शिमला मधील पर्यटन स्थळे || Tourist Places to visit in Shimla – Marathi (Part 2)

20230710_201818.jpg

शिमला मधील पर्यटन स्थळे || Tourist Places to visit in Shimla – Marathi (Part 2)

मागील भागात आपण शिमला मधील मुख्य काही पर्यटन स्थळे आणि त्यासोबतच इतरही काही माहिती जाणून घेतली जसे की शिमला मध्ये तुम्ही कधी भेट देऊ शकतात, इथे राहण्याची व्यवस्था काय आहे, इथे जेवणाची व्यवस्था काय आहे, शिमला इथे कसे पोहोचाल आणि त्यासोबतच आपण काही महत्वाच्या टिप्स देखील सांगितल्या आहे. त्यामुळे जर तुम्ही तो लेख वाचला नसेल तर आधी तो वाचा आणि मग नंतर शिमला मधील इतर पर्यटन स्थळांची माहिती जाणून घ्या.

शिमला मधील पर्यटन स्थळे || Tourist Places to visit in Shimla – Marathi (Part 1)

चला तर मग आता आपण लेखाच्या माध्यमातून शिमला मधील इतर काही उरलेली पर्यटन स्थळे क्रमवार जाणून घेऊयात.

आपण मागील लेखात पहिले दोन दिवस शिमला मध्ये काय बघाल हे बघितले आहे त्यामुळे आता आपण तिसऱ्या दिवशी शिमला मध्ये काय काय बघू शकतो हे जाणून घेऊयात

  1. चैल (Chail)

चैल हे ठिकाण शिमला पासून 40 किलोमिटर अंतरावर आहे. हे ठिकाण शिमला मध्ये येत नसून त्याला जिल्हा हा सोलान आहे. शिमला मध्ये जास्त गर्दी असतें आणि तुम्हाला जर शांतता आवडत असेल तर तुम्ही चैल इथे जाऊ शकतात. तुम्हाला जर बसणे जायचे असेल तर HRTC म्हणजेच हिमाचल रोड ट्रान्सपोर्टची बस सहज चैल पर्यंत मिळेल. तुम्ही जर स्वताच्या गाडीने जाणार असलं तर तुम्ही चैलं इथे जाताना जावे. कारण इथून तुम्हाला सरळ सोलन आणि मग पुढे चंदीगड ला जाता येईल. 

या मार्गावर जात असताना तुम्ही जर गुगल नकाशा वर अवलंबून जायचे असेल तर तुम्ही चुकू शकतात. त्यामुळे एखाद्या स्थानिक नागरिकाला मध्ये मध्ये विचारून तुम्ही योग्य मार्गावर आहेत की नाही याची खात्री करून घ्या. चैल मध्ये तुम्हाला खूप सुंदर मंदिरे आणि निसर्ग अनुभवायला मिळेल.

  1. काली का टिब्बा मंदिर (Kali ka Tibba Temple)

चैल मधील हे सर्वात प्रसिद्ध मंदिर असून इथून तुम्हाला संपूर्ण परिसर बघायला मिळतो. मंदिर एका डोंगराच्या टोकावर आहे. इथून तुम्हाला शिवालिक पर्वतरांग देखील बघायला मिळते. 

  1. द चेल वाईल्ड लाईफ सेंच्युरी (The Chail Wildlife Century)

तुम्ही या ठिकाणी देखील भेट देऊ शकतात. तुम्हाला इथे जंगलात हिमलयन ब्लॅक बियर म्हणजेच कले अस्वल आणि इतरही मुख्य जंगली श्वापदे बघायला मिळतील. 

  1. द चेल पॅलेस (The Chail Palace)

तुम्हाला 3 इडियट सिनेमातील एक सीन आठवत असेल की ज्यात रांचोडदास चांचड यांचे घर दाखविलेले आहे. त्या पूर्ण सिनची शूटिंग ही चैल पॅलेस इथेच झालेली होती. त्यामुळे देखील हे ठिकाण अनेक पर्यटकांच्या यादीत सर्वात आधी असते. 

  1. मशोबरा (Mashobra)

शिमला येथील ऑफ बीट जागांपैकी एक म्हणजे माशोबरा होय. इथे देखील तुम्हाला जास्त गर्दी बघायला मिळणार नाही. तुम्हाला जर परिवार सोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा असेल तर तुम्ही नक्की मशोबारा येथे यायला हवे. तुम्हाला इथे रिझर्व्ह फॉरेस्ट सेंच्युरी आणि वाईल्ड फ्लॉवर हॉल बघायला मिळेल. 

