये जर खरेदी केली तर तिथे दुकानदार तुम्हाला तुमचे सामान ठेवून देतात.

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर पौराणिक इतिहास | Trimbakeshwar Jyotirlinga History

भारतातील प्रत्येक महत्त्वाच्या धार्मिक स्थळाचा पौराणिक इतिहास आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा देखील असा इतिहास बघायला मिळतो.

गौतम ऋषी आपल्या पत्नीसह ब्रह्मगीरी पर्वतावर मठात राहत होते. तेव्हा संपूर्ण परिसरात दुष्काळ पडला होता. गौतम ऋषींनी वरुण देवाची प्रार्थना करून त्यांना प्रसन्न केले आणि त्यांच्याकडे दुष्काळ हटवण्याची विनवणी केली. वरुण देवांनी आशीर्वाद म्हणून ब्रह्मगिरी पर्वतावर गौतम ऋषींच्या मठाला पुष्कळ पाण्याचा पुरवठा दिला. हे बघून बाकी ऋषींनी असुयेने त्यांच्या शेतात पवित्र गाय सोडली. ह्या गायीची गौतून ऋषिंकडून हत्या झाली. हे पाप मिटवण्यासाठी गौतम ऋषींनी महादेवाची आराधना करून गंगा नदीला त्यांच्या आश्रमात पाठवण्याची विनंती केली. महादेवांनी त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन विनंती पूर्ण केली. गंगा नदी आज गोदावरी नदी म्हणून पुजली जाते.  कुशावर्त तलाव हे गंगा नदीचे उगमस्थान आहे.

गौरून ऋषींनी महादेवांना गंगा नदी सोबत तिथे राहण्याची विनंती केली म्हणून महादेव ज्योतिर्लिंग स्वरूपात तिथे स्थापित झाले.

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर दर्शन | Trimbakeshwar Jyotirlinga Mandir 

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरास चार दरवाजे आहेत. मंदिरात दर्शनासाठी पूर्व दरवाजातून प्रवेश दिला जातो. दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. हर हर महादेव म्हणत भक्त दर्शनासाठी उभे राहतात. मंदिराच्या रांगेत दर्शन घेण्यासाठी आजूबाजूला बसण्यासाठी व्यवस्था केली हे त्यामुळे आरामात दर्शन होते.

दर्शनासाठी साधारणतः 1 ते 2 तासांचा वेळ लागू शकतो. हेच जर तुम्ही दर्शनासाठी महाशिवरात्री किंवा श्रवण महिना अश्या महत्त्वाच्या काळात गेलात तर दर्शनास 5 ते 6 तास देखील लागू शकतात. दर्शनासाठी असणाऱ्या रांगेचा परिसर हा वातानुकूलित आहे त्यामुळे आरामदायक दर्शन होते.

मंदिरात दर्शनाच्या ठिकाणी मोबाईल वापरण्याची परवानगी नाही. दर्शन झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या मार्गाने बाहेर निघावे लागते. मंदिराच्या परिसरात अनेक देवांची छोटी मंदिरे आहेत ज्यांचे तुम्ही दर्शन घेऊ शकता. येथे महादेवाचा प्रसाद दिला जातो जो तुम्ही घेऊ शकता.

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिक जाण्याचा मार्ग | Trimbakeshwar Jyotirlinga Mandir Route 

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे नाशिक शहरातील त्र्यंबक गावात स्थित आहे. त्रिंबक गाव नाशिक शहरापासून 28 किमी अंतरावर आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही 2 मार्गाने जाऊ शकता. पहिला मार्ग म्हणजे रेल्वे आणि दुसरा मार्ग म्हणजे विमान मार्ग.

नाशिक शहरातील नाशिक रोड हे रेल्वे स्थानक आहे त्यामुळे देशातील कुठल्याही प्रमुख शहरातून तुम्हाला नाशिक मध्ये येण्यासाठी रेल्वे उपलब्ध होईल. रेल्वेने येण्यासाठी तुम्हाला रेल्वे स्थानकावरून नाशिक रेल्वे स्थानक पर्यंतचे तिकीट काढून यावे लागेल. नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे 35 ते 40 किमी आहे.  रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर त्र्यामाबेकेश्वर ज्योतिर्लिंग ठिकाणापर्यंत जाण्यासाठी बस, टॅक्सी आणि रिक्षा उपलब्ध असतात. तुम्हाला हव्या त्या यापैकी कोणत्याही मार्गाने तुम्ही त्र्यंबकेश्वर पर्यंत पोहचू शकता. साधारणतः 1 ते सव्वा तासात तुम्ही मंदिरापर्यंत पोहचता. रेल्वे स्थानकापासून बस ने जाण्यासाठी तुम्हाला 40 ते 50 रुपये भाडे पडू शकते. जर तुम्हाला टॅक्सीतून जायचे असेल तुम्हाला 270 ते 300 रुपये भाडे पडू शकते.

नाशिक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग जाण्यासाठी दुसरा मार्ग म्हणजे विमान मार्ग. नाशिक शहरात विमानतळ आहे. जर तुमच्या शहरातील विमानतळापासून नाशिक विमानतळ पर्यंत विमानसेवा उपलब्ध सेल तर तुम्ही नाशिक मध्ये येऊ शकता. जर विमानसेवा नसेल तर तुम्ही मुंबई, पुणे किंवा औरंगाबाद अशा ठिकाणी येऊन तेथून ट्रेन किंवा बसने नाशिक पर्यंत पोहचू शकता.

जर तुम्ही जवळच्याच शहरात राहत असाल तर तुम्ही बसणे नाशिक पर्यंत थेट जाऊ शकता.

मंदिरात दर्शनासाठी VIP पास देखील उपलब्ध आहे. VIP पास हा 200 रुपयांना मिळतो. व्हिआयपी पास घेतल्यास तुम्हाला अर्धा ते पाऊण तासात दर्शन मिळू शकते. व्हिआयपी पास मंदिराच्या देनगीच्या स्वरूपात असतो.

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर राहण्याची आणि खाण्याची सोय | Stay and Food at Nashik Trimbakeshwar Jotirlinga Mandir

नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये राहण्यासाठी तुमच्याकडे 2 पर्याय उपलब्ध आहे. पहिला म्हणजे गजानन स्वामी ट्रस्ट. नाशिक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या अर्धा किलोमीटर अगोदर हे ट्रस्ट आहे. येथे शयनगृह, सिंगल रूम आणि फॅमिली रूम असे सर्व पर्याय उपलब्ध आहेत. रूमसाठी 24 तासांचे साधारण 400 रुपये आणि शयनगृहात राहण्यासाठी 50 रुपये भाडे आहे.

गजानन स्वामी ट्रस्ट महे खाण्याची सोय देखील उपलब्ध आहे. 35 रुपये थळी अश्या स्वरूपात येथे जेवण उपलब्ध आहे. त्यामुळे येथे राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय होते.

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या जवळपास राहण्यासाठी देखील पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही हॉटेल किंवा खाजगी रूम घेऊन राहू शकता. येथे राहण्यासाठी जास्त खर्च येऊ शकतो. साधारणतः 1000 ते 3000 पर्यंत एका रूम चे भाडे असते. खाण्याची सोय देखील हॉटेल किंवा खाजगी रेस्टॉरंट मध्ये होऊ शकते. 100 रुपये ठली पासून तुमच्यासाठी पर्याय उपलब्ध असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top