शिमला पासून मशोब्रा हे अंतर 10 किलोमिटर असून फक्त अर्ध्या तासात तुम्ही इथे पोहोचू शकतात. 

  1. नालदेहरा (Naldehra)

शिमला येथील मुख्य सुंदर जागांपैकी एक ठिकाण म्हणजे  नालदेहरा आहे. हे ठिकाण देखील पर्यटकांसाठी आकर्षण आहे. 2200 मीटर उंचीवरील सर्वात जुना  गोल्फ कोर्स इथे असल्याने हे ठिकाण देखील प्रसिद्ध आहे. ब्रिटिशांनी या ठिकाणी हा गोल्फ कोर्स बनविला होता. ब्रिटिश आर्किटे्चर वापरलेले इथे एक रेस्टॉरंट देखील आहे. 

शिमला पासून नालदेहरा हे अंतर 23 किलोमिटर आहे. तुम्ही 1 तासात या ठिकाणी पोहोचू शकतात. 

  1. राष्ट्रपती निवास (President House / Rashtrapati Niwas)

राष्ट्रपती निवास या ठिकाणी जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्हाला सकाळी 10:30 ते 5 या वेळेत भेट द्यावी लागेल. खूप मोठ्या परिसरात हे निवास स्थान बनलेले असून तुम्हाला इथे सुंदर कलाकृती बघायला मिळतील. या ठिकाणाला मोठा इतिहास लाभलेला असून त्यासाठी तुम्ही इथे गाईड सोबत घेऊ शकतात. गाईड तुम्हाला या ठिकाणची संपूर्ण माहिती देईल. मॉल रोड पासून हे अंतर 3 ते 4 किलोमीटर असून ऑटो किंवा टॅक्सी ने तुम्ही इथपर्यंत सहज येऊ शकतात. तुम्हाला आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओ ग्राफी करता येणार नाही.

राष्ट्रपती निवासाच्या अगदी बाहेरच तुम्हाला एक प्राणी संग्रहालय बघता येईल. तुम्हाला जर प्राणी आवडत असतील तर तुम्ही नक्की इथे भेट देऊ शकतात.

  1. तारादेवी मंदिर (Taradevi Temple)

हे मंदिर शिमला मधील खूप जुन्या आणि धार्मिक मंदिरांपैकी एक आहे. 1766 मध्ये राजा भूपेंद्र सिंह याने हे मंदिर बनविले होते. सकाळी 7 वाजेपासून ते रात्री 6:30 पर्यंत तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकतात. मॉल रोड पासून हे अंतर 12 किलोमीटर आहे. 

  1. चाडविक वॉटर फॉल (Chadwick Waterfall)

तुम्हाला जर धबधबा बघणे आवडत असेल तर शिमला पासून 6 किलोमिटर अंतरावर हा धबधबा आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला मुख्य प्रवाहापर्यंत जाण्यासाठी 1 किलोमिटर पायी जावे लागेल. इथे तुम्हाला पावसाळयात पाणी बघायला मिळते. ठिकाण सुंदर आहे आणि जात असताना तुम्हाला जंगल ट्रेक मधून जाता येते.   

शिमला ला भेट देण्यासाठी योग्य वेळ – Best Time to Visit Shimla

शिमला या ठिकाणी तुम्ही कोणत्याही ऋतू मध्ये जाऊ शकतात. मात्र स्नोफॉल जर तुम्हाला बघायचा असेल तर नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात इथे यावे. तुम्ही या काळात कुफरी येथे नक्की यायला हवे. 

उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये तुम्ही इथे सुंदर निसर्गाचा आनंद घेऊ शकतात. पावसाळयात येणे शक्यतो टाळावे कारण या काळात दरड कोसळण्याच्या घटना खूप जास्त घडतात. 

शिमला ट्रीप साठी कमीत कमी खर्च – Minimum Budget Required for Shimla Trip

तुम्हाला इथे येण्यासाठी लागणार खर्च आपण मागच्या लेखात बघितला आहे. तुम्हाला इथे प्रत्येक दिवशी राहण्यासाठी साधारणतः 1000 रुपये प्रति व्यक्ती इतका खर्च येतो. तुम्हाला विविध ठिकाणी भेट देण्यासाठी आणि खाण्यासाठी प्रत्येक दिवशी 500 ते 600 रुपये खर्च येईल. त्यामुळे एका व्यक्तीसाठी तुम्हाला 3 दिवसांचा खर्च हा 4000 ते 5000 रुपये इतका असेल. 

0 Replies to “शिमला मधील पर्यटन स्थळे || Tourist Places to visit in Shimla – Marathi (Part 2)”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top